Entertainment Movies

या वेबसिरीजने 2020 मध्ये लोकांच्या मनावर केले राज्य; अजूनपर्यंत बघितल्या नसतील तर आवश्य बघा!

2020 मे आपल्याला घरात राहायला शिकवले. आपली मनोरंजनाची सगळी दार 2020मध्ये बंद झाली. सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघणे हे अगदी स्वप्नवत वाटायला लागले. मात्र त्यावेळी सहारा होता तो ओटीटी प्लॅटफॉर्मचा. या काळात अनेक चांगल्या वेबसिरिज आपल्या भेटीला आल्या आणि त्यापैकीच पुढील वेबसिरीज ने तर प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: राज्य केले! याच वेब सिरीज विषयी जाणून घेऊया अधिक!

आश्रम ही प्रकाश झा यांची वेब सिरीज दोन सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली! एम एक्स प्लेयर वर अगदी फ्री मध्ये हि उपलब्ध होती. आणि त्यामुळे दर्शकांनी देखील रेकॉर्डब्रेक या वेब सिरीज ला बघितले! बॉबी देवल नाही आपल्या करिअरमध्ये सगळ्यात चांगले काम या वेबसीरीज मध्ये केले आहे असे म्हणावे लागेल.

मिर्झापूर 2 या वेब सिरीज मध्ये देखील अनेक चांगले आणि ताकदवान कलाकार आपल्याला पाहायला मिळाले. मिर्झापूर चा पहिला सिझन आल्यानंतर दुसऱ्या सीझनची प्रत्येकालाच उत्सुकता होती. राजनैतिक आणि सामाजिक व्यवस्था यावर प्रखरपणे भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे.

स्पेशल ऑप्स हि वेब सिरीज गुप्तचर खात्यावर निर्धारित आहे. या वेब सिरीज मध्ये एखादा स्पेशल ऑपरेशन असताना ऑफिसर्स कसे काम करतात आणि अनुभव कसे रोमांचकारी असतात याविषयी कथा पाहायला मिळेल.

आर्या या वेब सिरीज मधून अनेक वर्षानंतर सुष्मिता सेन कॅमेरासमोर आली आहे. एक घरगुती स्त्री आपल्या पतीच्या निधनानंतर किंवा हत्ये नंतर त्याच्या व्यवसायात कशी उतरते, त्याला मारणाऱ्या लोकांना कशी शोधून काढते त्याचबरोबर तिच्याच आजूबाजूच्या नातेवाईकांमधून तिला कसे अनुभव येतात, याविषयी अगदी थरारकरित्या भाष्य करणारी ही वेबसिरीज प्रेक्षकांना खूप आवडली.

पाताल लोक ही वेबसिरीस सुद्धा भ्रष्टाचार, अपराध, आणि होणारा अन्याय या विरोधात एक छोटासा पोलिस ऑफिसर कशी चौकशी करतो याविषयी आहे. या वेब सिरीज ची कहाणी आणि यात काम करणाऱ्या लोकांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली.

स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी या वेब सिरीज मध्ये शेअर बाजारामध्ये झालेल्या खऱ्याखुऱ्या मोठ्या घोटाळा याविषयी भाष्य करण्यात आले आहे. शेअर मार्केटमध्ये आवड असणाऱ्या अनेक लोकांना ही वेबसिरीज खूप आवडली.

असुर या वेबसिरीज मधून एका लहान मुलासोबत झालेला दुर्व्यवहार याविषयी भाष्य करण्यात आले आहे. आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने चांगल्या बुद्धीचा सुद्धा वाईट मार्गाने कसा वापर करता येऊ शकतो आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे यात दाखवण्यात आले आहे.