Entertainment Movies

ब्लॉकबस्टर संगम चित्रपटाच्या बाबतीत हा किस्सा तुम्हाला माहित आहे काय? काय झाले होते दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या मध्ये जाणून घ्या!

संगम हा चित्रपट 1964 मध्ये रिलीज झाला. बॉलिवूडमध्ये राज कपूर आणि दिलीपकुमार हे अगदी मोठे नाव आहे. देवानंद म्हणजे त्याकाळचे आकर्षण होते. दिलीप कुमार, राज कपूर आणि देवानंद या तिघांची त्याकाळी फारच चलती असायची. आजच्या काळात, आपण शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान कडे बघतो तसे त्या काळी लोक या तिघांकडे बघत. या तिघांमध्ये चांगली मैत्री होती. मात्र, प्रेक्षकांना कोणी तरी एक हिरो इतका आवडतो की, इतरांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या भावना असतात. या तिघांचे फॅन्स एकमेकांशी वाद घालत आणि त्यांच्यामध्ये भांडणं देखील होत. मात्र या तिघांमध्ये भांडण मुळीच नव्हती.

राज कपूर साहेबांनी जेव्हा संगम चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी त्या चित्रपटात दोन हिरो आणि एक हिरोइन यांची गरज होती. ते स्वतः या चित्रपटामध्ये काम करणार होते. मग दुसरा हिरो कोण? हा प्रश्न निर्माण झाला आणि ते दिलीप कुमार कडे गेले. दिलीप कुमार कडे जायचे होते तेव्हा राज कपूर यांनी एक ब्लँक चेक आणि स्क्रिप्ट सोबत ठेवली होती. या ब्लँक चेकवर हवी ती रक्कम टाक आणि या चित्रपटात काम कर असे ते दिलीप कुमार यांना म्हणाले. “तुला स्क्रिप्ट आवडली असेल तर, हवी ती रक्कम द्यायला मी तयार आहे!” हे देखील राज कपूर यांनी दिलीप कुमार यांना सांगितले.

दिलीप कुमार यांना स्क्रिप्ट आवडली देखील मात्र, त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. कारण, त्यांना भीती होती की; आपले फॅन्स एकमेकांमध्ये लढून काहीतरी विचित्र परिस्थिती निर्माण करतील. जेणेकरून आपल्या दोघांच्या नात्यावर परिणाम होईल. याचबरोबर दिलीप कुमार यांनी राज कपूर बरोबर बोलताना हेही सांगितले की, जर मी हा चित्रपट केला तर याची फायनल एडिटिंग मी करेल. हे बोलणं राज कपूर यांना आवडले नाही आणि त्यांनी देवानंद कडे या फिल्मची ऑफर दिली.

देवानंदना देखील हा चित्रपट करायचा नव्हता मग एका बंगाली अॅक्टरला या चित्रपटाची संहिता पाठवण्यात आली. मात्र, राजेंद्र कुमार यांच्या नशिबात हा चित्रपट होता आणि त्यांनी तो राज कपूर यांच्यासोबत केला. आता हिरोइन कोणती घ्यायची असा विषय निघाल्यानंतर नर्गिस ही पहिली निवड राज कपूर यांनी केली. मात्र, त्यांनी देखील हा चित्रपट करणार नाही असे सांगितले. त्यामुळे वैजयंतीमाला यांना हा चित्रपट मिळाला.

आजच्या काळात 100 कोटींचे टार्गेट ठेवून जिथे चित्रपट होतात, 1964 च्या काळी तब्बल 8 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिसवर व्यवसाय या चित्रपटाने केला. या चित्रपटात बनवण्यासाठी 1 कोटी रुपये गुंतवले होते. आजच्या काळात बोलायचं झालं तर जवळजवळ 700 कोटी रुपये एवढा या चित्रपटाचा गल्ला त्याकाळी झाला होता असे म्हणावे लागेल.