Articles Bollywood Celebrities Entertainment Marathi

मराठमोळ्या अजय अतुल संगीतकार जोडीविषयी तुम्हाला ह्या गोष्टी माहीती आहे का?

सैराट झालं जी ,याड लागलं ,अप्सरा आली ,तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला  या सारख्या गाण्यांनी संपूर्ण जगभरातील संगीतप्रेमींना सैराट करून टाकणा-या संगीताची निर्मिती करणारे संगीतकार म्हणजे अजय-अतुल होय.मराठमोळ्या अजय-अतुल यांनी आपल्याला मिळालेल्या दैवी उपजत देणगीने काळजाचा ठाव घेणाऱ्या अनेक गीतांच्या चाली संगीतबद्ध केल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये सुद्धा अजय अतुल या जोडीच्या नावाचा संगीत क्षेत्रामध्ये दबदबा आहे व त्यांचे चाहते सुद्धा सर्वत्र पसरलेले आहेत.

अजय अतुल यांना कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले नाही तरी संगीताचे मिळालेले दैवी दान जगासमोर सादर करताना निश्चितच सगळे काही साधे सरळ सोपे नव्हते त्यांची वाट सुद्धा खाचा खळग्यांनी भरलेली होती. आजपण आपल्या ठेक्यावर चित्रपटाला वेगळीच उंची वाढवून देणाऱ्या अजय अतुल यांच्या विषयी काही आज गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

1) अजय अतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडी मध्ये अतुल हे मोठे बंधु तर अजय हे छोटे बंधू आहेत. अजय आणि अतुल या दोघांनाही अगदी बालपणापासून संगीताची  खूप आवड होती.

2) बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे अजय आणि अतुल यांच्या संगीत विषयक टँलेंटची चुणूक शिरोळ येथे त्यांच्या लहानपणी शिवसेनेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी सादर केलेल्या भव्य जनसमुदायासमोर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्यातून आली. यावेळी स्वतः खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते व या दोन चिमुरड्यांच्या पोवाडा सादरीकरणाने प्रभावित होऊन त्यांनी त्यांचा हार देऊन सत्कार केला होता त्यानंतर कित्येक दिवस अजय आणि अतुल यांनी तो हार बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद समजून जपून ठेवला होता.

3) अजय-अतुल यांचे बालपण आणि त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती व आर्थिक अडचणीमुळे अजय-अतुल यांना संगीताची प्रचंड आवड असूनही त्यामधले शास्त्रीय शिक्षण घेता आले नाही. तरुणपणी जेव्हा त्यांना आपल्या चाली कुणाला ऐकवायच्या असेल त्यावेळी स्वतःची वाद्य नसल्यामुळे ते तोंडाने वाद्यांचा आवाज ते दोघे काढायचे व दिग्दर्शकांना ऐकवत. इतक्या खडतर परिस्थितीतून अजूनही वाट काढत त्यांनी आपली कला जोपासली त्यांची ही धडपड पाहून एका प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाने त्यांना मानधनाच्या ऐवजी संगीतरचना निर्माण करण्यासाठी हार्मोनियम भेट म्हणून दिला होता त्यानंतर कित्येक दिवस पैशांची जमवाजमव करून आई-वडिलांकडून काही पैसे घेऊन त्यांनी कीबोर्ड विकत घेतला.

4) 2004 सारी अजय-अतुल यांनी मुंबईच्या मायानगरी मध्ये पाऊल ठेवले. त्या वेळी पुरेसे पैसे सोबत नसल्यामुळे ते वेळ पडली तर स्टुडिओमध्ये झोपत असत. हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये राम गोपाल वर्मा यांच्यासोबत अजय-अतुल यांनी गायब चित्रपटा साठी संगीत दिग्दर्शनाचे काम केले व इथूनच खरी त्यांची ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण झाली.

5) चित्रपट सृष्टी मध्ये अजय अतुल यांच्या संगीताची दखल घ्यायला लावली ती अग बाई अरेच्चा या चित्रपटापासून त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक मराठी चित्रपटांमध्ये सुपरहिट संगीत दिले. सैराट, नटरंग या चित्रपटांमधील संगीत उल्लेखनीय आहे. सही रे सही सारख्या गाजलेल्या नाटकांना सुद्धा अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे हे चाहत्यांना नक्कीच माहीत असणार.

6) अजय अतुल यांना मानाचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. अजय-अतुल यांनी आपल्या संगीतामध्ये निरनिराळे प्रयोग घडवून आणले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सिंफनी संगीताचा पहिल्या प्रयोग यांनी सैराट चित्रपटासाठी केला आहे. अजय अतुल यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला तो फोर्ब्जने जाहीर केलेल्या शंभर सेलिब्रिटी च्या यादीमध्ये अजय-अतुल यांच्या नावाची दखल घेतली गेली.

About the author

beingmaharashtrian