Articles Education Featured Inspirational Maharashtra Politician Politics

तुकाराम मुंढे यांच्याबरोबरच ‘हे’ आहेत सर्वाधिक वेळा बदली झालेले अधिकारी

tukaram mundhe

भारतीय प्रशासकीय सेवेत दर तीन वर्षांनी तुमची बदली होणे नक्की असते. मात्र काही अधिकारी आपल्या वादग्रस्त कारकिर्दीमुळे अनेकदा चर्चेत येत असतात. मात्र काही प्रामाणिक अधिकारी देखील असतात. मात्र तेथील लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेशी त्यांचे जमून आले मात्र त्यांना त्या पदावर आधिक काळ सेवा करता येत नाही. महाराष्ट्रात देखील विविध अधिकारी असे आहेत ज्यांना लोकाधार आहे मात्र लोकप्रतिनिधी आणि त्यांचे न पटल्याने त्यांना तेथून पुन्हा बदलण्यात येते. महाराष्ट्रात देखील तुकाराम मुंढेंच्या रूपाने एक प्रामाणिक अधिकारी लाभला आहे. आयएएस अधिकारी असणाऱ्या तुकाराम मुंढे आपल्या धडाकेबाज कामगिरी आणि सतत होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

तुकाराम मुंढे यांनी १५ वर्षांच्या सेवेतील ही १५ वी बदली आहे. नवी मुंबई, नाशिक आणि आता नाशिकपाठोपाठ नागपूर येथे पालिका लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या विरोधामुळे तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. मात्र केवळ तुकाराम मुंढे यांचीच नाही तर भारतातही असे अनेक अधिकारी आहेत ज्यांची त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळा बदल्या करण्यात आल्या. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील विविध अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आजच्या या लेखात आपण या अधिकाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये अगदी हरयाणामधील प्रदीप कासनी किंवा अशोक खेमका यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आता मुंढेच्या सतत होणाऱ्या बदल्या पाहता या अधिकाऱ्यांच्या यादीत मुंढे यांचा समावेश होणार का याबद्दलही चर्चा रंगू लागल्यात. याच अधिकाऱ्यांची यादी आणि नावे आज आम्ही तुम्हाच्या सांगणार आहोत.

1)विनीत चौधरी (हिमाचल प्रदेश) :५२ वेळा बदली
हिमाचल प्रदेशमधील प्रशासकीय अधिकारी असणारे विनीत चौधरी हे २०१८ साली २९ सप्टेंबर रोजी निवृत्त झाले. मात्र १९८३ च्या बॅचचे अधिकारी असणाऱ्या चौधरी यांची ३४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकूण ५२ वेळा बदली झाली होती.

2)कुसुमजीत सिंधू (पंजाब) : ४६ वेळा बदली
पंजाबमधील कुसुमजीत सिंधू यांची त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकूण ४६ वेळा बदली झाली. १९७९ च्या पंजाब कॅडरच्या अधिकारी असणाऱ्या सिंधू यांच्या निवृत्तीनंतर त्यांना २०१७ साली पंजाब राज्य विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं.

3)विन्स्टन मार्क सायमन पेरिएट (मेघालय) : ५० वेळा बदली
मेघालयमधील विन्स्टन मार्क सायमन पेरिएट यांची ३६ वर्षाच्या सेवेदरम्यान ५० वेळा बदली झाली. आसाम-मेघालय कॅडरचे अधिकारी असणाऱ्या पेरिएट हे आपल्या रोकठोक निर्णयांसाठी ओळखले जायचे.

४) प्रदीप कासनी (हरयाणा) : ७० वेळा बदली
हरयाणामधील प्रदीप कासनी हे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त झाले. आपल्या ३३ वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांची तब्बल ७० वेळा बदली झाली होती. त्यांनी १९८४ साली प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे एकाच महिन्यातत्यांची तीन वेळा बदली झाली होती.

५)अशोक खेमका (हरयाणा) : ५१ वेळा बदली
२०१९ साली मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या प्रधान सचिवपदावरून खेमका यांनी बदली विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ५३ वर्षीय खेमका यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील २७ वर्षांच्या कारकीर्दीतील ही तब्बल ५२ वी बदली ठरली. ही बदली ‘प्रशासकीय बाब’आणि नित्याचीच असल्याचा दावा हरयाणा सरकारने केला असला तरी हरयाणा सरकारच्या बिल्डरांच्याफायद्याच्या निर्णयावर खेमका यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बहुधा त्यांच्या अंगाशी आली असावी अशी शक्यात त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.खेमका यांनी गुरुग्राम-फरिदाबाद मार्गावरील अरवली पर्वत भागातील सुमारे तीन हजार एकर जमिनीच्या विकासाचा व्यवहार रद्द केला होता. खेमका यांनी घेतलेला हा निर्णय या बदलीच्या आदल्या आठवडय़ात भाजप सरकारने रद्द केला होता.

सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आढळतो, असे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. सनदी अधिकाऱ्यांना किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी मिळणे आवश्यक असते. पण देशातील ६८ टक्के सनदी अधिकाऱ्यांच्या १८ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत बदल्या होतात. त्यामुळे तुमच्या दृष्टीने उपयोगी आणि तुम्हाला सहयोग करणारा अधिकारी नसेल तर तुमची बदलीं होणार हे नक्की !