Featured

प्रेमात पडलाय ही लक्षणे नक्की दिसतील

प्रेमात पडलेल्या माणसाला आजुबाजूला काय चाललंय हे दिसतं नाही. म्हणूनच कदाचित प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमाला कोणाची पर्वा नसते. प्रेमात लोकं एवढी वेडी होतात की आपण काय करतोय हेच त्यातल्या बऱ्याच जणांना कळत नाही. काही गंमतीशीर गोष्टी वाचूया ज्या प्रेमाच्या दिवसात कपल्स करतात. कालांतराने हे खूप बालीशपणे वाटत पण त्या त्या वयात हे होतंच…जाणून घेऊया याबद्दल…

नवं नवं प्रेम झाल्यावर एकमेकांना नावाने हाकं मारणं शक्यतो टाळलं जातं. त्याऐवजी टोपण नावाचा वापर केला जातो. बाळा, सोन्या, बेबी, जानू, बेटा, छकुली अशी हाक मारून आपल्या प्रियकर / प्रेयसीला बोलावलं जातं. मोबाईल मेसेजपर्यंत असताना हे ठिक असतं पण चारचौघात अशी हाक आल्यास आजुबाजूवाल्यांच्या भुवया उंचावतात.

दोघांनी एकमेकांना समजून घेण्यात खरं प्रेम असतं. दोघांची प्रेमाची भाषा एकमेकांना कळते. त्याचा ‘बाजार’ किती करायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं. अनेकजण आपल्या प्रेमाची प्रत्येक गोष्ट फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. आपण समोरच्यावर किती प्रेम करतो हे सोशल मीडियावर जाहीर केलं जातं. बऱ्याचदा त्यांच्या भावनांची खिल्लीही उडवली जाते.

आपल्या रिलेशनशीपला पहिला महिना, पहिलं वर्षे पूर्ण झाल्यावर, पहिल्या किसंचं सेलिब्रेशन केलं जातं. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना कदाचित याबद्दल सांगितलं नसेल पण तुम्ही सेलिब्रेशन तर केलं असेलंच.सिनेसृष्टीचा सिनेमावर खूप मोठा प्रभाव असतो. त्यामुळे सिनेमातील एखाद्या सीनप्रमाणे प्रपोज करणं ही गोष्ट अनेक कपल्स करतात. एखाद्या पार्टीनंतर अचानक गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करणं, गाणं म्हणून प्रपोज करणं यागोष्टी हमखास होतात.

कुणाच्या प्रेमात पडल्यावर हे आयुष्य आपल्याला जास्त अर्थपूर्ण वाटायला लागतं आणि आपल्यावर मनापासून प्रेम करणारं कुणी आहे, ही भावनाच मनाला सुखावून जाते. एकमेकांना गाणी समर्पित केली जातात आणि प्रत्येक गाण्यांमध्ये आपण स्वतःला पाहतो.

कधी नव्हे ते तुम्हाला शॉपिंग करायला जास्त आवडू लागते आणि कपड्यांच्या बाबतीत तुम्ही खूप सेंटीमेंटल आणि अप टू डेट राहायाला लागता.

एकटे बसले असला की दिवसा स्वप्न पहाणं सुरु करता.त्या स्वप्नात केवळ तुम्ही आणि ती.. बस इतर कोणीच नसतं. लोकांना ब्लॅक ऍंड व्हाईट स्वप्न पडतात, तर तुम्हाला कलर.

एकमेकांना गुड मॉर्निंग म्हंटल्या शिवाय तुमचा दिवस सुरु होत नाही, आणि गुड नाईट म्हंटल्याशिवाय रात्र!

नवं नवं प्रेम झालेले सर्वजण लहान मुलांसारखे करताना दिसतात. आपली गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत लहान मुलांसारखं वागणं, हट्ट करणं, भांडणं, चावणं, रुसणं अशा गोष्टी करणारी अनेक कपल्स आपल्याला आजुबाजूला दिसतात.