या आहेत सर्वांत सुंदर 11 भारतीय अभिनेत्री, चौथी तर आहे सर्वांची फेव्हरेट

बॉलिवूड हा फक्त भारतातीलच नाही तर जगातील रसिकप्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. चित्रपटांबरोबरच त्यातील अभिनेता आणि अभिनेत्रींचे अनेक चाहते आपल्या आजूबाजूला दिसतात. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या या लेखात आपण पाहुयात भारतातील 11 लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींविषयी खास माहिती…

1) कैटरीना कैफ : कैटरीना कैफचा जन्म 16 जुलै 1983 ला झाला असून बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. गोरी त्वचा आणि मनमोहक सौंदर्यामुळे कैटरीना अल्पावधीतच रसिकप्रेक्षकांच्या पसंदीस उतरली. आपल्या करियरमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

2) अनुष्का शर्मा : सौंदर्याबरोबरच आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा होय. अनेक सुपरहिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या अनुष्काचा पहिला चित्रपट शाहरुख खानसोबतचा ‘रब ने बना दी जोडी’ हा होता. 2017 सालच्या शेवटी अनुष्का, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबर विवाहबंधनात अडकली.

3) जॅकलीन फर्नांडिज : जॅकलीन मूळची श्रीलंकन मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तिला 2010 सालचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा आयफा तसेच ‘अलादिन’ या चित्रपटासाठी स्टारडस्ट पुरस्कार देण्यात आला होता. आपल्या सुंदर डोळ्यांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री जॅकलिनने 2006 साली ‘श्रीलंका युनिव्हर्स’ हा किताब पटकावला होता.

4) आलिया भट्ट : चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांची द्वितीय कन्या आलिया भटने आपल्या अभिनयाच्या जोरावर अत्यंत कमी वयात बॉलिवूडमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ आणि ‘राझी’ या चित्रपटांतील तिच्या अभिनयाची वाहवा झाली होती. अत्यंत कमी वयाची ही गुणी अभिनेत्री अल्पावधीतच तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

5) श्रद्धा कपूर : ‘आशिकी-2’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्री श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिच्या या पहिल्याच चित्रपटाची आणि सौंदर्याचीदेखील भरपूर वाहवा झाली. मनमोहक सौंदर्य आणि घायाळ करणाऱ्या अदांमुळे श्रद्धा अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री आहे.

6) दीपिका पादुकोण : अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी झाला असून तिने शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दीपिकाने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले असून आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने हॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे. विशेषतः युवावर्गात तिचे भरपूर चाहते आहेत. 

7) ऐश्वर्या राय : ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांत काम केले असून तिच्या सौंदर्याचा एक मोठा चाहता वर्गदेखील आहे. निळ्या रंगाची छटा असलेले ऐश्वर्याचे डोळे तिच्या सौंदर्यात भर टाकतात. अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले. ऐश्वर्या आणि अभिषेकला आराध्या नावाची कन्या आहे.

8) सनी लियोन : सनी लियोन बॉलिवुडमधील महत्वाच्या अभिनेत्रींनपैकी एक असून तिने ‘जिस्म-2’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनय, सौंदर्य आणि घायाळ करणाऱ्या अदांमुळे अल्पावधीतच सनी लियोन प्रेक्षकांच्या पसंदीस उतरली. सनीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे.

9) सेलिना जेटली : बॉलिवूडमधील महत्वाच्या अभिनेत्रींनमध्ये सेलिना जेटलीची गणना होते. गोलमाल रिटर्न, थँक यु, नो एंट्री, हे बेबी, सी कंपनी अशा अनेक चित्रपटांमध्ये सेलिनाने महत्वाची भूमिका साकारली आहे. आपल्या घाऱ्या डोळ्यांमुळे आणि अप्रतिंम सौंदर्यामुळे सेलिनाचा चाहतावर्ग मोठा आहे.

शिल्पा शेट्टी : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि आजकाल आपल्या योगसाधनेमुळे तसेच डान्समुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी होय. उद्योगपती राज कुंद्रासोबत विवाहबद्ध झालेली शिल्पा 2 अपत्यांची आई आहे. मात्र आजही तिच्या सौंदर्याची आणि नृत्याची भुरळ अनेक चाहत्यांना पडत असते.

काजोल : 90 च्या दशकातील प्रसिद्ध असलेली अभिनेत्री काजोल आजही त्याच ऊर्जेने आणि त्याच जोमाने बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अभिनेता अजय देवगणसोबत विवाहबद्ध झालेल्या काजोलला एक मुलगा आणि एक मुलगी असे अपत्य असून आपल्या करियरसोबतच ती कुटुंबालादेखील वेळ देत आहे. तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे तिचा चाहतावर्ग मोठा आहे.