Featured

रागावर नियंत्रण ठेवायचाय तर ह्या गोष्टी नक्की करा

तुमच्या कुटुंबात कायम भांडणाचाच आवाज येत असतो का? तुमच्यात सतत वाद होऊन ते विकोपाला जातात का? कधीकधी तर भांडण कसं सुरू झालं हेदेखील तुम्हाला कळत नाही. तुम्ही खरंतर एकमेकांना दुखवू पाहत नाही कारण तुमचं एकमेकांवर प्रेम असतं.
अनेक वेळा एकमेकांचे विचार न पटणे एकमेकांच्या वागण्या-बोलण्याने दुखावले जाणे, एकमेकांबद्दल गैरसमज करून घेणे अश्या अनेक गोष्टीमध्ये घरामध्ये जोडीदारा बरोबर भांडणे होत असतात. ही भांडणे होऊ नये म्हणून दोघांनी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. किंवा काही गोष्टी टाळणे आवश्यक असते. ज्यामुळे घरात भांडणे होणार नाही.

. १. एकमेकांना प्रत्युत्तर देऊ नका

एक व्यक्ती रागानं बोलत असते, तेव्हा दुसऱ्यानं शांतपणे ऐकून घेतलं तर वाद टाळता येतो. तुम्ही कितीही चिडला असाल तरी प्रत्युत्तर देण्याचं टाळा.. वादात कोण जिंकलं यापेक्षा घरातील शांती टिकवणं महत्त्वाचं आहे हे कायम लक्षात असू द्या.

२. स्वतःला शांत करा

तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा ठेवणं कठीण होत असेल तर तुम्ही आपला राग शांत करण्यासाठी तिथून निघून जाणं योग्य ठरेल. स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही दुसऱ्या खोलीत किंवा घराबाहेर कुठंतरी जाऊ शकता.

३. काय बोलणार आणि कसं बोलणार याचा नीट विचार करा

तुम्ही आपल्या जोडीदाराला टोचेल असं काही बोलणार असाल तर अशानं परिस्थिती आणखी बिघडेल. यापेक्षा त्याच्या दुखऱ्या मनाला फुंकर घालता येईल असं काहीतरी बोला. त्यानं कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे सांगण्यापेक्षा, प्रेमानं त्याला झाल्या प्रसंगाबद्दल विचारा आणि त्यानं सांगितलेल्या गोष्टींबद्दल किंवा दिलेल्या सल्ल्याबद्दल त्याचे आभार माना.

४. आवाज चढवू नका आणि समेट करण्याची इच्छा आहे हे दाखवा.

एका सोबत्यानं जर धीरानं घेतलं नाही तर दुसऱ्याचाही पारा चढू शकतो. तुम्हाला कितीही राग आला असला तरी, टोचून बोलण्याचं, आवाज चढवायचं किंवा अपमानास्पद बोलण्याचं टाळा. त्याउलट प्रेमाने बोलून तो विषय कसा संपवता येईल त्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे शांततेने बोलून भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा.

५. एकमेकांच्या भावना समजून घ्या

कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता, सहनशीलतेनं आपण जोडीदाराचं बोलणं ऐकून घेतलं तर त्याचा राग कमी होईल आणि घरातली शांतात टिकून राहील याची काळजी घ्या. एकमेकां दोषी ठरवण्यापेक्षा एकमेकांच्या भावना समजून घ्या

६. लगेच क्षमा मागा आणि मार्ग काढा

घरामध्ये शांती असणं हा तुमचा मुख्य उद्देश असल्यामुळं मनात येणाऱ्या नकारात्मक भावना काढून टाका. तुम्ही एकमेकांबरोबर भांडता तेव्हा दोघंही हरता पण शांती टिकवून ठेवता तेव्हा दोघांचाही विजय होतो. नात्यासाठी आणि घरातील शांतात टिकवून ठेवण्यासाठी क्षमा मागणे कमी पणाचे नाहीतर समजूतदारपणाचे लक्षण आहे. जोडीदारानं माफी मागितली तर क्षमा करायला लगेच तयार राहा.