लग्न करताय तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात, त्यामुळे तुम्ही या बदलांचा मानसिक पातळीवर कसा स्वीकार करतात यावर तुमचं लग्न किती यशस्वी होईल हे अवलंबून राहतं. विवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. पण अनेकदा लग्न झाले की काही दिवसातच वाद सुरु होतात. पुढील गोष्टींवर तुम्ही नीट विचार करून तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात पश्चाताप करावा लागणार नाही.

तुमचा एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड यांच्यासोबत तुमच्या विद्यमान पार्टनरची तुलना अजिबात करू नका. कालतरांने यामुळे वाद निर्माण होऊन दुरावा निर्माण होईल.

लग्नातील नातेवाईकांची चुकूनही पार्टनरसमोर खिल्ली उडवू नका. कधी कधी जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी पार्टनरसोबत बोलताना नातेवाईकांची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे त्यांना दुःख होऊ शकते.

आर्थिक गणितं- वैवाहिक आयुष्यासाठी पैसा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पार्टनरसोबत भविष्याचे आर्थिक नियोजन करा. तुमचा पगार फक्त तुमचा नाहीये.त्यामुळे आर्थिक निर्णयांमध्ये दोघांनी एकमेकांना सहभागी करून घ्या.

पार्टनरसोबत त्याच्या कामावरून, किंवा नोकरीवरून रागावू नका. त्याला नेहमी प्रोत्साहन द्या.

एकमेकांना जाणून घेण्यासाठी परस्परांच्या आवडी-निवडी जाणून घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मोकळ्या वेळेत तुम्ही काय करता, ते एकमेकांना सांगा.परस्परांच्या फ्रेंड सर्कल याविषयी थोडे जाणून घ्या.

लग्न किंवा लग्नानंतर रिसेप्शनला आलेला खर्च याबाबत पार्टनरसोबत चुकूनही चर्चा करु नका. या खर्चावरून पार्टनरसोबत बढाया मारल्याने तुमच्या नात्यात अंतर पडू शकते.