मदिरा अर्थातच दारू किंवा अल्कोहल हे  अगदी प्राचीन काळापासून जीवनातील मनोरंजन, विरंगुळा ,शौक इत्यादी साठी वापरली जाते. दारू बनवण्याचे अनेक निरनिराळे प्रकार व पद्धती विविध संस्कृतींमध्ये अवलंबल्या गेले आहेत. सध्या लाँकडाऊन च्या काळामध्ये दारू विक्रीवर बंदी घातली गेल्यानंतर अनेक मद्य प्रेमी अगदी चढ्या भावाने सुद्धा दारू खरेदी करण्यासाठी मागेपुढे पाहत नव्हते. जेव्हा लाँकडाऊनमध्ये दारू विक्री सुरू झाली तेव्हा दारू खरेदीसाठी लांबच लांब रांग लागल्या .यावर दारू विक्री व्यवसाय हा महसुलाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे अशी भलावण केली गेल्यामुळे अनेक जोक व मिम्स सुद्धा व्हायरल झाले. मद्यपींसाठी दारू ही एक कळीचा मुद्दा असते हे यावरून सिद्ध झाले .दारूचे सुद्धा अनेक प्रकार असतात ते कधीकधी त्यांच्या किमती वरून सुद्धा निश्चित होतात. काही प्रकारच्या दारू या अगदी सहज पणे बाजारात उपलब्ध असतात व त्यांच्या किमती सुद्धा सामान्य माणसाच्या आवाक्यात असतात मात्र दारू च्या एका बाटलीची किंमत लाखोंच्या घरात असलेल्या सुद्धा दारुच्या बाटल्या आहेत हे आपण जाणून आहोत. अशाच काही जगातल्या महागड्या दारूविषयी आपण जाणून घेणार आहोत.

1) Tequila ley.925ः जगातील सर्वात महागडी दारूची बाटली म्हणून ओळखली जाते व आत्तापर्यंत फार मोजक्या लोकांनी या बाटली ची खरेदी केली आहे व या दारूच्या बाटलीला एक संग्रह म्हणून करण्यासाठी खरेदी केले जाते. या बाटलीतील दारू प्रत्यक्ष पिणे हे अभावानेच आढळते .सोळाशे सालच्या दरम्यान डाँन पेट्रो डी सांचेज, अल्टामेरा ऑफ मार्कीसने बनवले होते.ही दारू प्रामुख्याने  42% अल्कोहोल इतक्या मात्रेमध्ये बनवली जाते. दारूच्या बाटली ची किंमत  या बाटलीच्या रचने मुळे सुद्धा जास्त आहे. या दारूची बाटली ही सोने आणि प्लॅटिनम ने बनलेली आहे आणि यावर 6401 इतके शुद्ध हिरे जडवण्यात आले आहेत. या दारूच्या एका बाटलीची किंमत 3.5 मिल्लियन डाँलर इतकी आहे .या बाटल्या चे वजन साधारण आठ किलोग्राम आहे.

2) Henri Iv dudognon heritage cognac grande champagne: हीसुद्धा जगातील सर्वात महाग दारूच्या बाटल्यांपैकी एक आहे. ही दारूची बाटली हेन्री चौथा यांच्या नावाने प्रसिद्ध आहे .ही  दारु निर्मितीक्षेत्रातील उच्च दर्जाची दारू मानली जाते. या दारूची निर्मिती फ्रान्समध्ये केली गेली. या दारूची निर्मिती  1776 साली करण्यात आली व या दारूमधे अल्कोहोलचे प्रमाण हे 41 टक्के इतके आहे .या दारूच्या बाटली वर सुद्धा प्लॅटिनम आणि 24 कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आलेला असून 6000 हिरे जडविण्यात आलेले आहेत व यामुळेच या दारूच्या बाटली ची किंमत एक मिलियन डॉलर इतकी आहे.

2) Diva vodka: Diva vodka यामधील अल्कोहल निर्मितीप्रक्रिया सोबतच बाटलीच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे सुद्धा किमतीने महाग आहे. या अल्कोहोलच्या बाटली मधील व्होडका ट्रिपल फिल्टर असते व बाटलीमध्ये एक अंतर्गत असा विशिष्ट कप्पा केलेला असतो ज्यामध्ये swarovsky crystals ठेवण्यात आलेले असतात. ज्यांचा वापर हा दारू पिण्याच्या वेळी आपण दारूच्या वरती सजावटी साठी करू शकतो. बाटलीची वैशिष्ट्यपूर्ण व अनोखी अशी रचनाच या बाटली च्या महागडे पणा चे प्रमुख कारण आहे।. या एका बाटलीची किंमत ही एक मिलियन डॉलर इतकी आहे.

4) Mendis coconut brandy:   म्हणजे नारळ आणि ताडीच्या फुलांपासून बनवली जाते.ही ब्रँडी मुख्यत्वे श्रीलंकेमध्ये निर्माण केली जाते. या ब्रँडीला हामिला किंवा त्रिकोमलाई झाडाच्या लाकडाच्या पिंपात साठवून ठेवले जाते.ही ब्रांडी जगभरातील प्रसिद्ध ब्रांडी पैकी एक असून याच्या एका बाटलीची किंमत ही एक मिलियन डॉलर इतकी आहे.

5) The Maccalan’M’ six litre in lalique: Maccallan हा स्काँचचा एक प्रसिद्ध ब्रँड आहे.Macallan M six ची बाटली ही प्रसिद्ध लालीक या काचेच्या द्वारे बनवण्यात आली आहे व या बाटलीची किंमत सहा लाख 28 हजार डॉलर इतकी आहे.

6) Macallan 64 year in lalique: Macallan हा ब्रँड जुन्या विस्की च्या साठी प्रसिद्ध आहे. Macallan 64 year in lalique ही बाटली तिच्या वजनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या दारूच्या रिकाम्या बाटली चे वजन 25पौंड असते असे सांगितले जाते कीMacallan कंपनीच्या 150व्या वर्धापन दिनाच्या वेळी ही विशेष बाटली निर्माण केली गेली होती या एका बाटलीची किंमत चार लाख 60 हजार मिलियन डॉलर इतके आहे.

7) Dalmore 62: Delmore 62 ही जगभरातील महागड्या व्हिस्की पैकी एक आहे व त्याची निर्मिती रिचर्ड पीटरसनने केली .निर्मितीनंतर च्या पहिल्या दोन बाटल्या  $100000 ला प्रत्येकी विकल्या गेल्या .या प्रकारच्या बाटल्या केवळ 12बनवल्या गेल्या होत्या .याची सध्याची किंमत 215000 डॉलर इतकी आहे.

8) Armand de Brignac Midas: Armand de Brignac Midas जगभरातील प्रसिद्ध अशी शँम्पेन आहे. या कंपन्यांच्या बाटलीचे झाकण खालच्या बाजूला एका विशिष्ट धातूपासून बनवले गेले आहे. ही बाटली आकारमानाने खूप मोठी असुन तिच्या आकारमानामुळे या बाटलीची किंमत महाग आहे. 2013 झाली प्रसिद्ध गायक व उद्योजक जेडने ब्रँड विकत घेतला व 2014 साली 14 वर्षीय फ्ला फ्लवरने या बाटलीचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन केले. या बाटलीची किंमत 215000 डॉलर इतके आहे.

9) Tribute to honour by royal salute: Royal salute जगभरातील प्रसिद्ध जीन   व्हिस्की आहे. या जीन व्हिस्कीची निर्मिती roayal salute scotch whiskey Chivas brothers,Ebirdon,स्काँटलंड येथे 1801 साली करण्यात आली. हि व्हिस्की 45 वर्षे इतकी जुनी असून याच्या बाटलीला जवळपास तीनशे काळे व सफेद असे हिरे आणि सोने आणि चांदीचे 22 कॅरेट युक्त रत्न जडवलेले आहेत ज्यामुळे या बाटलीची किंमत इतकी जास्त आहे. एका बाटलीची किंमत दोन लाख पंधरा हजार डॉलर इतकी आहे.

10) Bombay sapphire revelation: Bombay sapphire revelation जगभरातील प्रसिद्ध असाजीन ब्रँड आहे. याची निर्मिती 1987 साली करण्यात आली ।या बाटलीचा रंग निळसर आहे व यामधील अल्कोहोलची मात्रा प्रत्येक देशात भिन्न आहे जसे की कॅनडा ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया मध्ये या जिन मधील अल्कोहोल ची मात्रा 40 टक्के असून अमेरिकेमध्ये या जिन मधील अल्कोहोलची मात्रा 47 टक्के आहे .या एका बाटलीची किंमत दोन लाख अमेरिकन डॉलर इतकी आहे.