Articles Featured Uncategorized

जेव्हा केवळ एका बादलीसाठी झालेल्या युद्धात गमवावे लागले दोन हजार जणांना जीव

war of bucket
war of bucket

एका बादलीत केवळ पाणीच नाही तर कुणाची इज्जत देखील भरली जाऊ शकते. विश्वास नाही ना बसला या वाक्यावर ! मात्र हे खरे आहे. १३ व्या शतकात या एका बदलीवरून मोठे युद्ध रंगले होते यावर देखील तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. एका बादलीसाठी युद्ध करणे हि खरी तर वेड्यांची लक्षणे आहेत. मात्र युरोपमध्ये यावरून मोठे युद्ध देखील झाले होते. आजच्या लेखात आपण या अशाच बादलीवरून झालेल्या युद्धाविषयी जाणून घेणार आहोत.

  ओकाच्या झाडापासून बनवलेल्या या बादलीसाठी १३ व्या शतकात युरोपमध्ये दोन गटांमध्ये मोठे युद्ध रंगले होते. द वॉर ऑफ़ द ओकन बकेट या नावाने हे युद्ध प्रसिद्ध झाले. युरोपच्या इटलीमधील बोलोन्या आणि  मोदेना  या दोन प्रतिद्वंदी राज्यांमध्ये हे युद्ध मोठ्या प्रमाणावर रंगले. १३२५ साली  झालेल्या या युद्धाची आजदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. या युद्धामध्ये मोदिनीजच्या सैनिकांनी शहराच्या मध्यभागी असलेल्या एका विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बदलीची चोरी केली. या युद्धाच्या वेळी हि एक साधारण पाणी काढण्यासाठी वापरली जाणारी बादली होती. त्याचबरोबर तिचे कोणतेही ऐतिहासिक महत्व देखील नव्हते. मात्र या चोरीमुळे बोलोन्याच्या गौरवाला धक्का बसला. त्यांनी मेदोनीजच्या सैनिकांकडे त्या बादलीची मागणी केली. मात्र विरोधी गटाने हि बादली देण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या तेथील शासकाने त्यांच्याविरोधात युद्धाची घोषणा केली.

२००० जणांचा मृत्यू

बोलोन्या कडे ३०००० पायदळाबरोबर २००० घोडेस्वार सैनिक होते. विरोधी सैन्याच्या तुलनेत हि संख्या फार मोठी होती. त्यामुळे त्यांनी युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या युद्धाला ‘वॉर ऑफ़ जैपोलिनो देखील म्हटले जाते.बोलोन्या सैनिकांच्या तुलनेत विरोधकांकडे फारच तुटपुंजे सैन्य होते. त्यांच्याकडे केवळ ५००० पायदळ आणि २००० घोडेस्वार होते. या युद्धाच्या सुरुवातीला  मोदेनीजला बोलोन्याच्या सैनिकांनी चहुबाजूने घेरून घेतल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात अडचण झाली. त्याचबरोबर आसपासच्या मैदानांवर आणि डोंगरांवर देखील त्यांनी कब्जा केला होता.

    जवळपास ६ सैनिकाच्या पाठी १ सैनिक असे हे गणित झाले होते. मात्र तरीदेखील बोलोन्याच्या सैनिकांना न घाबरता अतिशय बहादुरीने  मोदेनाच्या सैनिकांनी त्यांचा सामना केला. त्याचबरोबर त्यांनी केवळ या सैनिकांचा सामनाच केला नाही तर शहरामध्ये घुसण्यास देखील यश मिळवले. तसेच रेनो नदीवर असणारे अनेक महाल देखील नष्ट केले. एका धरणाचे देखील दरवाजे तोडल्याने त्यांना पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला. त्यांनी शहरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावेळी त्यांना संपूर्ण शहरावर ताबा मिळवणे शक्य होते. मात्र त्यांनी ते काहीही न करता आपल्या विरोधकाला अपमानित करण्याचे ठरविले.

     यासाठी त्यांनी आपल्या शाहिद सैनिकांना श्रद्धांजली आणि विरोधकांना अपमानित करण्यासाठी एका घोड्याच्या शर्यतीचे आयोजन केले. त्याचबरोबर ते इतक्यावरच थांबले नाहीत तर जाताजाता त्यांनी पुन्हा एकदा शहराच्या बाहेरिल एका विहिरीतील आणखी एक बादली चोरून नेली. या सर्व भयानक युद्धात जवळपास २००० लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याचबरोबर या युद्धाच्या वेळी आणखी दोन गटांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात युद्ध रंगले होते. गुआल्फ आणि  गिबेलिन्स या दोन गटांमध्ये राजकीय वैमनस्यातून मोठ्या प्रमाणात हिंसक झडप सुरु होती. राजकीय वर्चस्व वादावरून देखील या दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध सुरु होते.

बादली मिळाली कि नाही

युद्ध झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शांतता करार झाला. मोदेनाने लुटलेल्या संपत्तीपैकी काही प्रमाणात परत दिली. मात्र त्यांनी चोरलेली बादली काही परत दिली नाही. आजदेखील ती बादली त्यांच्याच ताब्यात आहे. मोदेना शहरात हि बादली टॉरे डेला घेरालैंडिना या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर येथिक वस्तू संग्रहालयामध्ये या बादलीची प्रतिकृती आजदेखील आपल्याला पाहायला मिळते.