Featured

आवळा खाण्याचे हे दहा फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

आवळा विटामीन सी चा स र्वात चांगला सोर्स आहे. त्यामुळे आपन नियमित  आवाळ्याचे सेवन करायला  हवे. आवळा हा चवीला काहीसा तुरट असतो. परंतु केस , डोळे , त्वचेसाठी आवळा उपयुक्त आहे. आवळा  खाल्यामुळे तुमच्या त्वचेला खूप फायदे होतात. आज आपण जाणून घेणार आहोत आवळा खाण्याचे दहा फायदे . डायबीटीस असलेल्या लोकांसाठी आवळा खूप गुणकारी आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आवळा खूप उपयूक्त आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तीने जर रोज सकाळी आवळ्याचा रस व मध जर एकत्र करून पिला तर त्याचा त्या पेशंटला खूप फायदा होऊ शकतो.

पोटाच्या  समस्याने अनेकजण त्रस्त असतात. अशा लोकांसाठी आवळा पाऊडर खूप उपयुक्त आहे.  आवळा  पाऊडर  साखर  आणि चिमूटभर मीठ एकत्र करून जर  प्यावे त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात फरक पडतो. अनेकांना अॅसिडिटीचा त्रास असतोच अशांसाठी आवळा खूप उपयुक्त आहे. मुतखड्यासाठी उपयुक्त  – अनेकांना मूतखडा होतो. त्यातील स्टोन फुटून पाडण्यासाठी आवळ्याचा रस प्यावा. आवाळ्याची पाऊडर किमान 40 दिवस प्यावे.  मूतखडा कमी होतो.

अनेकांना शरीरात रक्ताची कमी जाणवते अशा लोकांसाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे.  हीमोग्लोबिन वाढविण्यासाठी  आवळा खूपच फायदेशीर आहे. आवळ्यातील पोषक तत्वे शरीरातील रक्ताच्या कोशिका वाढवितात. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते अशा लोकांनी आवळा खावा. जरआवळा उपलब्ध  नसेल तर आवळा चूर्ण , आवळा सुपारी खावी.

 ज्या लोकांना मोतीबिंदू अशा लोकांनी आवळा चूर्ण आणि मध एकत्र करून खावे. डोळ्यांची रोशनी वाढविण्यासाठी आवळा खूप उपयुक्त आहे. ज्यांना  चश्मा आहे , अशा लोकांनी देखील आवळा खावा.  आवळा खाल्यामुळे खूप फायदा होतो. जेव्हा खूप ताप येतो तेव्हा देखील आवळ्याचा रस त्यासाठी गुणकारी आहे. आवळ्याचा रस घेतल्यामुळे ताप लवकर कमी होतो. अनेकांना दात  किडण्याची देखील समस्या निर्माण होत. दांत किडल्यामुळे तो दुखू देखील लागतो अशा वेळेस आवळ्याचा रस व  कापुर एकत्र करून जर हिरड्यांनावर लावला तर किडीमुळे जर दांत दुखत असतील तर ते देखील कमी होते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर देखील खूप त्रास होतो , अशा वेळेस शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आवळ्यांचा रस खूप गुणकारी आहे. तुम्ही कच्चा आवळा किंवा आवळा सरबत देखील पिऊ शकता. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी  आवळा खूप उपयुक्त आहे. त्यामुळे  आपण आवळ्याचे पदार्थ खावेत. मोर आवळा आणि  गाईचे दुध जर रोज  सकाळी घेलते तर तुमची स्मरणशक्ती उत्तम रीतीने वाढते.

चेहऱ्यांवरील डाग – धब्बे घालवण्यासाठी आवळा  अतिशय  उपयुक्त  आहे.हाडांच्या मजबुतीसाठी आणि पोटाच्या विकारांसाठी तुम्ही कोमट पाण्यात आवळा पावडर घालून रोज सकाळी घेऊ शकता. याशिवाय आवळा पावडर भिजवून ती केसांनाही लावली जाते. आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.तसेच आहारात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास केस जास्त गळतात आणि कोंडा होण्याची समस्या होते. पण आवळ्याचे सेवन केल्याने आणि आवळ्याच्या तेलाने केसांची मालिश केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. यासोबतच केस दीर्घकाळ काळे आणि दाट राहतात. याचप्रमाणे आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.