Featured Food Food & Drink

श्रीखंडाला श्रीखंड हे नाव कसे मिळाले असेल ? जाणून घ्या यामागील रंजक कारण

 श्रीखंडाला  श्रीखंड हे नाव कसे मिळाले असेल ? जाणून घ्या यामागील योग्य कारण
 अनेक पदार्थ आपण खात असतो. पण त्याला ते नाव कसे मिळाले असेल असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. आपण आई व आजूबाजूच्या मोठ्या लोकांना देखील विचारतो. अनेक वेळा एखादा पदार्थ बनविताना त्यामध्ये काय वस्तु वापरल्या जातात त्यावरून र+त्याचे नाव पडते. पदार्थाचे नाव हे प्रत्येक विभागानुसार वेगळे असते. ती बनविण्याची पद्धत देखील वेगळी असते. आज आपण अशाच एका पदार्थाच्या नावा मागीची कथा जाणून घेणार आहोत. तो गोड पदार्थ आहे श्री खंड यापदार्थाला हे नाव कस पडल हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे कोणताही सण असला की गोड पदार्थ केलाच जातो. पुरणपोळी ,श्री खंड हे ठरलेले दोन गोड पदार्थ  आहेत.  मुळात श्रीखंड हा शब्द संस्कृतधील चंदन या शब्दाला पर्यायी शब्द आहे.

देवाला चंदन लावताना त्यामध्ये केशर, कपूर, कस्तुरी, असे सुगंधी पदार्थ घालून त्याची उटी देवाला अर्पण करतात. आणि भाषा सौंदर्य असे की परमेश्वरा प्रित्यर्थ उच्चार करताना कुठल्याही गोष्टीला श्री अशी उपाधी लावण्याची प्रथा आहे. जसे श्रीमुख, श्रीकर, श्रीचरण इत्यादी त्यामुळे श्री हा शब्द वापरतात आता आपण खंड हा शब्द का वापरतात ते पाहू या नैवेद्य समर्पण करताना नुसतेच साधे दही, लोणी अर्पण न करता त्यामध्ये केशर, वेलची, खडीसाखर व इतर सुकी फळे असे मिश्रण करून त्याचा एकत्रित नैवेद्य देवास अर्पण केला जातो. खंड म्हणजे पदार्थाचा भाग अथवा तुकडा. दूध, दही, तूप हे संपन्नतेचे, त्यामुळे श्रीखंड हा शब्द तयार झाला. श्री म्हणजेच देवाला लावला जाणारा गंध ,ज्यामध्ये अनेक गोष्टी मिसळलेल्या असतात. खंड म्हणजे वेगवेगळे भाग. तसेच आपल्याला हे देखील माहीत आहे.

श्री कृष्णाला दही ,लोणी खूप प्रिय असते. परंतु ते नुसते तसे देता येत नाही ,त्यामुळे त्यामध्ये अनेक पदार्थ  घातले जातात म्हणजेच  खंड घातले जातात. त्यामुळे दहयापासून बांवविलेल्या पदार्थाला श्रीखंड म्हणतात.  श्रीखंड ह्या शब्दाचा अर्थ चंदनाचा तुकडा. चन्दन दाट, घट्ट उगळले की ते श्रीखंडासरखे दिसते. म्हणूनच बहुधा त्याला श्रीखंड नाव दिले असावे.