Entertainment Featured

‘या’ साऊथच्या सुपरस्टार ची सून आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलीवूड मध्ये ज्याप्रमाणे घराणेशाही असते तसेच घराणेशाही ही प्रादेशिक चित्रपट सृष्टी मध्ये सुद्धा दिसून येते. बॉलीवूड मध्ये जसे बच्चन खानदान, कपूर खानदान या घराण्यांमध्ये जवळपास सर्वच जण हे सुपरस्टार आहेत. बच्चन कुटुंबामध्ये सासू-सासरे, मुलगा सून हे सर्व सुपरस्टार आहेत अगदी त्याच प्रमाणे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा असे घराणे आहे ज्यामध्ये मुलगा आणि सासरे सून हे तिघे दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत. हे घराणे म्हणजे नागार्जुन या तमिळ तेलगू चित्रपटांमधील सुपरस्टारचे होय. मुलगा नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू उर्फ समंथा अक्कीकेनी होय.

समंथा रुथ प्रभू ही भारतीय चित्रपट सृष्टीतील सौंदर्यवती अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये समंथाने प्रामुख्याने अभिनय केला आहे व तिच्या अभिनयाचे कौतुक सुद्धा झाले आहे . 2017 साली समंथाने नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य यांच्यासोबत विवाह केला व ती नागार्जुन यांच्या कुटुंबाचा भाग बनली. नागार्जुन दक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे बॉलीवूड मध्ये सुद्धा अभिनय केलेले अभिनेते आहेत.

दक्षिण भारतातील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्यांमध्ये नागार्जुन चा प्रथम क्रमांक आहे. तीन हजार करोड रुपये इतकी संपत्ती नागार्जुन यांची आहे. समंथाने नागा चैतन्य प्रमाणे नागार्जुना या आपल्या सास-यांसोबत सुद्धा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लग्नाअगोदर नागा चैतन्य आणि समंथा हे काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.त्यानंतर समंथा आणि नागा चैतन्य  त्यांनी विवाह केला .समंथा ही सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय आहे. मध्यंतरी पूजा हेगडे ने समंथाच्या दिसण्यावर तिचे अकाऊंट हँक झाल्यावर केलेल्या कमेंटनाही समंथाच्या चाहत्यांमध्ये एकच रोष निर्माण झाला होता.पण या सर्व परिस्थितीला समंथाने अतिशय शांततापूर्ण व संयमी पद्धतीने हाताळून या वादावर पडदा टाकला.