Articles Featured

लवकर प्रेमात पडत नाही ‘या’ राशीचे लोक : प्रेमापासून असतात दोन हात लांब

astrology
astrology

प्रेमाच्या बाबतीत सगळ्यांचे मते वेगवेगळी असतात. त्याचबरोबर सर्वांचे नशीब देखील वेगवेगळे असतात. काही जणांसाठी रिलेशनशिप म्हणजे आपल्या जोडीदारासोबत खुश राहणे. त्याचबरोबर हे लोकं फार लवकर प्रेमात पडतात आणि लवकरात लवकर लग्नाच्या बेडीमध्ये देखील अडकतात. तर काही लोकांचा प्रेमावर अजिबात विश्वास नसतो.प्रेमाच्या नावावर ते अनेक लोकं केवळ प्रश्नच उपस्थित करतात. तर आपल्या जोडीदारावर देखील नेहमी शंका उपस्थित करत असतात. अशा प्रकारची लोकं प्रेम तर करतात मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याचबरोबर प्रेमामध्ये यश किंवा अपयश हे तुमच्या नशिबावर देखील अवलंबून आहे.

आजच्या लेखात आपण कोणत्या राशीच्या लोकांना प्रेम करणे खूप अवघड आहे याचा मागोवा घेणार आहोत.

१)मेष
मेष स्वभावाचे लोकं आपल्या अडेल स्वभावासाठी ओळखले जातात. या लोकांमध्ये धैर्य फार कमी असते. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी त्यांना हवी असतात. नात्यामध्ये सर्व आपल्या मनासारखे झाले नाही तर हे आपल्या जोडीदाराला इग्नोर करण्यास सुरुवात करतात. आपल्या जोडीदाराकडून यांच्या खूप अपेक्षा असतात. आपल्या नात्याला पुढे नेण्यात हे खूप वेळ घेतात. त्यामुळे दुसरा व्यक्ती देखील त्यांच्या प्रेमात पडणे फार अवघड आहे. यांचा प्रेमावर फार कमी विश्वास देखील असतो.

२)वृश्चिक
या राशीचे लोकं खूप भावुक आणि बुद्धिमान असतात. प्रेमात खूप विश्वास असतो. त्याचबरोबर प्रेमात ते आपल्या जोडीदाराबरोबर खूप प्रामाणीक असतात. मात्र यांच्यामध्ये देखील एक मोठी समस्या आहे. जोपर्यंत आपल्या प्रेमाविषयी त्यांना खात्री होत नाही तोपर्यंत ते आपल्या प्रेमाचा स्वीकार करत नाहीत. त्याचबरोबर समोरच्या जोडीदाराविषयी त्यांना विश्वास बसत नाही तोपर्यंत ते प्रेम करत नाहीत. अनेक वेळा यांच्या मनामध्ये काय चालले आहे याचा त्यांच्या जोडीदाराने पत्ता लागत नाही. त्यामुळे या राशीच्या लोकांचा प्रेमामध्ये पडण्याचा टक्का फार कमी आहे.

३)धनु
उत्साही आणि साहसी असणाऱ्या या लोकांसाठी प्रेम खूप महत्वाचे आहे. प्रेमामध्ये पडल्यामुळे आपले स्वातंत्र धोक्यात येईल याची त्यांना भीती वाटते. या राशीचे लोकं विविध प्रयोग करणे पसंद करतात. लवकर त्यांना एका वस्तूचा कंटाळा येतो. यांना सोबत ठेवण्यासाठी त्यांच्या जोडीदारांना विविध प्रयोग करावे लागतात. मात्र इतकं सगळे होऊनदेखील या राशीच्या लोकांनी नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना कुणीही अडवू शकत नाही. मात्र एकदा प्रेमात पडल्यास ते आपल्या जोडीदाराबरोबर प्रामाणिक असतात.

४)तुला
मजा मस्ती करणारे या राशीचे लोकं खूप वेगळी असतात. यांचे सामाजिक स्थान खूप मोठे असते. नात्यामध्ये या राशीच्या लोकांना दबाव आवडत नाही. मात्र नात्यात नेहमी ते कन्फ्युज असतात. काही गोष्टींवरून अनेक दिवस ते चिंता व्यक्त करत बसतात. यामुळे स्वतःला देखील ते त्रास करून घेतात. त्यामु,ले या राशीचे लोकं लवकर प्रेमात पडत नाहीत. त्याचबरोबर आपण घेतला निर्णय बरोबर आहे कि नाही याचा देखील मोठ्या प्रमाणात ते विचार करत असतात.

५)कुंभ
या राशीचे लोकं आपल्यावर कुणालाही दबाव टाकून देत नाहीत. त्यांचा स्वभाव देखील लवकर समजून येत नाही. नात्यांच्या बाबतीत यांचे विचजर खूप काल्पनिक असतात. यामुळे वास्तविक जीवनात देखील हे विचार अमलात आणण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर कोणताही सल्ला या राशीचे लोकं सकारात्मक पद्दतीने घेत नाहीत. त्यांना काही बोलल्यास ते आपल्या जोडीदारापासून अंतर राखायला सुरुवात करतात.

६)मीन
या राशीचे लोकं खूप रचनात्मक आणि कल्पनाविलासी असतात. जगाला वेगळ्या विचारातून पाहण्याचा त्यांचा विचार असतो. या राशींच्या पार्टनरला खुश करणे आनंदी ठेवणे फार अवघड आहे. नात्यांमध्ये खूप कल्पनाविलास करणारे हे राशीचे लोकं आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या प्रेमात पडणे खूप अवघड आहे.

About the author

Being Maharashtrian