Featured

काळा चहा पिण्याचे फायदे , काळा चहा हा वेगळा प्रकार आहे का ?

काळा चहा पिण्याचे फायदे ? काळा चहा हा वेगळा प्रकार  आहे का चहा आणि भारतीय लोक एक वेगळे समीकरण आहे. चहा आणि वेळ म्हणजेच वेळेला चहा लागतोच पण चहाला देखील वेळ नसते. त्यामुळे चहा आणि आपण याबाबत चर्चा किती देखील झाली तरी कमी आहे. चहाचे अनेक प्रकार उदयाला आले आहेत. जसे की ग्रीन टी , ब्लॅक टी , लेमन टी चहा कोणताही असो सर्वांची चव वेगळी असते आणि त्यांचे गुणधर्म देखील  वेगेळे असतात. त्यामुळे ते जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आज आपण ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. 

ब्लॅक टी हा अनेक प्रकारांनी आपल्या आरोग्याला उपकारक ठरतो. सकाळी हा ब्लॅक टी प्याल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून आपली सुटका होते. मात्र हा ब्लॅक टी आपल्या नेहमीच्या चहाप्रमाणे दूध घालून तयार करीत नाहीत. तो दुधाशिवाय केला जात असतो. काही लोक तर हा चहा साखरही न घालता करीत असतात.

त्वचेला काही कारणाने खाज येत असेल तर त्यावर काळा चहा हा एक उत्तम उपाय आहे. तुम्हाला खाज येत असणाऱ्या ठिकाणी चहापत्ती असणारी थंड टी बॅग लावा आणि मग परिणाम पाहा. तुम्हाला ज्या ठिकाणी खाज येत असेल अथवा जळजळत असेल तिथली खाज अथवा जळजळ काही मिनिट्समध्ये काळ्या चहामुळे नाहीशी होते.

योग्य प्रमाणात काळा चहा प्यायल्याने मुतखड्यापासून बचाव होऊ शकतो. ज्या स्त्रिया नियमित ब्लॅक टी घेतात त्यांच्यामध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता 8 टक्के कमी असते.ब्लॅक टी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बरेचसे पोटाचे विकार कमी होऊ शकतात. अतिसार आणि उलट्या होण्यालासुद्धा यामुळे अटकाव होतो. चहा सेवनामुळे यात असलेल्या पॉलीफेनॉल्समुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत सुधारणा होऊन मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवू शकतो. काळा चहा पिणाऱ्यांच्या देशात काही प्रकारचे मधुमेह खूपच कमी प्रमाणात आढळतात.

 त्वचेचा रंग गोरा होण्यासाठी काळा चहामध्ये कापसाच्या बोळा भिजवून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचा रंग तर गोरा होतोच शिवाय त्वचेची चमकदेखील वाढते. काळा चहा चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होऊन चेहऱ्यावरील काळे डागही निघून जातात. चहामधील अँटीऑक्सीडेंट्स न्यूट्रिएंट्स अनेक ब्यूटी प्रॉब्लम दूर करतात. ब्यूटी एक्सपर्ट अफरोज अली काळा चहा चेह-यावर लावण्याचे अनेक फायदे संगितले आहेत ,जसे  की  ब्लॅक टी लावल्यामुळे चेहेऱ्यावर एक वेगळीच चमक येते. दाडी केल्यानंतर चेहऱ्यावर ब्लॅक टी थंड करून लावावा ,त्यामुळे चेहऱ्याची त्वचा खरमरती होत नाही.  ब्लॅक टीमुळे डार्क सर्कल कमी होतात.

 काळा चहा प्यायल्याने अनेक रोगांपासून आपल्याला दूर राहाता येतं. पण असं असलं तरीही याचं सेवन तुम्ही अतिशय मर्यादेत करायला हवं. याचं अतिरिक्त सेवन करणं योग्य नाही. आपल्याला आलेला थकवा आणि आळस काढून टाकण्यासाठी याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग होतो कारण यामधील अँटिऑक्सिडंट्स यासाठी महत्त्वाचं पोषण असतात.

अलर्जीने काही जणांच्या अंगावर लालसर पट्टे उठतात. त्यावर उपाय म्हणून तुम्ही काळ्या चहाचा वापर करू शकता. या पाण्यामुळे तुम्हाला त्रासातून सुटका मिळू शकते. लालसर पट्टे अंगावर चांगले दिसत नाहीत. पण घरच्या घरी हे उपाय तुम्ही करू शकता. अनेक वेळा आपण खूप वेळ पायात मोजे ठेवतो ,त्यामुळे पायांचा भयंकर वास  येतो ,अशा वेळेस पायाची दुर्गंधी ही अतिशय खराब असते. यापासून सुटका हवी असेल तर काळ्या चहाची तुम्हाला यासाठी मदत होऊ शकते. काळा चहा तयार करून घ्या. पाणी थंड होण्याची वाट पाहा. नंतर तुम्ही तुमच्या पायाला हे काळं पाणी लावा. काही मिनिट्ससाठी ते तसंच ठेवा. यामुळे तुमच्या पायावरील बॅक्टेरिया आणि फंगल निघून जाईल.  

तोंडाच्या देखील अनेक समस्या नेहमीच सतावत असतात. आपण सतत काही ना काहीतरी खात असतो. त्यामुळे दात पिवळसर होत असतात. तुमचे दात निरोगी ठेवायचे असतील तर त्यासाठी काळा चहा हा एक चांगला पर्याय आहे. ब्लॅक टी मधील पॉलिथिन्स हे तुमच्या दातातील कॅव्हिटी रोखण्यास मदत करतं. तसंच तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया मारण्यासाठीही याचा उपयोग होतो.कोणत्याही गोष्टीचा अतितरेक करू नये. त्याचे अनेक तोटे देखील होतात. नियमितपणे काळा चहा प्यायल्यामुळे हृदयाच्या धमण्यांची कार्यक्षमता वाढते आणि धमणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार कमी होण्यास मदत होते.

असा बनवा ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा – उकळत्या पाण्यात एक चमचा सीटीसी /ममरी/डस्ट टाकून चवीनुसार २-३ मिनिट उकळावा.बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट.

चहा च्या उपचाराचा परिणाम झाल्यामुळे चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य, nofilin, hypoxanthine, वनस्पती व प्राणी यांच्या पेशीजालामध्ये आढळपारा पदार्थ, न्यूक्लिओप्रोटीनच्या चयापचयातून युरिक असिड तयार होण्याअगोदरची पायरी आणि इतर समाविष्ट आहेत या alkaloids उपस्थिती, सहसा आहे. हिरव्या त्यांना पुरेशी, आणि काळा चहा, आणि, ते अशक्य आहे म्हणून, एक चहा उपयुक्त बोलणे.