Articles Featured Politics

मिलिटरीच्या गाड्यांचे नंबर वेगळे का असतात ?

भारतीयांना किंवा कोणत्याही देशातील लोकांना त्यांच्या संरक्षण यंत्रणेविषयी खूप कुतूहल असते. असे देखील   असे देखील मानले मानले जाते ,ज्या देशांची संरक्षण व्यवस्था जितकी मजबूत असते तितके त्या देशाचे जगातील स्थान महत्वाचे मानले जाते. भारताचे जगातील स्थान सर्वत्तम आहे. कारण आपले सैनिक आणि संरक्षण विभाग हा खूप धाडसी व शूर आहे. जेव्हा आर्मी किंवा मिलिटरीच्या गाड्या आपल्या समोरून जातात तेव्हा आपल्याला एक वेगळंच आकर्षण वाटते. आपण त्या गाड्यांचे अगदी बारकाईने निरीक्षण करतो.

तेव्हा आपल्या लक्षात येते अरे या गाड्यांचे नंबर आपल्या गाड्यांपेक्षा वेगळे आहेत. आज आपण या मागील कारण जाणून घेणार आहोत. मिलिटरीच्या गाड्या या संरक्षण विभागाच्या अंतर्गत रजिस्टर झालेल्या असतात. या सर्व गाड्यांवर एक चिन्ह असते हे चिन्ह संरक्षण विभागाचे असते. त्या नंतर एक नंबर असतो. हा नंबर गाडी ज्या साली घेलती आहे.

त्या सालावरून ठेवला जातो. जसे की एखादी गाडी २००३ साली घेतली असेल ,तर ०३ असे लिहिले जाते. या दोन अंकाअगोदर बेस कोड ,व त्या आधी गाडी क्रमांक असतो. पुढे असतो  गाड्यांचा दर्जा. असे लिहिण्यामागचे कारण असे की , जर चुकून गाडीची नंबर प्लेट उलटी लागलि  तर या वरील चिन्हाच्या माध्यमातून ओळखता येते. या गाड्यांच्या प्लेट या हिरव्या किंवा काळ्या रंगाच्या असतात. संरक्षण विभागाचे अधिकारी केवळ अधिकृत कामासाठी या गाड्या वापरतात. या गाडयांना  गरजेच्या वेळेस सिग्नल्स न पाळण्याचे देखील परवानगी असतात.