Featured Festival Inspirational Religion

संकष्टी चतुर्थी का करतात ? अंगारकी व संकष्टी चतुर्थी यामध्ये काय फरक आहे.


गणपती बाप्पा असे दैवत आहे ,जे लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वानाच आवडते. गणपती बाप्पाची वर्षभर पूजा केलीच जाते ,पण गणेश उत्सव देखील १० दिवस उत्सहात साजरा केला जातो, आपण  दर महिन्याला गणेश उपासना करतो. आज आपण जाणून घेणार आहोत ,की संकष्टी  चतुर्थी का करतात या मागील कथा जाणून घेणार आहोत. 

यामागील एक कथा प्रचलित आहे ..
एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की ” आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!” शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवश ” भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी ” तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत” करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत ” केल्यामुळे गेला, अशी कथा आहे.

हे व्रत कोण करू शकते –  आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे.श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात.प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या.आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति श्रीगणेशा ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि चंद्रोदया नंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो.  संकष्टी चतुर्थी  कधी असते- संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी “संकष्टी चतुर्थी” असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपवास  करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपवास  सोडावयाचे. अशी या व्रताची थोड्क्यांत पाळ्णूक आहे. ” श्रीसंकष्टहरगणपती” हे या व्रताच्या देवतेचे नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषाने, व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापन करावे. काहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणार्‍यांनी सोड्ण्यापूर्वी नेहमी संकष्टी चतुर्थी महात्म्य” अवश्य वाचावे. संकष्टचतुर्थीचे व्रत करणाराने त्यादिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावा. 

अंगारकी व संकष्टी चतुर्थी यामध्ये काय फरक आहे- अंगारकीचतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा अंगारकी असते आणि दर महिन्याला दुसऱ्या पंधरवड्यात येते आणि  जी मंगळवारी येत नाही तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात