Featured Health

तोंडातून दुर्गंधी का येते ? जाणून घ्या कारणे आणि उपाय

आपण अनेक वेळा समोरच्या व्यक्तीशी बोलतो , तेव्ह त्या व्यक्तीच्या  तोंडातून जर दुर्गंधी येत असेल तर मात्र खूप त्रासदायक व किळसवाणे वाटते. कधी- कधी आपल्या स्वतालाच तोंडाचा प्रचंड वास येतो. तोंडाची दुर्गंधी येते. आज आपण या लेखात पाहणार आहोत ,तोंडाची दुर्गंधी का येते  कारणे ,उपाय जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण रात्री झोपतो ,तेव्हा आपण एक वेगळी व्यक्ति असतो आणि जेव्हा आपण झोपेतून उठतो ,तेव्हा आपण एक वेगळी व्यक्ति असतो. म्हणजे जसे की जेव्हा आपण झोपेतून उठतो ,तेव्हा आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असते. जर झोपेमुळे आपला थकवा निघून गेलेला असला तरी आपल्या तोंडाच्या दुर्गंधीमुळे आपण मात्र अस्वस्थ होतो. आपल्यातोंडात एक वेगळ्या प्रकारचे बैक्टीरिया  असतात ,जे आपल्या तोंडात सतत राहत असतात. जेव्हा रात्री आपण झोपतो ,तेव्हा आपल्या तोंडात अनेक अन्नाचे कण जमा झालेले असतात.

आपल्या तोंडातील हे बैक्टीरिया यांना हे अन्नाचे कण फार प्रिय असतात. हे बैक्टीरिया  आपल्या तोंडांतच राहत असतात ,त्यांना अन्नाचे कण फार प्रिय असतात. हे बैक्टीरिया  आपल्या तोंडातील डेड सेल्सला देखील खातात. हे बैक्टीरिया  कायमच आपल्या  तोंडात वास्तयावस असतात. ते इतर बाहेरील बैक्टीरिया  येऊन देखील नाहीत. हे बैक्टीरिया आपल्या तोंडातील उरलेले अन्नाचे कण खातात. जर तुमचे दात खूप अधिक किडलेले असतील तर तोंडातील हे बैक्टीरिया त्यासाठी जबाबदार असतात. या बैक्टीरियामुळेच आपल्या तोंडाची दुर्गंधी येते. जसे -जसे हे बैक्टीरिया आपल्या तोंडातील उरलेले अन्न खातात तसे -तसे ते काही टाकाऊ पदार्थ देखील  त्यांच्या शरीराबाहेर टाकतात. म्हणजेच काय तर आपल्या तोंडातून जी दुर्गंधी बाहेर येते ती या टाकाऊ पदार्थयामुळेच  येते. तुम्ही विचार कराल की मग जी दुर्गंध येतो तो वेगवेगळ्या प्रकारचा कसा येतो. तर त्या वेगवेगळ्या केमिल्सची वेगवेगळी दुर्गंधी येते. जसे की सडक्या अंड्याचा वास येतो ते केमिल्स  हाइड्रोजन सल्फाइड होय. मेथेनथिओल(Methanethiol)  ज्याला  फर्ट स्मेल देखील म्हणतात.  कड़वेरिने(Cadaverine)  म्हणजेच ज्याला सडक्या अंड्यासारखा वास येतो.  कड़वेरिने(Cadaverine)  म्हणजेच सडके मांस होय. अशा प्रकारचे कित्येक वास  आपल्या तोंडातून येत असतात.

तुम्ही विचार कराल की तोंडातून  दुर्गंध फक्त  सकाळीच का येतो ? तर त्या मागील कारण असे आहे की आपण दिवसभर सतत काहीना काही  खात असतो ,पाणी पित असतो किंवा आपले तोंड सतत चालूच असते त्यामुळे  आपल्या तोंडातील किटणूना सतत धुतले जातात. पण रात्रीच्या वेळेस किमान आपण 7 तास तरी काही खात नाही. त्यामुळे त्या काळात किटाणू अधिक सक्रिय होतात. त्यामुळे तोंडाची अधिकच दुर्गंधी येते. या बरोबरच हिरड्यातून देखील अनेक वेळा दुर्गंध येते. हिरड्यांचा काही त्रास असेल तरी देखील असे होऊ शकते.  हिरड्यांच्या समस्येमुळे मुखदुर्गंधीचा त्रास जाणवतो. अन्न बेचव लागते व श्‍वासाला दुर्गंधी येते. विषाणूंमधून स्रवणार्‍या प्लेक नावाच्या स्रावामुळे ही समस्या उद्भवते. तुमच्या दातांवर विषाणूंचा व या प्लेकचा थर जमतो. यामुळे हिरड्या कमकुवत हिरड्यांमुळे दातांचा आधार ढिला होतो व दात पडतात.अनेक जणांना अपचनाचा देखील त्रास होतो. त्यामुळे देखील त्यांच्या तोंडातून दुर्गंध येते. अनेक वेळा मधुमेह असलेल्या  लोकांच्या  तोंडातून देखील दुर्गंधी पसरते. कारण त्याच्या रक्तातील साखर संपूर्णपणे विरघळत नाही त्यामुळे देखील तोंडातून देखील मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. अनेकजण रात्री कांदा – लसूण किंवा कच्चा कांदा खातात शक्यतो. असा कांदा खाणे टाळावे, यामुळे तोंडातून मोठ्या प्रमानात दुर्गंधी येते.

तोंडातून दुर्गंधी येत असेल तर काय उपाय करावेत -लसणातील सल्फर हे दुर्गंधीमागचं सर्वात मोठं कारण आहे. सल्फर हा एक रासायनिक घटक आहे, ज्याचा दुर्गंध सडलेल्या अंड्यासारखा येतो. लसूण खाल्ल्यानंतर तोंडातील बॅक्टेरिया आणि सल्फर यांचं कॉम्बिनेशन होतं, त्यामुळे हा दुर्गंध येतो. लसूण खाल्ल्यानंतर लगेचच तोंड धुऊन काढावं, किंवा ब्रश करावा. यामुळे तोंडातून जास्त वेळ दुर्गंधी येणार नाही. माऊथ फ्रेशनर हा देखील एक चांगला उपाय ठरु शकतो.भरपूर पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ राहते. पाण्यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कणही निघून जातात. सकाळी उठल्याबरोबर विशेष करून जास्त पाणी प्यावे. तसेच उपवास असल्यास किंवा प्रवासामध्येही जास्त पाणी प्यावे. शक्यतो तोंड सुकायला देऊ नये.किमान दिवसातून दोन वेळा आपले दात स्वच्छ करा. जिभेच्या स्वच्छतेसाठी टंग क्लीनरचा वापर करा.चूळ भरण्याची सवय लावा  आजकाल हॉटेल्समध्ये बाऊल सिस्टीम चालते. यात हात वाटीमध्ये धुवून, ओठांना जरासं पाणी लावलं जातं. हॉटेल कितीही तारांकित असू द्या. शक्यतो चूळ भरूनच तोंड धुवा नाहीतर खाल्लेले अन्नकण दातांमध्ये अडकून मुखदुर्गंधी उत्पन्न करतात. तसेच कच्चा कांदा, लसूण यांच्या सेवनाने मुखदुर्गंधी अधिकच वाढते. म्हणून जेवल्यानंतर भरपूर पाण्याने चूळ भरून तोंड साफ करावे.आहारातील या बदलामुळे आज अनेक प्रकारचे रोग वाढत्या प्रमाणात दृष्टीस पडत असून मुखदुर्गंधीही त्यांपैकीच एक होय.
तसेच मुखदुर्गंधीचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिरव्या व पिवळ्या, केशरी अशा भाज्या व फळे खावीत.

रासायनिक फवार्‍यांचा विचार लक्षात घेऊन स्वच्छ भरपूर पाण्याने धुवून वापरावी. फळांमध्ये आवळा, पेरू, लिंबू, संत्री, अननस, केळी व आंबा यांचा वापर करावा. भाज्यांमध्ये पालक, मेथी, मुळा, भेंडी, पडवळ, दोडका, दुधी यांसारख्या भाज्यांचा वापर करावा.तसेच आयुर्वेदाप्रमाणे मुखदुर्गंधीचा जास्तच त्रास असल्यास शोधनोपचारामध्ये वमन द्यावे व तीक्ष्ण धूमपान द्यावे. त्याचप्रमाणे नस्याचाही उपयोग होतो. तत्पश्‍चात् लाजाळू धायटीची फुले, लोध्र, पद्मकाष्ठ यांच्या काढ्याने तोंड धुवावे.
त्रिफळा, चित्रक, काडेचिराईत, जेष्ठमध, त्रिकटू, नागरमोथा, हळद, दारुहळद, यवक्षार, पिंपळ, जांभूळ, ओवा, अर्जुन यांची साल, खैराची साल या सर्व दाट काढा करून त्यात त्याच औषधांचे चूर्ण घालून गोळ्या कराव्या. त्या गोळ्या नेहमी तोंडात धरल्या असता मुखदुर्गंधी बरोबर अन्य कोणताही मुखरोग असल्यास बरा होतो.अम्लपित्त होणे, अजीर्ण होणे आणि पोटात गॅसेस होणे हे तोंडाचा वास येण्याचे प्रमाण सर्वात अधिक्याने आढळणारे आणि महत्वाचे कारण आहे. त्यासाठी पोटाच्या आजाराची ट्रीटमेंट होणे गरजेचे आहे. नुसते तोंड धुवून आणि पेस्ट व ब्रश वापरून मुखदुर्गंधी दूर होऊच शकत नाही.

मुळावरच घाव घालणे गरजेचे आहे. मावा, गुटखा, तंबाखू, सिगारेट यांचे सेवन केल्याने मुखदुष्टी होऊन तोंडाला घाण वास येतो. म्हणून हे सुद्धा एक मुखदुर्गंधीचे एक कारण आहे.गोड किंवा आंबट चव असणारे पदार्थ तोम्ड धुण्यासाठी वापरू नयेत असे आयुर्वेद सांगतो. आज बाजारात उपलब्ध जवळपास सर्वच पेस्ट चवीला गोड आहेत.अति आंबट, मसालेदार पदार्थ, शिळे अन्न, आंबवलेले अन्न, चॉकलेट, गोळया, मद्यपान, विरुद्ध अन्न, इ रक्ताला बिघडवणारे पदार्थ अधिक सेवन केल्यास रक्त दुषित होऊन हिरड्यांच्या मांसात पाक उत्पन्न करून तेथे पू निर्माण होतो व त्यामुळे तोंडाला वास येतो. अशावेळी ब्रशने दात घासल्याने हिरड्यांना जखमा होऊन रक्त येते, पुन्हा पु होतो. दात ढिले होतात व लवकर पडतात. जेवण झाल्यावर ब-याचदा आपल्याकडे बडीसोप खाण्याची पद्धत आहे.ही बडीसोप खाल्याने पचनशक्ती सुधारते.बडीसोप एक उत्तम माऊथफ्रेशनर देखील आहे.बडीसोपमुळे अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते व जंतूंचा नाश होतो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही.

जेवणानंतर येणारे आंबट ढेकर व अॅसिडीटी बडीसोपमुळे कमी होते.दररोज थोडी बडीसोप चघळल्यामुळे तुमच्या तोंडातून चांगला सुगंध येऊ शकतो. स्वयंपाकामध्ये लवंग चव व सुगंधासाठी वापरण्यात येते.पुर्वीपासून दातदुखत असल्यास लवंग वापरण्यात येत असल्यामुळे आजकाल टूथपेस्ट व माऊथवॉश मध्ये देखील लवंग वापरण्यात येते.लवंगमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्यामध्ये अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असतात.तुम्ही कधीतरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता.हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.दालचिनीमध्ये देखील अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असल्यामुळे त्यामुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो.यासाठी तुम्ही एखादा दालचिनीचा तुकडा चघळू शकता किंवा ंदालचिनीचा एक कप चहा घेऊ शकता.त्याचप्रमाणे दालचिनीचे तुकडे पाण्यात उकळून ते तुम्ही माऊथवॉश करण्यासाठी देखील वापरु शकता.स्वयंपाकातील कांदा व लसूण या पदार्थांमुळे तोंडाला उग्र वास येतो.पण अन्नपदार्थावर कोथिंबीर टाकल्याने हा दुर्गंध कमी होऊ शकतो.जेवणानंतर कोथिंबीरींची काही पाने चघळा त्यामुळे तोंडांचा दुर्गंध निघून जाईल.किंवा चिमूटभर मीठासोबत धणे तव्यावर रोस्ट करा व चघळा.