नवरात्री २०१९ : शुभरंग आणि त्याची परंपरा

0
42

गणपती गेले की ‘चैन पडेना आम्हाला’ या आपल्या मन:स्थितीतून बाहेर येऊन आपल्याला नवरात्रीचे वेध लागले आहेत. २९ सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. आहे. २९ सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो.
नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणार्‍या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे. देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा गेल्या दशकभरापासून सुरू आहे. वाराप्रमाणे वस्त्रे परिधान केल्याने दिवस चांगला जातो किंवा तो रंग शुभ असतो ही आपली धारणा असते. न ऊ दिवसांत या रंगांमुळे साऱ्याजणी एकमेकींच्या जवळ येतात. त्यांच्यामध्ये समानता दिसते. या दिवसात गरीब- श्रीमंत अशी दरी दिसत नाही. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते. हे रंग एकमेकींना बांधून ठेवतात. म्हणून एकोपा, समानता यावी यासाठी नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली.

नवरात्री दिवस १
सप्टेंबर २९, (रविवार)
आज नवरात्रीच्या रंग – नारिंगी

नवरात्री दिवस २
सप्टेंबर ३०, (सोमवार)
आज नवरात्रीच्या रंग – पांढरा

नवरात्री दिवस ३
ऑक्टोबर ०१, (मंगळवार)
आज नवरात्रीच्या रंग – लाल

नवरात्री दिवस ४
ऑक्टोबर ०२, (बुधवार)
आज नवरात्रीच्या रंग – गहन निळा

नवरात्री दिवस ५
ऑक्टोबर ०३, (गुरुवार)
आज नवरात्रीच्या रंग – पिवळा

नवरात्री दिवस ६
ऑक्टोबर ०४, (शुक्रवार)
आज नवरात्रीच्या रंग – हिरवा

नवरात्री दिवस ७
ऑक्टोबर ०५, (शनिवार)
आज नवरात्रीच्या रंग – करडा

नवरात्री दिवस ८
ऑक्टोबर ०६, (रविवार)
आज नवरात्रीच्या रंग – जांभळा

नवरात्री दिवस ९
ऑक्टोबर ०७, (सोमवार)
आज नवरात्रीच्या रंग – मोर हिरव्या