Home » ‘दसरा’ हा सण का साजरा करतात,जाणून घ्या या सणाचे महत्व…
Festival

‘दसरा’ हा सण का साजरा करतात,जाणून घ्या या सणाचे महत्व…

दसरा हा सण हिंदुच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे.कारण या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंकापती रावण याचा वध केला होता.समाजामध्ये रावणासारख्या असणाऱ्या दृ’ष्ट’वृ’त्तीचे दहन व्हावे म्हणुन दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करुन हा सण साजरा करतात.यावर्षी हा सण १५ ऑक्टोबरला आला आहे.यावर्षी या दिवशी आणखी तीन मुहूर्त जुळून आल्यामुळे या दिवसाचे आणखी महत्त्व वाढले आहे. 

हिंदू धर्मामधील सर्वात महत्वाचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे ‘दसरा’.भारतामध्ये असे अनेक सण आहेत जे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.म्हणूनच भारताला सणांची भूमी म्हणून ओळखले जाते.याच उत्साहांपैकी एक सण म्हणजे ‘विजयादशमी’ यालाच आपण ‘दसरा’ म्हणुन ओळखतो.दसरा हा हिंदू लोकांचा प्रमुख सण आहे.हा सण अश्विन शुद्ध दशमी या दिवशी संपूर्ण भारतात अगदी उत्साहाने साजरा करतात.

दसरा हा सण प्रामुख्याने १० दिवसांचा असतो.पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना केली जाते त्यालाच आपण ‘घटस्थापना’ म्हणतो.घटस्थापना केल्यानंतर देवीचे नवरात्रीचे नऊ दिवस साजरे केले जाते.या नऊ दिवसामध्ये देवीच्या विविध रूपाची पूजा-अर्चना केली जाते.या नऊ दिवसांमध्येच लोक उपवास देखील पकडतात.

दहाव्या दिवशी दसरा उत्साहाने साजरा करतात.दसऱ्याच्या दिवशी ज्ञानाची देवी सरस्वती देवी हिचे पूजन केले जाते दसरा हा सण साजरा करण्यामागे अशा अनेक कथा आहेत.त्यापैकी एक म्हणजे लंकापती रावण याचा वध.असे म्हणतात रावणाचा वध करण्यासाठी भगवान श्रीराम यांनी नऊ दिवस उपवास करून आदिमाया,आदिशक्ती म्हणजे देवीची उपासना करून देवीच्या कृपेने दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला होता.म्हणूनच आजही दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करतात.

याच दिवशी देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला होता म्हणूनच देवीला महिषासुरमर्दिनी असे देखील म्हणतात.दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन,सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजा केली जाते.घरामध्ये शस्त्रपूजन केले जाते.या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन प्रत्येकाला दसऱ्याच्या शुभेच्छा देतात आणि सोने म्हणून आपट्याची पाने देतात.या दिवशी सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींचे दर्शन घेतात.या दिवशी शेतकरी बांधव आपल्या शेतीतील अवजारांची आणि विद्यार्थी त्यांच्या पुस्तकाचे पूजन करतात.

या दिवशी आपट्याच्या पानांना विशेष महत्व दिले जाते.दसरा म्हणजे एक आनंद आणि उत्साहाचा सण होय.विजयादशमी हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.या दिवशी लोक नवीन घर,दागिने,वाहने किंवा घरात लागणाऱ्या कोणत्याही वस्तूची खरेदी करतात.विजयाची प्रेरणा देणारा हा सण पूर्ण भारतात अत्यंत आनंदाने साजरा केला जातो.

दश-हरा या शब्दाचा अर्थ म्हणजे वाईट गोष्टींचा अंत.अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवला होता म्हणून याला ‘विजयादशमी’ म्हणतात.दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना वाटली जातात सगळ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा यासाठी या दिवशी पाने वाटतात.