Articles Festival

मकर संक्रांति म्हणजे नेमके काय? जाणून घ्या मकर संक्रान्तिचे अध्यात्मिक ९ गोष्टी..

मकर संक्रांति म्हणजे नेमके काय? जाणून घ्या मकर संक्रान्तिचे अध्यात्मिक ९ गोष्टी..
मकर संक्रांति म्हणजे नेमके काय? जाणून घ्या मकर संक्रान्तिचे अध्यात्मिक ९ गोष्टी..

भारत हा.अठरापगड जाती ,धर्म व संस्कृती यांना एकत्रितपणे गुंफणारा देश आहे. या अठरापगड जातींना, धर्मांना व संस्कृतींना एकत्र बांधून ठेवणारा धागा म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे निरनिराळे सण आणि उत्सव होय. भौगोलिक दृष्ट्या विखुरलेल्या निरनिराळ्या राज्यांमध्ये एकाच सणाला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते व तो साजरा करण्याचे प्रकारही वेगवेगळे असतात. मात्र याचे मूळ म्हणजे समाजाला सण व उत्सवाच्या निमित्ताने भेदभाव दूर सारून सकारात्मकतेने पुढे सरकण्याची ऊर्जा देणे हे आहे. नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे पौष महिन्यातील प्रसिद्ध सण म्हणजेच संक्रांति अगदी उद्यावर येऊन ठेपली आहे .संक्रांतीच्या अगोदर येणारी भोगी आज आपण साजरी करत आहोत यानिमित्ताने मकर संक्रांति म्हणजे नेमके काय हे आज आपण जाणून घेऊया.

1.मकर संक्रांति हा सण प्रामुख्याने इंग्लिश कालगणनेप्रमाणे जानेवारी महिन्यात तर भारतीय सौर कालगणनेप्रमाणे पौष महिन्यात येतो.

2. मकर संक्रांत हा सण भारताच्या शेतीप्रधान चक्रावर आधारित आहे .या महिन्यांमध्ये हवामानानुसार शेतांमध्ये आलेल्या गव्हाच्या ओंब्या ,हरभरे, ऊस ,बोरे ,पावटा इत्यादी निरनिराळ्या शेती उत्पादनांना मातीच्या सुगड्यात भरून ते देवाला अर्पण केले जाते व भारतीय स्त्रिया ते एकमेकांना वाण म्हणूनही देतात.

3. मकर संक्रांतीचे नाव हे सूर्याचे धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होण्या वरून रूढ झाले आहे. 21 ते 22 डिसेंबर रोजी सूर्य साडेतेवीस दक्षिण अक्षांश यांमध्ये उत्तरेकडे असतो म्हणजे त्याचे उत्तरायण सुरू होते व त्यानंतर आपण पाहिले तर सूर्य हा जास्तीत जास्त उत्तरेकडे सरकतो ..पृथ्वीच्या परांच परांचन गतीमुळे सूर्याच्या उत्तरायण किंवा मकर संक्रमणाचे ची तारीख पुढे-पुढे सरकत असल्यामुळे इसवीसनाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मकर संक्रांति ची तारीख ही नेहमीच बदलत गेल्याचे किंवा पुढे पुढे सरकत गेल्याचे आपल्याला दिसून येते.

4.मकर संक्रांतीला शास्त्रीय व हवामानाचा संदर्भ देत असताना प्राचीन काळातील काही पुराण ग्रंथांमध्ये देखीलल मकरसंक्रांतीचे महत्त्व वर्णन करण्यात आले आहे. यापैकी एक पुराण कथा म्हणजे कौरव-पांडवांच्या महाभारतातील युद्धामध्ये  कौरवांच्या बाजूने लढलेले महामहीम भीष्म पितामह हे बाणांच्या शय्येवर पडून आपल

या  शेवटच्या घटका मोजत होते मात्र त्यांचे प्राण जात नव्हते त्यांना इच्छामरणाचे वरदान होते त्यांनी उत्तरायण ज्या दिवशी सुरू झाले त्या दिवशी इच्छामरणाचा वरदाना द्वारे आपले प्राण सोडले.

5.संक्रांतीला प्राचीन आख्यायिका मध्ये व पंचांगामध्ये एक देवी मानले जाते व अन्य देवतां प्रमाणे संक्रांतीचे सुद्धा एक वाहन असते असे सांगितले जाते .यावर्षी मकर संक्रांति म्हणजे संक्रांति देवीचे वाहन आहे ते गर्दभ आहे.

6. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा उत्सव साजरा केला जातो. भोगीला प्रामुख्याने उपभोगाचा सण मानले जाते. या दिवशी मुख्यत्वे या हंगामामध्ये पिकणाऱ्या मटार ,वांगी, पावटा, बोरे, गाजर ,ऊस  इत्यादींचा वापर करून भाजी बनवली जाते व त्याच्यासोबत शरीराला उष्णता देणाऱ्या बाजरी आणि तिळाचा वापर करून भाकरी बनवली जाते .भोगी या सणाला आहारशास्त्रीय व आरोग्य शास्त्रीय महत्त्व यामुळे प्राप्त होते. दक्षिण भारतामध्ये याकाळात पोंगल हा उत्सव साजरा केला जातो.

7. महाराष्ट्र मध्ये संक्रांत ही भोगी ने सुरु होते .दुसऱ्या दिवशी संक्रांत साजरी केली जाते व तिसरा दिवस हा किंक्रांतीचा असतो .संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया एकमेकींची ओटी भरतात .सुगडे देवाला अर्पण करतात. हळदीकुंकू करतात. या दिवशी लहान मुले आणि स्त्रिया काळी वस्त्र परिधान करतात .संक्रांतीच्या दिवशी मुख्य महत्त्व आहे तिळगुळाचे .तीळ आणि गुळाने बनलेले ,गोडवा निर्माण करणारे तिळगुळ हे शेजारीपाजारी व आपल्या मित्रमंडळींना वाटले जातात व त्यांना शुभेच्छा दिल्या जातात।

8. भारतातील निरनिराळ्या भागांमध्ये मकरसंक्रांतीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते जसे हिमाचल प्रदेश मध्ये लोहरी ,आसाम मध्ये भोगाली बिहू ,तर राजस्थान आणि गुजरात मध्ये उत्तरायन ही निरनिराळी नावे मकरसंक्रांतीला दिलेली आहेत.

9.गुजरात मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवले जातात .या पतंग महोत्सवाला दूरवरून पर्यटक भेट देत असतात.