Festival National News Religion

आश्चर्य! ‘या’ भयानक कारणामुळे अनेक वर्षांपासून ‘या’ गावात साजरा होत नाही रक्षाबंधनाचा सण

रक्षाबंधन म्हटले कि, बहीण भावाच्या नात्यातील गोडव्याचा दिवस. या दिवशी सगळे रुसवे फुगवे बाजूला सारुन भावाने बहिणीसाठी रक्षण करण्यासाठी वचन देऊन साजरा कऱण्याचा हा दिवस. भारतात या सणाला विशेष महत्व आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. बहीण किंवा भाऊ देशभरात कुठेही असेल तरीदेखील बहीण आपल्या भावासाठी पोस्टाने राख्या पाठवत असते. मात्र भारतातील एक असे गाव आहे जिथे रक्षाबंधनच साजरे केले जात नाही.या गावात रक्षाबंधनचे नाव देखील घेतले तरी लोकांच्या अंगावर काटा येतो.

मात्र उत्तरप्रदेशमधील एका गावामध्ये मागील ६५ वर्षांपासून म्हणजे १९५५ पासून रक्षाबंधन साजरे केले जात नाही. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील भीखमपुर जगतपुरवा या गावात 20 कुटुंब राहतात. ग्राम पंचायतीच्या मुख्य सदस्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की 1955 जेव्हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात होता तेव्हा पूर्वजांपैकी एक जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा सण साजरा केला जात नाही. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा जेव्हा मुलींनी हट्ट केला तेव्हा सण साजरा करायचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. मात्र या मुलीच्या आग्रहानुसार 8 वर्षांपूर्वी एकदा मुलींच्या आग्रहापोटी हा सण साजरा करायचं ठरवलं पण तेव्हाही अघटीत घडलं आणि गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे या गावात रक्षाबंधन गेल्या अनेक वर्षांपासून साजरं केलं जात नाही असं सांगितलं जात आहे.

या मुलीने रक्षाबंधन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तिने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यानं ग्रामस्थांच्या मनात भीती आहे. त्यामुळे गेल्या 8 वर्षांत आणि त्या आधीही या गावात रक्षाबंधन साजरा केला नाही अशी माहिती उषा मिश्रा आणि सूर्यनारायण मिश्रा यांनी दिली.या गावात रक्षाबंधन या सणाचं नाव काढलं तरीही इथल्या ग्रामस्थांच्या अंगावर काटा येतो आणि गावातील मुलं दुसऱ्या गावात गेली आणि रक्षाबंधना दिवशी आपल्या गावाचं नाव सांगितलं तरीही त्यांना राखी बांधणं टाळलं जातं असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे आज देखील आपल्या देशात अशा गोष्टी घडत असल्याने आश्यर्य व्यक्त केले जाते.

About the author

Being Maharashtrian