Festival History More

रक्षा बंधन का साजरे करतात? यामागील ही कथा तुम्हाला माहीत आहे का ?

श्रावण महिना सुरु झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते विविध सण – उत्सवाचे. श्रावण महिन्यांची जादूच वेगळी असते. रंगपंचमी ,रक्षाबंधन असे एकामागून एक भारी सण उत्सव येत असतात. रक्षा -बंधन तर बहीण -भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला सण,लहानांपासून ते अगदी मोठयांपर्यत सर्वानाच या सणांची उत्सुकता असते. बहीण -भावाच्या प्रेमाचं सुंदर प्रतीक म्हणजे राखी असते. आपण कधी विचार  केला आहे का ? राखी का साजरी करतात , त्या मागे काय कारण आहे ? आज आपण जाणून घेणार आहोत राखी पौर्णिमा सणाचे महत्व. तर चला मग जाणून घेऊया राखीचे महत्व . 

या सनाबद्दल अनेक कथा पुरातन काळापासून प्रचलित आहेत. परंतु सर्वसामान्य सर्वाना माहित आहे ते एक कारण म्हणजे बहीण जेव्हा भावांच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा तो भाऊ तिचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारत असतो. भावाला देखील आपल्या बहिणीचे सुख हवे असते. बहीण -भावाच्या सुंदर नात्याचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधन होय.

“राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ – “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे.

पुरातन काळात अशी देखील एक कथा आहे. महाभारतात या पवित्र सणाविषयी माहिती मिळते कि, त्या वेळी देव व दानव यांत जबरदस्त युद्ध झाले.दानवांकडून देव हरू लागले. इंद्रासहित सर्व देवांना सामना करणं कठीण झालं, तेव्हा गुरु बृहस्पतीने श्रावणातीलपौर्णिमेच्या दिवशी ‘अपराजिता ‘ नावाचे रक्ष कवच इंद्राच्या उजव्या हाताला बांधले. तेव्हा देवांना दानवांवर वि जय मिळविण्यास वेळ लागला नाही अशी देखील पुराणकथा अशी आहे कि, देव दानवांकडून पराजित होत होते, तेव्हा इंद्राची पत्नी इंद्राणीने स्वतःच्या पतीला विजय मिळावा म्हणून राखी बांधली होती.त्यानंतर इंद्राला युद्धात विजयसुद्धा मिळाला होता.पूर्वीच्या काळी जेव्हा राजे – महाराजे लढाईसाठी जात तेव्हा अनेक ऋषीमुनी त्यांना रक्षा कवच बांधत. परंतु काळ बदलत गेला आणि ऋषि मुनीची जागा बहिणीनी घेतली. त्याच्या हाताला राखी बांधत असे. आता हे काम बहीण करते.

राजपूत लोक लढाईवर जाण्यापूर्वी बहिणीकडून स्वतःला ओवाळून घेत व भाऊ सुखरूप घरी यावा म्हणून बहीण राखी बांधत असे.एक ऐतिहासिक माहिती अशी आहे कि, सिकंदर जेव्हा झेलम नदीच्या किनारी आला, तेव्हा त्याने पहिले कि, एक हिंदू स्त्री नदीकिनारी पूजा करून, राखी अर्पण करीत आहे. तेव्हा सिकंदराने राखीचे महत्व त्या स्त्रीकडून समजून घेतले व राखी बांधून घेतली.एकदा श्रीकृष्ण यांच्या हाताला जखम झाली.जखमेतून खूप रक्त वाहत होते. द्रौपदीला ते पाहावले गेले नाही. तिने तिच्या साडीचा तुकडा फाडून भगवान श्रीकृष्णाच्या मनगटाला बांधला. तो कपडा बांधल्यानंतर रक्त येणे बंद झाले.

त्यांनतर काहीच काळानंतर दु:शासन याने द्रौपदीचे चीरहरण केले. तेव्हा साक्षात श्रीकृष्ण यांनी द्रौपदीची अब्रू राखली. हा प्रसंगही रक्षाबंधानचा दाखला देणारा आहे असे म्हटले जाते.या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच; पण तसा भाऊ नेसल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी. राखी बांधताना बहिणीने म्हणावे- येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।। (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होत तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे.) राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोमन प्रार्थना करते.

रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन घेणे. रक्षाबंधन म्हणजे केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी असते . रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा ही भावना लक्षात ठेवली पाहिजे.

महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा देखील करतात साजरी
महाराष्ट्राला विस्तृत समुद्रकिनारा लाभल्याने रक्षाबंधनच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नारळीपौर्णिमेचं महत्त्व काही वेगळंच असतं. कोळीबांधव यादिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याला शांत होण्याचं आवाहन करतात आणि पुन्हा एकदा मासेमारीसाठी आपल्या होड्या समुद्रात सोडतात. नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण होण्यासाठी कोळीबांधव यादिवशी समुद्राची पूजाही करतात. या दिवसाला नारळीपौर्णिमा असं संबोधलं जात असल्याने नारळीभात हे पक्वान्न यादिवशी आवर्जून केलं जातं.