Home » सब्जाचे ‘सेवन’ केल्याने मिळतात ‘हे’ ८ आश्चर्यकारक फायदे…
Food & Drinks News

सब्जाचे ‘सेवन’ केल्याने मिळतात ‘हे’ ८ आश्चर्यकारक फायदे…

आपण सब्जाचे बी विविध प्रकारांनी आजपर्यंत खाल्लेले असेल. सर्वांच्या आवडत्या फालुदा मध्ये सुद्धा सब्जाचे बी अगदी मनसोक्तपणे वापरलेले असते. सब्जाचे बी आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे काही मोजक्याच व्यक्तींना माहित असते. सब्जाचे बी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला नक्की काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात अँ टि ऑ क्सि डंट असतात. सब्जाचे बी हे कच्चे खाल्ले जात नाही.कच्चे सब्जाचे बी पचनासाठी योग्य नसते म्हणूनच सब्जाचे बी पाण्यामध्ये भिजत घालून मग त्याचे सेवन करावे.

सब्जाचे बी मधुमेहावर गुणकारी असते तसेच वजन घटवण्यासाठीही  सब्जाचे बी खूपच उपयुक्त ठरते. सब्जाचे बी पचनासाठी सुद्धा खूपच उपकारक ठरते. सब्जाचे बी साधारण दोन टीस्पून एका कपभर पाण्यामध्ये गरम पाण्यात भिजत घातले असता पंधरा मिनिटांमध्ये ते त्याच्या आकारमानाच्या दुप्पट बनते. भिजवलेले सब्जाचे बी हे लिंबूसरबत ,कुल्फी, आईस क्रीम किंवा अन्य कोणत्याही पदार्थांमध्ये मिसळून खाल्ले जाऊ शकते कारण सब्जाचे बी ला स्वतःची अशी वेगळी चव किंवा गंध नसतो. सब्जाच्या बी चे असे काही निवडक व विशिष्ट फायदे पुढीलप्रमाणे आहेतः

1) वजन घटवण्यास साहाय्यः स्ब्जाच्या बी चा सर्वात मोठा उपयोग अतिरिक्त वजन घटवण्यासाठी होतो. सब्जाचे बी चा वजन घटवण्यासाठी खूप उपयोग होतो. सब्जाचे बी मध्ये असलेल्या अतिउच्च पातळीच्या ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मधील अल्फा लीनोलिक अॅ सि ड मुळे घडून येते. अल्फा लीनोलेनिक अॅ सि ड मुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्याची प्रक्रिया वेगाने कार्य करण्यास चालना मिळते. तसेच सब्जाचे बी मध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणातील फायबर मुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि दीर्घकाळपर्यंत भुकेची भावना निर्माण होत नाही व त्यामुळे वेळी-अवेळी खाण्याची इच्छा निर्माण होत नाही.

2) शरीराला नैसर्गिकपणे थंडावा देण्याचा गुणधर्म सब्जाच्या बी मध्ये असतो म्हणूनच अनेक आशियाई देशांमध्ये सब्जाचे बी हे सरबत  किंवा लिंबू पाण्यामध्ये मिसळून दिले जाते. काही देशांमध्ये नारळाचे दूध, लिंबू आणि पाण्यामध्ये सब्जाचे बी एकत्र करून हे पेय उन्हाळ्यामध्ये विशेषतः शरीरात निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी वापरले जाते 
3) सब्जाचे बी हे  टाइप 2 मधुमेह हा आजार झालेल्या व्यक्तींसाठी वरदानच मानले जाते. सब्जा बी मध्ये शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. शरीरातील कर्बोदकांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला नियंत्रित केले जाते ज्यामुळे रक्तामधील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवली जाते. सकाळच्या वेळी न्याहारी मध्ये दुधाच्या एका ग्लास मध्ये चिमूटभर सब्जाचे बी टाकून दिले असता हे सर्वोत्तम ड्रिंक खूप पौष्टिक बनते.

4) सब्जाचे बी हे अपचन,गँस बद्धकोष्टते सारख्या समस्यांवर अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. सब्जाचे बी पचनास गुणकारी तर असते तसेच शरीराला शुद्ध करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते म्हणूनच रात्री झोपायला जाण्यापूर्वी ग्लासभर दुधामध्ये सब्जाचे बी टाकून दिले असता संपूर्ण शरीराची शुद्धी होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यैपासूनही सुटका होते.

5) सब्जाच्या बीच्या सेवनामुळे छाती आणि  पोटामध्ये होणारी जळजळ कमी होते तसेच ऍसिडिटी पासून सुद्धा आराम मिळतो. सब्जाचे बी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि जळजळ होत नाही.
6) सब्जाच्या बी मध्ये मोठ्या प्रमाणात क्षार असतात. आपल्या हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि स्नायूंना बळकटी देण्यासाठी आहारात मॅग्नेशियम,पोटँशिअम हे क्षार असावे लागतात. सब्जाच्या बी मध्ये हे क्षार मोठ्या प्रमाणात असतात तसेच आपल्या शरीरातील लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे लोह सुद्धा मध्ये मोठ्या प्रमाणात असते.

7) त्वचा आणि केसांचे सौंदर्य हे सुद्धा सब्जा बी चे सेवन केल्याने द्विगुणीत होते.सब्जाच्या बी मध्ये शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्व के ,लोह मोठ्या प्रमाणात मिळतात त्यामुळे त्वचेवर उजळपणा निर्माण होतो आणि घनदाट व लांब केससुद्धा प्राप्त होतात.
8) खूप निराश वाटत असेल किंवा आपला मूड सतत खराब होत असेल तर अशावेळी सब्जाच्या  बी चे सेवन अवश्य करावे.सब्जाच्या बी चे सेवन केल्यामुळे शरीरातील विषद्रव्ये दूर हो्तात आणि शरीराला अनावश्यक थकल्यासारखे वाटत नाही आणि मूड चांगला राहतो.