Home » हिवाळ्यात पालक खाल्ल्याने होणारे ‘हे’ फायदे जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य…!
Food & Drinks

हिवाळ्यात पालक खाल्ल्याने होणारे ‘हे’ फायदे जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य…!

हिवाळा सुरू झाला की गरमागरम जेवण करून थंडीचा आनंद घेण्यासारखे सुख दुसरे आढळत नाही. हिवाळ्यामध्ये रंगीबेरंगी भाज्या व‌ फळांनी बाजार सजलेला असतो‌. या भाज्यांचे पोषणमूल्यही भरपूर असते. पावक ही अशीच एक चविष्ट,पोषक भाजी हिवाळ्यात आवर्जून खाल्ली जाते. पालकमध्ये जीवनसत्त्व, कॅल्शियम,लोह इत्यादींचा साठा असतो. पालकचे सेवन केल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

१) पालक व अन्य हिरव्या भाज्यांमध्ये कॅरोटिनाईड व बिटा केराटिन असते. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. पालकचे नियमित सेवन केल्याने मोतीबिंदूचा धोका टाळता येतो.

२) पालक हा लोहाचा खूप मोठा स्त्रोत मानला जातो. लोह योग्य प्रमाणात मिळाल्याने शरीरातील लाल रक्त पेशींचे ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य कार्यक्षम पद्धतीने केले जाते. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.

३) पालकमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व अ,की आणि इ असतात. या जीवनसत्त्वांमुळे केसांची वाढ होते. पालकमध्ये क जीवनसत्त्व असते यामुळे शरीरातील लोहाचे कार्य योग्य प्रकारे घडून येते.

४) पालकमध्ये बीट रूट प्रमाणे शरीरातील रक्ताभिसरण करणा-या धमन्यांचे शुद्धीकरण करण्याचा गुणधर्म असतो. यामूळे हृदयावर येणारा अतिरिक्त ताण कमी होतो. रक्तदाब नियंत्रित करता येतो.

५) पालकमध्ये जीवनसत्त्व के, मॅग्नेशियम, कॅल्शियम व फॉस्फरस यांचा साठा असतो. हे सर्व घटक हाडांचे आरोग्य चांगले राखतात.

६) पार्कमध्ये असलेल्या पोलिफेनॉलमुळे शरीराला प्रतिबंधात्मक संरक्षण मिळते. यामुळे कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.