Home » चुकूनही उपाशीपोटी खाऊ नका ‘हे’ पदार्थ, नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ दुष्परिणाम…!
Uncategorized

चुकूनही उपाशीपोटी खाऊ नका ‘हे’ पदार्थ, नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ दुष्परिणाम…!

आपल्या शरीराचे योग्य पोषण व्हावे यासाठी योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते. विविध प्रांत, संस्कृती व हवामानानुसार आहारामध्ये भिन्नता दिसून येते. मात्र आहारविषयक काही नियम हे सर्वसाधारणपणे लागू होतात. यापैकीच काही नियम म्हणजे काही विशिष्ट पदार्थ हे रिकाम्या पोटी किंवा उपाशीपोटी कधीही खाऊ नये त्यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम घडू शकतो. आज आपण अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत जे चुकूनही रिकाम्यापोटी खाऊ नयेत.

  1. कॅफनयुकत्त पदार्थ : सकाळी उठल्याबरोबर अनेकांना चहा कॉफी घेतल्याशिवाय दिवस सुरू झाला असे वाटत नाही. मात्र असे करणे आहार शास्त्राच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे. उठल्याबरोबर उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेतली असता यामुळे शरीरातील पित्त व आम्ल वाढण्याची शक्यता असते व यामुळे ऍसिडिटीचा त्रास उद्भवतो.
  2. फळे : सकाळी उठल्यावर निरोगी जीवनशैली म्हणून आजकाल फळे खाण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. फळेही आपल्या शरीरातील जीवनसत्व विषयक गरजा भरून काढण्यासाठी आवश्यक असली तरी सकाळी उठल्याबरोबर फळ खाल्ल्यामुळे आपल्या पचनक्रियेवर परिणाम घडू शकतो त्यामुळे शक्यतो उपाशी पोटी फळे खाण्याचे टाळावे.
  3. सलाड : डायट करताना आजकाल केवळ सॅलड खाऊन जगण्याची पद्धत सुरू झाली आहे. कच्च्या भाज्या व अन्य काही पदार्थ मिळून सॅलड बनवले जाते. हे कच्चे सलाड खाल्ल्यानंतर ते पचवण्यासाठी आपल्या आतड्यांवर अतिरिक्त ताण येतो. म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यामध्ये उपाशीपोटी सॅलेड खाणे टाळावे.
  4. साखर युक्त पदार्थ : शरीरामध्ये योग्य त्या प्रमाणात साखर घेणे हे ऊर्जेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निश्चितच आवश्यक असते. मात्र सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी शीतपेय किंवा साखर घातलेले ज्यूस ,जंक फूड इत्यादी घेणे टाळावे यामुळे दिवसभर एक प्रकारचा आळस आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो.
  5. सोडायुक्त पदार्थ : आजकाल सोडा युक्त पेय अगदी सर्रासपणे घरामध्ये सुद्धा उपलब्ध असतात. पचनासाठी या पदार्थांचा वापर केला जातो मात्र सकाळी उठल्याबरोबर अशा प्रकारची पेय पिल्यामुळे आपल्या स्वादुपिंडावर याचा दुष्परिणाम घडू शकतो.
  6. हे आहारविषयक साधे व सोपे नियम पाळले असता आपण जे पदार्थ योग्यपणे सेवन करतो त्यांचा आपल्या शरीराच्या वाढीसाठी व पोषणासाठी निश्चितच फायदा होतो.