Food & Drinks

फुफ्फुसाचे आरोग्य जपतात ही पेय; जाणून घ्या अधिक!

आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपण निरोगी राहण्यासाठी व्यवस्थित असणे गरजेचे असते. कोणत्याही अवयवाला इजा पोहोचली तरीदेखील संपूर्ण शरीराला त्याचा ताण सहन करावा लागतो.

2020 या वर्षाने आपल्याला निरोगी राहण्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे असेच म्हणावे लागेल. कोरोनाग्रस्तांना जास्तीचा होणारा त्रास हा फुफ्फुसे कमजोर झाल्याने होतो हेदेखील आपल्याला माहीत आहे. याच फुप्फुसाच्या आरोग्य संवर्धनासाठी कोणती पेय पिणे गरजेचे आहे हे आपण जाणून घेऊ.

मुळातच आरोग्यवर्धक फुफ्फुसासाठी पुरेशी झोप, नियमितपणे केलेले व्यायाम, आणि व्यवस्थित घेतलेली आपल्या शरीराची काळजी उपयुक्त ठरते. व्यवस्थित श्वसन चालू राहिले तर, आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा फुफ्फुसांमुळे व्यवस्थित होतो.

लिंबू आलं आणि पेपरमिंटचा चहा सर्वात नैसर्गिक क्लिंजर मानले जाते. ऑंटी ऑक्सीडेंट असल्यामुळे मूत्र वर्धक व्याधींना दूर करण्याचे काम या द्वारे केले जाते. लिंबामुळे मेंदूला ताजेतवाने वाटते तर आलं आपल्या शरीराला ऊर्जा देते. पेपरमिंट म्हणजे पुदिना हा आपल्या घशाला आराम देतो. यामुळे आपली फुफ्फुस बळकट होण्यासाठी मदत होते.

मध आणि गरम पाणी आपण अनेकदा घेतो. काही लोक शरीरातील चरबी कमी करण्यासाठी हे पेय पितात. मात्र आपल्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी आणि प्रदूषका पासून त्यांना लढण्यात मदत करण्यासाठी हे पेय प्रभावी आहे. आपले शरीर शुद्ध करण्यासाठी हे पेय खूप शक्तिशाली आहे.

हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट तत्व देखील आढळून येतात. शरीरातून हानीकारक विषारी पदार्थांना काढून टाकण्यासाठी हे पेय मदत करते. अनेकदा प्रदूषणातील धुरामुळे आपल्या फुफ्फुसाला त्रास होतो. तो त्रास दूर करण्यासाठी हे पेय मदतशील ठरते.

बरेच जण हेल्थ कॉन्शस होऊन ग्रीन टी प्यायला लागले आहेत. फुप्फुसांना स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रीन टी आवश्यक असतो. आलं लिंबू मधासह 1 कप ग्रीन टी पिणारा माणूस आपले फुफ्फुस निरोगी ठेवतो.

आपल्या घरामध्ये जेष्ठमध सहज आढळते. सर्दी खोकला किंवा ताप आल्यानंतर देखील जेष्ठमधाचा उपयोग करायला आपल आयुर्वेद आपल्याला शिकवतं. ज्येष्ठमधाचा चहा घेतल्याने शरीराचे डिटॉक्स व्हायला मदत होते. हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आणि फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यासाठी हे पेय मदत करते.

About the author

Anuja BM

Featured