Home » ओठ फुटण्याच्या समस्येपासून करा असा बचाव, जाणून घ्या हे घरगुती उपाय
News

ओठ फुटण्याच्या समस्येपासून करा असा बचाव, जाणून घ्या हे घरगुती उपाय

बदलत्या ऋतूनुसार आरोग्यविषयक निरनिराळ्या समस्या या प्रत्येकालाच भेडसावत असतात. हिवाळा हा ऋतू आल्हाददायक वाटत असला तरीही हवेतील थंड तापमानामुळे त्वचा कोरडी पडणे ,ओठांना चिरा पडणे, ओठ कोरडे होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. ओठांना भेगा पडून ओठ कोरडे पडणे ही समस्या केवळ सौंदर्य मध्येच बाधा आणत नाही तर या ओठाला पडलेल्या भेगांमधून क्वचित प्रसंगी रक्तही येते व हे निश्चितच वेदनादायी असते .आज आपण ओठांना भेगा पडण्याच्या समस्यांपासून कसा घरगुती उपाय द्वारे बचाव केला जाऊ शकतो हे तर पाहणारच आहोत मात्र मुळात ओठ कोरडे पडण्याची व त्यामध्ये चिरा निर्माण होण्याची समस्या का निर्माण होते हे सुद्धा जाणून घेणार आहोत.

1) ओठ कोरडे पडण्याची किंवा ओठांना भेगा पडण्याची समस्या ही केवळ हिवाळ्यामध्ये निर्माण होते असे नव्हे तर अन्य ऋतूंमध्ये सुद्धा ब-याचदा आपले ओठ कोरडे पडल्याचे दिसतात. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या ओठांची त्वचा अन्य अवयवांच्या त्वचेपेक्षा अधिक नाजूक आणि संवेदनशील असते त्यामुळे सूर्यप्रकाश आणि बाहेरील हवेच्या कोरडेपणा मध्ये संपर्क आल्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये ओठ फाटण्याची आणि ओठांना भेगा पडण्याची समस्या उद्भवू शकते. प्रखर सूर्यकिरणांपासून आणि अतिनील किरणांपासून बचाव करण्यासाठी ओठांना सूर्यकिरणांपासून संरक्षण देणारे आणि थंडी मध्ये बाहेर पडताना चेहर्‍याभोवती स्कार्फ बांधून बाहेर पडावे.

2) शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली असता डिहायड्रेशन मुळे ओठ कोरडे पडू शकतात.आपण बऱ्याचदा पुरेसे पाणी पीत नाही तसेच ज्या भाज्या फळे इत्यादींमध्ये पाण्याचा साठा असतो अशा भाज्या आणि फळांचा योग्य समावेश आहारात न करणे यामुळे सुद्धा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ओठ कोरडे पडतात. डिहायड्रेशन मुळे ओठ कोरडे पडण्याची समस्या दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. मात्र मद्यपान आणि कॉफी यांसारख्या पेयांपासून शक्यतो लांब राहावे कारण यामुळे ओठ कोरडे पडण्याची समस्या बळावते.

3) ओठ कोरडे पडल्यावर ओठांवर जीभ फिरवण्याची सवय अनेकांना असते मात्र यामुळे आपल्या जिभेवर असलेल्या लाळेतील पचनासाठी कारणीभूत ठरणारे घटक ओठांवरील सर्व ओलसरपणा शोषून घेतात त्यामुळे ही सवय थांबवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करावा आणि ज्यावेळी आपल्याला ओठांवरून जीभ फिरवायची इच्छा निर्माण होईल तेव्हा ओठांवर लिप बाम लावून घ्यावा.

4) काही व्यक्तींना झोपेमध्ये श्वास घेण्यासाठी  तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असते मात्र यामुळे ओठ कोरडे पडतात .म्हणून झोपताना शक्यतो तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय थांबवण्याचा प्रयत्न करा व नाकाने श्वास घ्यावा .जेव्हा सर्दीमुळे आपले नाक चोंदलेले असते तेव्हा आपल्याला बऱ्याचदा नाकावाटे श्वास घेणे मुश्कील होऊन जाते व तोंडावाटे श्वास घेतला जातो त्यावेळी ओठ कोरडे पडल्याचे आपण पाहिले असेल.

5) शरीरामध्ये सीबम हा एक नैसर्गिक असतो शरीरातील या नैसर्गिक घटकांमुळे फॅटचे प्रमाण कमी झाल्यामुळे सुद्धा ओठ कोरडे पडण्याची समस्या निर्माण होते. म्हणून आपल्या आहारामध्ये अक्रोड, नारळाचे तेल इत्यादींचा योग्य प्रमाणात समावेश असावा .वनस्पती तेलाचा वापर करणे शक्यतो टाळावे.
6) शरीरामध्ये जीवनसत्वे, जीवनसत्वे लोह, आणि झिंक इत्यादींच्या कमतरतेमुळे ओठांच्या कोपऱ्याला कोरडेपणा निर्माण होऊन ओठ फुटण्याच्या समस्या निर्माण होतात. यासाठी हिरव्या पालेभाज्या, मांस, कडधान्य इत्यादींचा आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात समावेश करावा.

7) बी सिक्स या जीवनसत्वाच्या गरजेसाठी भाज्या, फळे इत्यादींचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. तसेच प्रथिने आणि अन्य  पोषणतत्वासाठी अंडी ,मासे ,मटण, चिकन इत्यादी पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करावे.
8) आहारामध्ये पोषण तत्वांच्या कमतरता भरून काढण्यासाठी काही औषधे किंवा सप्लीमेंट घेतली जातात .अतिरिक्त जीवनसत्वाच्या सेवनामुळे ओठांवर कोरडेपणा निर्माण होतो. तसेच काही उच्च रक्तदाबाचे संबंधित औषधे यांनी संबंधित औषधांच्या अतिसेवनामुळे सुद्धा ओठांवर कोरडेपणा निर्माण होतो.

9) लहान मुलांची काळजी घेण्यासाठी लीप बाम हा अतिशय सहजपणे वापरला जातो बहुतांश लिप बाममध्ये क्रोमियम यांसारखे घटक असतात त्यामुळे सुद्धा ओठांवर शुष्कपणा निर्माण होऊ शकतो त्यामुळे नैसर्गिक घटकांनी युक्त लिप बाम ओठांना लावावा.
10) सा य ट्रि क अँ सि ड ने युक्त पदार्थ, लिंबू वर्गीय फळे,किंवा खारट पदार्थांच्या सेवनामुळे ओठांना कोरडेपणा येतो त्यामुळे हे पदार्थ खाताना ओठांची काळजी घेऊन मगच खावेत.

11) आरोग्यविषयक समस्यांमुळे सुद्धा ओठ कोरडे पडण्याची समस्या निर्माण होते.  थायरॉईड सारख्या आजारांमध्ये ओठ कोरडे पडून  कोरडेपणा निर्माण झाल्यासारखे वाटते.मेनोपॉज काळामध्ये स्त्रियांना ओठांजवळील आणि संपूर्ण शरीरावरील त्वचा कोरडी पडणे ,सांधेदुखी होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. या कारणांमुळे ओठ कोरडे पडत आहेत असे वाटत असेल तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
12) ओठांच्या कोरडेपणापासून वाचवण्यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे विटामिन युक्त तेलांचा वापर करणे व यासाठी नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल रात्री झोपण्यापूर्वी ओठांना मसाज करावे त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि ओठांचा त्वचेचा पोत सुधारतो.