Home » नेरोली तेलाच्या वापरामुळे मिळतात हे फायदे,जाणून घ्या
News

नेरोली तेलाच्या वापरामुळे मिळतात हे फायदे,जाणून घ्या

हिवाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी त्याची देखभाल करण्यासाठी अनेक जण तेलाचा वापर करत असतात. याचप्रमाणे त्वचेवर नैसर्गिक चमक निर्माण करण्यासाठीही तेलाची मालिश केली जाते. त्वचेवर आपण कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकतो. त्वचेसाठी ऑलिव ऑइल,नारळाचे तेल, तिळाचे तेल,वारलैजाते पण त्वचेसाठी नेरोली तेलाचा वापर का केला जातो हा प्रश्न बहुतेकदा पडतो. नेरोली तेल हे मार्मलेड ऑरेंज या फुलांपासून बनवले जाते. या संत्र्याचा स्वाद कडवट नसतो. मुळात हे संत्रे ब्रिटिश खाद्यसंस्कृती येथील टार्ट या थोड्याशा कडवट चवीच्या पदार्थाला बनवण्यासाठी वापरले जात असे.

या संत्र्याच्या फुलांपासून उकळून घेऊन नेरोली तेल बनवले जाते. नेरली तेल हे इटलीच्या राजकन्येच्या नावावरुन प्रसिद्ध झाले आहे. इटलीची राजकन्या हे नेरोली तेल आपल्या रोजच्या स्नानामध्ये वापरत असे. नेरोली ऑइल चे त्वचेसाठी तर अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.त्वचेवर सुरकुत्या पडणे ,डाग पडणे ,स्ट्रेच मार्क्स यांसारख्या समस्या नेरोली तेलाच्या नियमित वापरामुळे अगदी सहजपणे दूर केल्या जाऊ शकतात. या व्यतिरिक्त नेरली ऑईलचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1) नेरोली ओईल हे शरीरातील दाह आणि सांधेदुखीवर खूपच उपयुक्त ठरते.नेरोली तेलाच्या नियमित मसाजमुळे शरीरातील दाह आणि सांधेदुखी दूर होते.
2) त्वचेवर सुरकुत्या पडण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते. काही व्यक्तींना वय वाढण्याअगोदरच सुरकुत्या पडतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या मुळे सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते. चेहराला किंवा त्वचेला नेरोली तेलाने नियमित मसाज केली असता सुरकुत्या दूर होतात आणि तेलाच्या मालिश मुळे त्वचेवर नवीन पेशींची निर्मिती होते. सुरकुत्या दूर होण्यास मदत मिळते .डोळ्यांच्या खाली नाजूक त्वचेवर सुरकुत्या खूप लवकर निर्माण होतात त्यामुळे डोळ्यांच्या खाली नाजूक त्वचेला नेरोली तेलाचे मालिश करावे.

3) हिवाळ्यात त्वचे वरील कोरडेपणा आणि रुक्षपणा खूप जास्त प्रमाणात वाढतो .नेरोली तेलामुळे त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो. नेरोली तेलामध्ये एंटिब्याक्टिरिअल गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेवर निर्माण होणारा  कोरडेपणा,जखम हे दूर होतात. नेरोली तेलामध्ये असलेल्या ओलाव्यामुळे त्वचा तजेलदार राहते. 

4) महिलांच्या त्वचेच्या सौंदर्यासाठी नेरली तेल हे खूपच उपयुक्त ठरते. चेहऱ्यावरील वांग दूर करण्याची क्षमता नेरोली तेलामध्ये असते. चेहऱ्यावरील वांगाचे डाग सौंदर्यामध्ये निश्चितच बाधा आणतात. चेह-यावरील वांग दूर होतात पण या व्यतिरिक्त त्वचेचा पोत सुधारायचे आणि डाग दूर करण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा नियमित पणे चेहर्‍यावर नेरोली तेल लावून झोपावे व सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

5) प्रसूतीनंतर स्त्रियांना स्ट्रेच मार्क्स चा सामना करावा लागतो. स्ट्रेच मार्क्स मुळे त्वचा ओढलेली असते.नेरोली तेलाच्या मसाजमुळे निर्माण झालेला त्वचेवरील ताण दूर होतो.
6) सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेकांना रात्री झोप न लागणे, निद्रानाश, तणाव, विनाकारण चिंताग्रस्त वाटणे, यांसारख्या मानसिक समस्या निर्माण होतात .कोर्टिसोल या संप्रेरकाची निर्मिती यासाठी कारणीभूत ठरते. रात्री शांत झोप लागते, विनाकारण चिंताग्रस्त वाटणे यासारख्या समस्या दूर होतात व तणावही दूर होतो.

7) नेरोली तेला मध्ये रक्तदाब नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते .यासाठी नेरोली तेल आणि आलिव्ह तेल यांना एकत्र करून हे मिश्रण लावले असता रक्तदाब नियंत्रणात राहतो.
8) नेरोली तेलाच्या मालिश मुळे हाडांची व सांध्यांचे दुखणे कमी होते .तसेच मासिकपाळीच्या काळामध्ये स्नायूमध्ये निर्माण होणारा त्रासही दूर होतो. नेरोली तेलाच्या वास घेण्यामुळे मासिक पाळीच्या काळामध्ये निर्माण होणारे अस्वस्थता कमी होते आणि अस्वस्थ वाटत नाही.

9) नेरोली तेलाचे आपल्या आरोग्यासाठी फायदे असतात तसेच काही दुष्पपरिणाम सुद्धा असतात .या परिणामांपासून दूर राहण्यासाठी नेरोली तेल हे तीळ तेल,नारळ तेल किंवा अन्य कोणत्याही तेलामध्ये मिसळून लावावे.