Home » हिवाळ्यात हाडांच्या समस्या जाणवत असेल,तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…
Uncategorized

हिवाळ्यात हाडांच्या समस्या जाणवत असेल,तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…

हिवाळ्यात,हाडे आणि सांधे दुखण्याची समस्या अनेकदा वाढते.अशा स्थितीत व्हिटॅमिन-डी युक्त पदार्थांचे सेवन करावे. तुम्ही अशी आहार योजना बनवावी,ज्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे,प्रथिने आणि अमीनो अॅसिड यांचा समावेश असेल. शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन-डी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन-डी चा सर्वात नैसर्गिक स्त्रोत सूर्यप्रकाश आहे,परंतु बऱ्याच वेळा लोक वेळेअभावी किंवा कार्यालयीन भेटीमुळे सूर्यप्रकाश घेऊ शकत नाहीत.

अशा परिस्थितीत शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करणे कठीण होते.आहाराची काळजी घेतल्यास शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता बऱ्याच अंशी भरून काढता येते. व्हिटॅमिन डी ने समृद्ध असलेल्या या गोष्टी आहारात समावेश करू शकता.

व्हिटॅमिन-डी असलेले नैसर्गिक स्त्रोत…

१) मशरूम : मशरूममध्ये व्हिटॅमिन-डी देखील आढळते.मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 5, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम आढळतात.

२) संत्रा : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते, त्याचप्रमाणे त्यामध्ये व्हिटॅमिन-डी देखील मुबलक प्रमाणात आढळते.संत्र्याचा रस प्यायल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढता येते.

३) तृणधान्ये : धान्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-डी असते.तुम्ही गहू,बार्ली आणि इतर धान्यांचा आहारात समावेश करू शकता.संपूर्ण धान्य खाल्ल्याने शरीराला फायबर आणि इतर पोषक तत्व देखील मिळतात.

४) ओट्स : नाश्त्यात ओट्स खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डीही मिळतो.ओट्समध्ये भरपूर फायबर असते,ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.ओट्समध्ये व्हिटॅमिन डी देखील असते.

५) अंडी : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात अंड्याचा अवश्य समावेश करा.अंड्यातील पिवळ्या बलक मध्ये व्हिटॅमिन-डी मुबलक प्रमाणात आढळते.दररोज १ अंडे खाल्ल्याने व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करता येते.

६) दूध : दुधामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.गाईच्या दुधात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते.दररोज १ ग्लास गाईचे दूध प्यायल्याने तुम्ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करू शकता.

७) दही : दही व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत देखील मानला जातो.रोज दही खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता तर दूर होतेच पण व्हिटॅमिन- डी देखील मिळते.

८) लोणी : व्हिटॅमिन डीसाठी तुम्ही लोणीही खाऊ शकता. त्यात कॅल्शियम,लोह,मॅग्नेशियम आणि झिंकसह व्हिटॅमिन ए, बी,ई आणि के आढळतात.बटरमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाणही चांगले असल्याचे अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे.

९) मांस : मांसाहार करणार्‍यांसाठी मांस हे व्हिटॅमिन डीचाही चांगला स्रोत आहे.मांसामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते.याशिवाय कार्डलिव्हर ऑइलमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर असते.

१०) मासे – सी फूड हे व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. माशांमध्ये व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात आढळते.व्हिटॅमिन ई आणि बी12 देखील माशांमध्ये आढळतात.