Home » भिजवलेले बदाम खाण्याचे काही गुणकारी फायदे…
Uncategorized

भिजवलेले बदाम खाण्याचे काही गुणकारी फायदे…

पुरातन काळापासून बदामाला खुप महत्त्व आहे आणि त्याच्या औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदामध्ये देखील बदामाला खुप महत्त्व आहे.बदामामध्ये अनेक खनिजे आणि पोषकतत्वे आहेत.बदाम हे अनेक पौष्टिक गुणांनी भरलेले आहे.बदाम मध्ये भरपुर प्रमाणात विटामिन ई,झिंक,कॅल्शियम,मॅग्नेशियम,ओमेगा-3,फॅटी ऍसिड यासारखे अनेक पोषक तत्व असतात.

बदामाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो.बदामामध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे डॉक्टर आपल्याला नेहमी बदाम खाण्याचा सल्ला देतात.सुक्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम खाणे अधिक फायदेशीर आहेत.सुक्या बदामापेक्षा भिजवलेले बादाम शरीरात एंजाइमची निर्मिती करण्यास मदत करते.

अनेक संशोधनात सिद्ध झाले की भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे पचनशक्ती सुधारते.सकाळी भिजवलेले बादाम खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात.तर आज आपण भिजवलेले बादाम खाण्याचे शरीरासाठी असणारे काही फायदे बघणार आहोत.

चला तर बघुया भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे…

१) त्वचेसाठी उपयुक्त : मुरुमाचे डाग,सुरकुत्या अशा त्वचेशी संबंधित असणाऱ्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी सर्वजण केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात.पण या प्रोडक्ट मुळे फायदा होण्याऐवजी दुष्परिणाम अधिक होतात. याऐवजी आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा मार्ग स्वीकारणे केव्हाही उत्तम ठरते.कारण यामुळे आपल्या त्वचेला दीर्घ काळ टिकणारे लाभ होतात.तुम्ही नियमित बदामाचे सेवन केलं तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल त्याबरोबर त्वचेच्या संबंधित असणाऱ्या विकारांपासून सुटका होईल.

२) वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी : बदामामध्ये सर्वात कमी चरबी असते.भिजवलेल्या बदामामध्ये ‘व्हिटॅमिन ई’ अँटी-ऑक्सिडेंट च्या स्वरुपात कार्य करते.बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन वाढत नाही.

वारंवार लागणाऱ्या भुकेला नियंत्रण मिळते.दिवसातुन एकदा बदामाचा आहारात समावेश केला तर भूक नियंत्रणात राहते.त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी तयार होत नाही. कोणत्याही पदार्थाचे योग्य मात्रेत सेवन केले तर त्याचे फायदे दिसतात.आवश्यकता हून अधिक प्रमाणात एखादी गोष्ट खाल्ली तर आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.

३) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतात : बदामामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते यामुळे हृदयावरील तान कमी होतो आणि हृदयविकारापासून बचाव होतो.हृदय आणि मेंदू निरोगी राहण्यासाठी नियमितपणे बदामाचे सेवन करावे.यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

पचन प्रक्रिया सुरळीत सुरू होते.यामुळे हृदयावर होणारा अतिरिक्त ताण कमी होतो आणि हृदयविकारांपासून बचाव होण्यास मदत मिळते.बदामामुळे ट्रायग्लिसराइडचा स्तर देखील कमी होण्यास मदत मिळते.हृदयरोग आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी बदाम हा एक उत्तम पर्याय आहे.

४) पचनक्रिया सुधारते : सुक्या बदमांपेक्षा भिजवलेले बदाम शरीरात एंजाइमची निर्मिती करण्यास मदत करतात.यामुळे पचन प्रक्रिया सुधारते.बदाम हे आरोग्यासाठी सर्वात पोषक आणि उत्तम आहार आहे.बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण ठेवते.

यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.बदामामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो.कॅल्शिअम,फॉस्फरस,लोह,व्हिटॅमिन बी, खनिज  आणि प्रोटीन हे घटक बदामामध्ये असतात.

बदामाचे शरीरासाठी असणारे काही उपयोग… 

१)  बदाम हे बुद्धी साठी उपयुक्त असून रात्री  एक कप दुधात चार पाच बदाम भिजत घालावेत आणि सकाळी उपाशीपोटी दुधासह त्याचे सेवन करावे.शारीरिक क्षमता आणि बुद्धी वाढण्यास मदत होते.

२) बदामची पेस्ट आणि मुलतानी माती याचा लेप तयार करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा तेजस्वी दिसतो.चेहऱ्याच्या त्वचेवर सुरकुत्या असेल तर हा साधा घरगुती उपाय आहे.या लेपात गुलाबपाणी आणि दुधाचा वापर करावा. 

3) अंगाला खाज येत असेल तर बदाम तेलाने मालिश केल्यास खाज कमी होते.लहान मुलांच्या मालिश साठी बदाम तेल अत्यंत उत्तम आहे

४) केसांसाठी देखील बदामाचे तेल उत्तम आहे.बदाम तेलाने डोक्याला मालिश केली तर केशवृद्धी आणि बलवृद्धी हे अद्भुत गुणधर्म दिसतात.तसेच बदामाचे सेवनाने केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

५) बदामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच बदामाचे सेवन केल्याने डोळे तेजस्वी होतात.

६) भिजवलेले बादाम साल न काढता खाल्ल्यास रक्ताची पातळी वाढते.बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. 

७) बदामाचे सेवन केल्याने सर्दी कमी होते.राञी झोपण्यापूर्वी भिजवलेले बदाम आणि दूध पिल्याने सर्दी कमी होते.