Home » भिजवलेले हरभरे खाण्याचे काही चमत्कारी फायदे…
Uncategorized

भिजवलेले हरभरे खाण्याचे काही चमत्कारी फायदे…

मित्रांनो आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि बुद्धी वाढवण्यासाठी कित्येकजण बदामाचे सेवन करतात.परंतु सर्वांसाठी ते शक्य नाही परंतु बदामामध्ये असणारे सर्व घटक आपल्याला हरभऱ्यात सहजपणे मिळतात.आपल्या नेहमीच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्यांचा समावेश असतो.हि कडधान्य आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात.

त्यापैकीच एक म्हणजे हरभरे.भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रोटीन,फायबर आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात.हरभरे आपल्याला वेगवेगळ्या आजारापासून दूर करते आणि तंदुरुस्त बनवते.आयुर्वेदानुसार हरभरे खाल्ल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते तसेच मजबूत बनते.रात्री हरभरे भिजू घालून सकाळी खाल्ल्याने आरोग्याविषयी असणाऱ्या अनेक समस्या दूर होतात.चला तर मग जाणून घेऊया भिजवलेले हरभरे खाण्याचे फायदे 

भिजवलेले हरभरे खाण्याचे फायदे… 

१) हिमोग्लोबिनची कमतरता भरुन काढते : महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते रक्ताची कमतरता असल्यामुळे एनिमिया होण्याची शक्यता असते.असे  होण्यामागचे कारण आहाराकडे होणारे दुर्लक्षं आणि प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी यामुळे महिलांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होते.एनीमिया होण्या मागचे मुख्य कारण म्हणजे आहारामध्ये असलेली आयर्नची कमतरता होय.

अशा वेळी भिजवलेले हरभरे खाल्ले तर हे बदामापेक्षा अधिक फायदेशीर आहे.भिजलेल्या हरभऱ्यामध्ये प्रोटीन,फायबर आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म हरभऱ्यात असते हरभरे फक्त रक्त वाढवण्यासाठी नाहीतर शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. 

२) स्पर्म वाढते : तसेच पुरुषांनी देखील याचे सेवन केले पाहिजे.यामुळे अशक्तपणा दूर होतो आणि या मध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पोट स्वच्छ होते आणि पचन चांगले होते.सकाळी एक चमचा भिजवलेले हरभरे खाल्ले तर स्पर्मची संख्या वाढते.  

३) फर्टिलिटी वाढते : दररोज सकाळी भिजवलेले हरभरे मधासोबत खाल्ल्याने फर्टिलिटी वाढण्यास मदत होते तसेच भिजवलेले हरभरे गुळासोबत खाल्ले तर युरीन आणि पाइल्स च्या समस्या दूर होतात 

४) निरोगी त्वचेसाठी : त्वचा निरोगी राहते आणि वजन वाढण्यास देखील मदत होते.सर्दी आणि खोकला देखील दूर होतो.किडनी च्या समस्या दूर होतात आणि हृदय निरोगी राहते.त्याचबरोबर साखर नियंत्रणात राहते.त्वचा आणि दातांच्या समस्यांसाठी देखील उपायकारक आहे. 

५) डोळ्यांसाठी फायदेशीर : भिजवलेले हरभरे हे डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे या मध्ये बीटा कॅरोटीन तत्व असल्यामुळे डोळ्यांच्या नसा साठी फायदे युक्त आहे त्यामुळे नजर चांगली राहते.गरोदर महिलांनी हरभऱ्याचे सेवन केले तर ऊर्जा वाढण्यासाठी लाभदायक आहे.

६) वजन कमी करण्यासाठी आणि कॅन्सरसाठी फायदेशीर  : हरभऱ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.डायट करत असाल तर आहारामध्ये हरभऱ्याचा समावेश करा.भिजवलेले हरभऱ्यांचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.या मध्ये ब्युटिरेट फॅटी एसिड असते हे कॅन्सर वाढवत असलेल्या घटकांना संपवण्यासाठी मदत करतात.

७) पचनक्रिया सुधारते : भिजवलेले हरभरे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते त्यामुळे खाल्लेले अन्न पचवण्यासाठी लाभदायक ठरतात. कफ ची समस्या असल्यास हरभरे खाल्ले तर कफ दूर होतो.हरभऱ्यात फायबर चे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट साफ राहते.   

जाणून घ्या गुळ आणि हरभरे खाण्याचे फायदे : 

1. हरभऱ्यामध्ये  प्रोटीन मुबलक प्रमाणात असते.हरभरे आणि गुळ एकत्र खाल्ले तर स्नायूंच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात.त्याचबरोबर मेटाबॉलिक रेट उत्तम होतो आणि वजन वाढवण्यासाठी देखील मदत करतात. 

2. हरभरे आणि गुळामध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हे त्वचेसाठी फायदेशीर असतात.त्याचबरोबर यामध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन बी 6 मेंदूचे  आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.

3. हरभरे आणि गुळामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते त्यामुळे हे पचनक्रियासाठी उत्तम आहे.तसेच बद्धकोष्ठाच्या समस्या दूर करतात. 

4. हरभरे आणि गुळ यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम असते.त्यामुळे दात आणि हाडे मजबूत राहण्यासाठी  हे अत्यंत फायदेशीर आहे.