Home » गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे…
Uncategorized

गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे…

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्वजण पौष्टिक खाणे जवळ जवळ विसरलो आहोत.त्यामुळे आपण वेळेनुसार काही तरी फास्ट फूड खातो.त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.त्यामुळे मग वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागते.

शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे परंतु त्याबरोबर थोडासा गुळ देखील दररोज खाल्ला तर याचा अधिक फायदा होतो.थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते. थंडीमध्ये वातावरणातील गारवा वाढतो त्यामुळे गरम पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

शेंगदाणे आणि गूळ यामध्ये न्यूटिएंट्स असतात.जे आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून वाचवण्यास मदत करतात आणि प्रतिकार शक्ती देखील वाढवतात यांचे सेवन नियमितपणे केले पाहिजे.

परंतु गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का ? गुळ आणि शेंगदाणे याचे सेवन केल्यास शरीर निरोगी राहते.चला तर मग जाणून घेऊन या गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे…

१) मासिक पाळीची समस्या : मासिक पाळीच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी गुळ आणि शेंगदाण्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.गुळ शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.गुळ आणि शेंगदाणे गरम असल्यामुळे जास्त खाणे टाळावे.

२) पाचन तंत्र सुधारते :  गुळामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या पोटॅशियम मुळे आतड्यांचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या असल्यास सुद्धा गूळ उपयुक्त ठरतो.नियमितपणे गुळाचे सेवन केल्याने पोटाच्या संबंधित असणाऱ्या समस्या कमी होतात.पोटाशी संबंधित असणाऱ्या समस्या दुर करण्यासाठी गुळ  फायदेशीर आहे.

३) रक्ताची कमतरता दूर होते – शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते त्याबरोबर शरीराला ऊर्जा आणि स्फूर्ती देखील मिळते.गुळ पोटॅशियम चा चांगला स्त्रोत असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.तसेच ब्लड सर्क्युलेशन नियंत्रणात ठेऊन हार्ट अटॅक आणि हार्ट संबंधित असणाऱ्या समस्यांपासून बचाव करते.डायबेटिज सारख्या आजारापासून वाचवते. 

४) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते : तसेच गूळ आणि शेंगदाणे खाल्ले तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.शेंगदाण्याच्या चिक्की मध्ये ‘मोनो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि ‘ओलेईक ऍसिड’ असते त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहते आणि कोरोनरी डिसीज पासून आपला बचाव करण्यास मदत करते.

५) हाडे मजबूत राहतात : नियमित गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने महिला आणि पुरुषांमध्ये हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.शेंगदाण्यात विटॅमिन डी असल्याने हाडे मजबूत होतात.गर्भवती महिलांसाठी देखील गुळ आणि शेंगदाणे खाणे अत्यंत उपयुक्त आहे याचे नियमित सेवन केल्यास गर्भाच्या वाढीसाठी मदत होते.

६) त्वचा तरुण दिसते : शेंगदाण्यात प्रोटीन,फायबर,खनिज,व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात यामुळे गुळ आणि शेंगदाणाच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसत,चेहऱ्यावर तेज येते आणि चेहरा टवटवीत दिसतो. 

७) सांधेदुखी आणि कंबरदुखीपासुन आराम : थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाणे याचे सेवन केले तर सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्यांपासून आराम मिळतो.तसेच गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने बुद्धी  तेज होते आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे