Home » जेवण करतेवेळी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे,जाणून घ्या यामागील तथ्य…
Uncategorized

जेवण करतेवेळी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे,जाणून घ्या यामागील तथ्य…

निरोगी दीर्घायुष्य साठी व्यायाम आणि आहार योग्य अशी दिनचर्या खूप आवश्यक असते . मनुष्याप्रमाणे प्राणी व‌ अन्य सजीवांनाही जगण्यासाठी आहार खूपच आवश्यक असतो. मात्र केवळ जगण्यासाठी कसेही खाणे म्हणजे निरोगी राहणे नव्हे. तसेच  आहार सेवन करण्याच्या पद्धतीवर ही आपल्या निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली अवलंबून असते. आहाराचे योग्य पद्धतीने सेवन केले असता चिरतारुण्याचे वरदान मिळते.सटमोर आलेले भोजन हे कितीही सकस व सुग्रास असले तरीही ते खाते वेळी सेवन करणाऱ्या ची मानसिक स्थिती कशी आहे यावर त्या आहाराचे आपल्या शरीरातील कार्य अवलंबून असते.

जेवण कितीही पौष्टिक घटकांनी भरलेले असेल मात्र त्यावेळी जर आपल्या मनामध्ये ईर्षा ,क्रोध, भीती, राग यांसारख्या भावना निर्माण झाल्या असतील तर याचे निश्चितच प्रतिकूल परिणाम आपल्या प्रकृतीवर घडून येतात. आहाराचे आपल्या आरोग्याला फायदे होण्यासाठी काही नियमांचा अवलंब करणे खूप आवश्यक असते असे मनुने सांगितले आहे व भारतीय साहित्यामध्ये सुद्धा आढळून येते .आज आपण अशाच काही साधारण नियम  जाणून घेणार आहोत जे नियम आहार सेवन करतेवेळी पाळले पाहिजेत.

१) भारतीय संस्कृतीमध्ये आहार सेवन करतेवेळी त्याचे पूजन केले पाहिजे म्हणजेच त्याला परमेश्वराचा दर्जा दिला पाहिजे असे सांगितले आहे. यासाठी जसे परमेश्वराच्या पूजाअर्चा करते वेळी आपण स्वच्छता आणि पवित्रता यांचा संगम साधून वर्तन करतो अगदी तसेच वर्तन आहार सेवन करतेवेळी प्रत्येक व्यक्तीने अवलंबावे. आहार भोजन करते वेळी आजूबाजूला अस्वच्छता नसावी तसेच आपल्या मनामध्ये क्रोध ,गुन्हा, व्याकूळता, इत्यादी भावना नसाव्यात यामुळे कितीही सकस अन्न असले तरीही त्याचा आपल्या प्रकृतीसाठी फायदा होत नाही. यामुळे भोजन करते वेळी त्या अन्नाबद्दल उणीदुणी न काढता समोर आलेले भोजन देवाचा प्रसाद म्हणून सेवन करावे व तशीच व्रूत्ती आपल्या ठायी असावी.

२) भोजन करण्या अगोदर आपले हात स्वच्छ धुऊन घ्यावेत कारण हातांवर असलेल्या जीव जंतूंचा फैलाव हा जेवना द्वारे अगदी सहजपणे आपल्या शरीरात होऊ शकतो. त्यामुळे जेवण करण्या अगोदर आपले हात पाय स्वच्छ धुऊन घ्यावे किंवा चुळ सुद्धा भरावी. आपल्या शरीरातील अवयवांना ही भोजना प्रमाणे स्वच्छ ठेवावे व हे भोजन स्वच्छ असलेल्या भांडयामध्ये  करावे.

३) आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होणे सुद्धा खूप आवश्यक असते.पचन प्रक्रिया वर आपल्याला सेवन केलेल्या अन्नाचे कितपत फायदे मिळतात हे अवलंबून असते. म्हणूनच आपण सेवन केलेले अन्न खाते वेळी व्यवस्थित चावून खावे. अन्यथा घाईमध्ये सेवन केलेल्या अन्नाला चावल्यामुळे त्याचे पचन करण्यासाठी आतड्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो व यामुळे अआतड्यांशी निगडित काही आजार होऊ शकतात. एक घास बत्तीस वेळा चावून खावा असे आपले पूर्वज सांगतात.

४) जेवण करतेवेळी जास्तीत जास्त वेळा चावून खाल्ल्यामुळे दोन प्रकारचे फायदे होतात एक म्हणजे जास्त वेळ घास खाल्ल्यामुळे अन्नाचे अधिक बारीक कणांमध्ये विभाजन होते .यामुळे पचनाची प्रक्रिया सुलभपणे पार पडू शकते. व दुसरा फायदा म्हणजे घास जास्त चावून खाल्ल्याने लाळ ग्रंथी लाळ मोठ्या प्रमाणात स्त्रवते.लाळ अन्नाचे पचन करण्यासाठी साहाय्य करतात.जेवण करते वेळी कमी प्रमाणात हास्यविनोद करावे व आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येक घास व्यवस्थित चावून मगच खावा. घास सेवन करण्याची घाई करू नये. घास गिळण्यासाठी पाण्याचा वापर करू नये.

५) जेवण केल्यानंतर दातांमध्ये अन्नाचे कण अडकलेले असतात. या कारणांमुळे पायरिया व अन्य दंतरोग मोठ्या प्रमाणात होतात. यासाठी जेवणानंतर पाण्याने स्वच्छ चूळ भरावी.

६) पूर्वीच्या काळी जेवणानंतर विडा खाण्याची पद्धत होती. या विड्यामध्ये असलेल्या औषधी गुणांमुळे पचनक्रिया सुलभ होते. आणि आपल्या पोट आणि तोंड सुद्धा स्वच्छ होते असे सांगितले जाते. मात्र अधिक प्रमाणात पानाचे सेवन केल्यामुळे दातांवर परिणाम होऊ शकतो.

७) जेवण केल्यानंतर लगेच धावपळीने आपल्या कार्यालयाला निघणे किंवा लिखाणाची वाचनाची किंवा बैठी कामे करणे यामुळे पचनाच्या प्रक्रियेवर ताण निर्माण होतो. धकाधकीची व त्या स्वरुपाची कामे करणे टाळावे.

८) दोन वेळा जेवण करावे. या दोन वेळा जेवण करण्यामध्ये किमान सहा ते आठ तासांचे अंतर असावे. कारण इतका वेळ हा अन्न पचण्यासाठी निश्चितपणे लागतो. जेवण केल्यानंतर तीन तासांमध्ये शक्यतो काहीही खाणे टाळावे जेवण केल्यानंतर किमान तीन तास कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम किंवा व्यायाम करणे टाळावे.

९) ज्यावेळी ज्या प्रकारचया रसधातूच्या खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होत असेल अशा रसधातू युक्त आहार अवश्‍य सेवन करावा .यामुळे शरीराची संतुष्टी तर होतेच पण पचन साठी आवश्यक असलेले रसधातू सुद्धा अधिक प्रभावीपणे स्त्रवतात.

१०) जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याची अनेकांना सवय असते. मात्र जेवण केल्यानंतर वामकुक्षी करणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरीही जेवणानंतर एक तासापेक्षा जास्त अवधी झोपण्याचे टाळावे.