Home » हि आहे जगातील सर्वात महागडी भाजी किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल? ८२ हजार रुपये प्रति किलो…
Uncategorized

हि आहे जगातील सर्वात महागडी भाजी किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल? ८२ हजार रुपये प्रति किलो…

जगामध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात.परंतु तुम्हाला जगातील सर्वात महागडी भाजी माहित आहे का? जर तुम्हाला बाजारातून सर्वात महागडी भाजी आणायला  सांगितली तर कदाचित तुम्ही  २०० ते ४०० रुपये प्रति किलो पर्यंत भाजी आणली असेल.  पण एक भाजी अशी आहे कि किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.काही लोक हिरव्या भाज्या खाऊन प्रथिने घेतात,परंतु यासाठी वयानुसार रोज भाजीपाला किती प्रमाणात खावा हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे.

अलीकडेच मार्केट मध्ये एक भाजी बऱ्यापैकी चर्चेत आली आहे.सांगण्यात आले आहे की हि जगातील सर्वात महाग भाजी आहे आणि त्या भाजीची किंमत सुमारे ८२ हजार रुपये प्रति किलो आहे.’हॉप शुट्स’असे या भाजीचे नाव आहे.बिहारमध्ये या भाजीची लागवड होत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे.या भाजीचे वैज्ञानिक नाव ह्युमुलस ल्युपुलस आहे.

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील एक शेतकरी जगातील सर्वात महागड्या भाजीची शेती करत आहे.जगातील सर्वात महागडी भाजीचे नाव ‘हॉप शूट्स’ आहे.हि भाजी कोणत्याही दुकानात  मिळणे अवघड आहे.हि भाजी बाजारात सहसा मिळत नाही.या भाजीचा उपयोग अँटीबायोटिक्स बनवण्यासाठी करतात. 

पण या भाजीचे नाव ऐकल्यानंतर तुमच्या मनात असे अनेक प्रश्न येतील कि हि भाजी इतकी महाग का आहे? आणि हि भाजी खाण्याचा  काय फायदा? म्हणूनच आज आपण हॉप शूट्स हि भाजी खाण्याचे फायदे आणि या भाजीतील पौष्टिक घटक याबद्दल माहिती बघूया.

या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.औषधी  बनवण्यासाठी  देखील या भाजीचा उपयोग केला जातो तसेच हॉप शूट्स या भाजीच्या फुलांचा उपयोग बियर बनवण्यासाठी केला जातो आणि औषधीमध्ये अँटिबायोटिक तयार करण्यासाठी देखील केला जातो.टी.बी च्या उपचारासाठी हॉप शूट्स या भाजीपासून बनवलेले औषध अत्यंत प्रभावी आहे.झाडाच्या मुळांपासून बनवलेलं औषध टी.बी या आजारावर उपयुक्त ठरतं.या भाजीला येणाऱ्या फुलांना हॉप कोन्स असे म्हणतात.भाजीच्या फाद्यांचा उपयोग खाण्यासाठी होतो.यापासून लोणचेही तयार करतात ते हि खूप महाग असते.

हॉप शूट्स या भाजीची शेती कशी कराल ?

या भाजीची लागवड करण्यासाठी थंड वातावरण अनुकूल आहे.मार्च ते जुन हा कालावधी या भाजीच्या लागवडीसाठी उत्तम आहे.हॉप शूट्स या भाजीच्या लागवडीसाठी सूर्यप्रकाश आणि ओलावा आवश्यक आहे.या भाजीची रोपटे सूर्यप्रकाशाखाली वेगाने वाढतात.या भाजीच्या रोपांचा रंग सुरुवातीला जांभळा असतो नंतर हिरवा होतो.या भाजीची एका दिवसात ६ इंच इतकी वाढ होते.मातीचा pH  ६ ते ७ इतका असला पाहिजे आणि हि भाजी २५ ते ३५ डिग्री तापमान सहन करू शकते.

हॉप शुट्स या भाजीचे  फायदे पुढीलप्रमाणे आहेत…

१) या भाजी मध्ये अँटिबायोटिक गुण आहेत.

२) या भाजी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

३) दातांच्या संबंधित काही समस्या असेल तर या भाजीच्या सेवनाने कमी होतात.

४) टी.बी सारख्या आजारावर या भाजीपासुन बनवलेले औषध अत्यंत प्रभावी आहे.

५) या भाजीच्या फांद्या पासुन लोणचे केले जातात.

६) या भाजीचा आपण सलाद मध्ये वापर करु शकतो.