Home » टोमॅटो चे सेवन‌ केल्याने मिळतात हे फायदे,जाणून घ्या…
Uncategorized

टोमॅटो चे सेवन‌ केल्याने मिळतात हे फायदे,जाणून घ्या…

टोमॅटो चे विविध स्वरूपात अगदी दररोज सेवन केले जाते .मूलतः फळवर्गीय असले तरीही टोमॅटोचे सेवन भाजीच्या स्वरूपात केले जाते.संपूर्ण जगभरात खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. टोमॅटोचे भाजी, लोणचे, सॉस, केचप,सूप इत्यादी स्वरुपात सेवन केले जाते. टोमॅटोला संपूर्ण जगभरामध्ये ओळख मिळवून देण्याचे श्रेय स्पेनला जाते.स्पेनने टोमॅटोला सर्वात प्रथम जगभरात ओळख मिळवून दिली. टोमॅटो हे पदार्थाला रंग प्राप्त करून देण्यासाठी मुख्यत्वे वापरले जाते.

टोमॅटो हे पदार्थांचा स्वाद आणि रंग यांना द्विगुणित करण्यासोबतच अनेक आरोग्यदायी फायद्याची भरपूर आहे. टोमॅटोमध्ये विविध प्रकारच्या पोषक घटकांचा क्षारांचा आणि जीवनसत्वांचा साठा असतो. टोमॅटोमध्ये खनिजे ,क्षार आणि जीवनसत्व अ, ब, क आणि के यांचा मुबलक साठा असतो.याव्यतिरिक्त टोमॅटोमध्ये पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फोलेट इत्यादी घटकही परिपूर्ण असतात.या सर्व घटकांनी युक्त टोमॅटोचे आपल्या शरीराला नक्की काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

१) वाढते प्रदूषण, धूळ आणि अतिनील किरणांसोबत वारंवार येणारा संपर्क यामुळे केस आणि त्वचा या दोन्हींवर विपरीत परिणाम घडून येतो आणि त्वचा आणि केस यांच्यामध्ये कोरडेपणा आणि रुक्षपणा निर्माण होतो. आधुनिक काळामध्ये प्रदूषणापासून वाचण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन केले पाहिजे यामुळे त्वचेला आणि केसांना झालेली हानी भरून येते.

२) टोमॅटोचे सेवन केल्यामुळे शरीरात मुक्तपणे संचार करणार्‍या घटकांच्या संचारास प्रतिबंध केला जातो. यामुळे कॅन्सरजन्य आजारांपासून बचाव होतो.टोमॅटो ना शिजवले असता लायकोपेन या कॅन्सरपासून बचाव करणाऱ्या घटकांच्या वाढीस सहाय्य मिळते.

३) हाडांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी जीवनसत्त्व क आणि कॅल्शिअम आवश्यक असते. टोमॅटोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि सत्व के असते असे सांगितले तर नक्कीच आश्चर्य वाटेल. आपल्या हाडांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी टोमॅटोचे सेवन नियमित करावे.

४) टोमॅटो मध्ये असलेल्या क्लायरोजैनिक ऍसिड मुळे  धुम्रपानपासून होणाऱ्या परिणामांपासून बचाव होतो.धूम्रपान करणाऱ्या व्यक्‍तींनी नियमितपणे टोमॅटोचे सेवन केले असता त्यापासून होणाऱ्या विपरीत परिणाम पासून तर संरक्षण मिळतेच पण  प्यासिव्ह स्मोकर्स ला सुद्धा टोमॅटोचे सेवन केल्यामुळे संरक्षण प्राप्त होते.

५) टोमॅटो जीवनसत्व कआणि जीवनसत्त्वे  के यांचा खूप मोठा स्रोत आहे .जीवनसत्व क मुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.टोमॅटो मधील अ जीवनसत्व मिळते व त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. शरीरामध्ये क जीवनसत्व अधिक चांगल्या प्रमाणात जाऊ शकते.जीवनसत्व के आणि क यामुळे एक उत्तम प्रकारचे अँटिऑक्सिडंट आपल्या शरीराला मिळते.

६) हृदयाचे आरोग्य हे निकोप व निरोगी राखण्या मध्ये जीवनसत्व आणि  एंटीऑक्सीडेंटचा  वाटा खुप मोठ्या प्रमाणात असतो. टोमॅटोचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्टेरॉलचा संचय होऊ देण्यास प्रतिबंध केला जातो.

७) टोमॅटो मध्ये क्रोमियम हा घटक असतो. शरीरातील रक्त आणि ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित होण्यास क्रोमियममुळे साहाय्य होते.ज्या व्यक्तींना मधुमेह असतो त्यांना क्रोमियम युक्त आहाराचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. टोमॅटो मध्ये असलेले क्रोमियम मुळे त्यांना संरक्षण दिले जाते.

८) शरीरातील पचन संस्था आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी टोमॅटो खूपच गुणकारी ठरतात.टोमॅटोमुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवरही उपाय केला जातो.म्हणूनच कधी मसालेदार पदार्थांचे सेवन केले तर शेवटी पिकलेल्या टोमॅटोची एखादी फोड सेवन करावी त्यामुळे व्यवस्थित पचन होते.

९) टोमॅटोमध्ये जीवनसत्व क असते.जीवनसत्व क हे शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. टोमॅटोच्या सेवन केले असता रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि शरीरातील ऊर्जा सुद्धा वाढते.

१०) टोमॅटोमध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंटमुळे वजन घटण्याची  प्रक्रिया वेगाने घडून येते त्यामुळे वजन घटवण्याचे ही साहाय्य मिळते म्हणूनच ज्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी डायट वर आहेत त्यांनी टोमॅटोचे आपल्या आहारात अवश्य समावेश करावा.

११) टोमॅटो मध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे निश्चितच आपल्या शरीराला अनेक फायदे होतात व आपले आरोग्य निरोगी राखले जाते मात्र हे सर्व फायदे आपल्या शरीराला परिपूर्ण मिळण्यासाठी टोमॅटोचे योग्य प्रकारे सेवन करणे सुद्धा आवश्यक असते. टोमॅटोचे कच्च्या स्वरूपात सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. टोमॅटो शिजवून सुद्धा सेवन केला जाऊ शकतो मात्र कच्च्या वा शिजवलेल्या अशा दोन्ही प्रकारांमध्ये टोमॅटोचे सेवन करताना टोमॅटोची साल काढणे टाळावे कारण टोमॅटोच्या सालीमध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म असतात.