Home » अरे बापरे! ऐकावे ते नव्वलच! एकाच झाडाला लागतात चक्क ४० प्रकारची फळे…
Uncategorized

अरे बापरे! ऐकावे ते नव्वलच! एकाच झाडाला लागतात चक्क ४० प्रकारची फळे…

निसर्गाचा नियम असा आहे की झाडाला एकच फळ मिळते. पण जगात एका ठिकाणी निसर्गाचा हा अतूट नियम मोडला गेला आहे. या झाडाला 40 विविध प्रकारची फळे येतात. जरी यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे परंतु प्रोफेसर सॅम वॉन एकेन यांनी ते खरे असल्याचे सिद्ध केले आहे. कलम तयार करण्याच्या तंत्राद्वारे, प्राध्यापक एकाच झाडावर 40 प्रकारची फळे वाढवू शकले आहेत. या झाडाला ‘ट्री ऑफ 40’ असे नाव देण्यात आले आहे, ज्यात जुजूब, चेरी, सतलू, जर्दाळू अशी अनेक फळे तयार केली जात आहेत.

आंबा,सफरचंद,केळी,पेरू,मोसंबी प्रत्येक फळाचे वेगवेगळे झाड असतात.पण तुम्ही कधी असे ऐकले का की चक्क एकाच झाडाला वेगवेगळी फळे लागल्याचे? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे.असे एक झाड आहे ज्या झाडाला ४९ वेगवेगळ्या प्रकारची फळे लागतात.’ट्री ऑफ 40′ असे या झाडाचे नाव आहे.

लहान असताना कदाचित गमतीचा भाग म्हणून आपण  चित्रामध्ये एकाच झाडावर वेगवेगळी फळे काढली असेल.पण प्रत्यक्षात हे अशक्य आहे हे आपल्याला माहितीच आहे.परंतु हे अशक्य असणारे शक्यही करून दाखवले अमेरिकेतील एका तज्ज्ञाने.ज्यानी ‘ट्री ऑफ 40’ ह्या नावाचचे झाड तयार केलं आहे ज्यावर वेगवेगळ्या प्रकारची फळे लागतात.

सेराक्युज युनिव्हर्सिटीमधील सॅम वॉन एकेन यांनी ग्राफ्टिंग हे झाड तयार केले आहे.या झाडावर चाळीस प्रकारची वेगवेगळी फळे लागतात.यामध्ये जांभूळ,आंबा,केळी,सफरचंद,पेरु इत्यादी फळांचा समावेश आहे.हे झाड उगवण्यासाठी तब्बल ९ वर्षे लागली.या झाडावर २००८ मध्ये त्यांनी काम सुरू केले होते.आता ते फळा-फुलांनी बहरुन आले.

आता आपल्यापैकी जे निसर्गप्रेमी असेल,झाडांवर प्रेम करणारे असेल,शेतकरी किंवा फळ उत्पादक असेल तर साहजिकच असे झाड आपल्या कडेही असायला हवे असे प्रत्येकाला वाटेल.हे झाड कसं उगवायचे आणि या झाडाच्या रोपाची काय किंमत असेल असे प्रश्न सगळ्यांना पडलेच असतील.

हे झाड उगवण्यासाठी या झाडाची फांदीच पुरेशी आहे.पण या एका फांदीची किंमत वाचुन तुम्हाला धक्का बसेल.या झाडाची एक फांदी खरेदी करण्यासाठी चक्क १९ लाख रुपये मोजावे लागते.म्हणजे फक्त एका फांदीसाठी एका फ्लॅटइतकी किंमत मोजावी लागेल.