Food & Drink Health

…तर अशावेळी पिऊ नका पाणी! अति पाणी पिल्याने शरीराचे होते ‘हे’ नुकसान

…तर अशावेळी पिऊ नका पाणी! अति पाणी पिल्याने शरीराचे होते ‘हे’ नुकसान

पाण्याला जीवन असे संबोधले जाते. एक वेळ माणूस जेवणाशिवाय राहू शकेल मात्र, पाण्याशिवाय नाही! पाणी भरपूर प्यावे हे अनेकदा आपण ऐकले आहे. डॉक्टरसुद्धा आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी चांगल्या प्रमाणात प्यायल्याने किडनीशी संबंधित सर्व आजार दूर राहतात. पाण्याने आपली पचनक्रिया सुरळीत होते. त्वचेसाठी पाणी म्हणजे तर संजीवनीच!

आपली त्वचा सुंदर असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पाणी प्यायल्याने आपल्या शरिराला अनेक फायदे होतात हे मात्र खरं. पण जास्त पाणी पिणे हे सुद्धा आरोग्यास घातक ठरू शकते. त्वचेवर काही डाग असतील किंवा पोटाच्या काही समस्या असतील तर आपण पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करतो. शरिरातील तापमान आणि पचनक्रियेसाठी पाणी अत्यंत लाभदायक आहे.

मात्र, आपण एक गोष्ट अगदी लहानपणीच ऐकलेली आहे आणि ती म्हणजे “अति तेथे माती”. याच उक्तीप्रमाणे, पाण्याचे देखील अति सेवन करणे आरोग्यास हितकारक नसते. प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये लठ्ठपणा, रक्त प्रवाहाच्या समस्या यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जाण्याची शक्यता असते.

अति प्रमाणात पाणी प्यायल्यास आरोग्य खराब होण्याची शक्यता असते. ताप आल्यावर, काम जास्त केल्यावर, उष्ण वातावरणामध्ये, केस गळत असल्यास, तणाव असल्यास अशा वेळी पाणी जास्त पिऊ नये. शरीरासाठी हानिकारक असते. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास सर्दी-ताप होण्याची शक्यता असते. बायपास झालेल्या व्यक्तीने पाणी कमी प्यावे. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने फॅट वाढते.

आपण नेहमी नाण्याची एकच बाजू बघत असतो आणि त्यातूनच आपले नुकसान होते. प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन बाजू असतात आणि त्याचाच विचार करून आपण संतुलित आहार घेऊन तसेच आयुष्य जगायला हवे! यामुळे आपल्यापासून अनेक व्याधी दूर राहतात. तसेच चांगले शारीरिक आरोग्यदेखील लाभते.