Food Food & Drink Health

नाव जरी ड्रॅगन फ्रुट असले तरी ,या फळांचे आहेत अनेक फायदे जाणून घ्या सविस्तर

ड्रॅगन फ्रूटचे वैज्ञानिक नाव हिलोकेरेस अंडटस  हे फळ मुळात अमेरिकेतील आहे. हे निवडुंगातील एका जातीला येणारे फळ आहे. मेक्सिको, दक्षिण अमेरिका, इस्राईल, ऑस्ट्रेलिया, नैर्ऋत्य आशियातील देशांत प्रामुख्याने या फळाचे उत्पादन होते. भारतातील शेतक ऱ्यांकडूनही आता या फळाचे पीक घेतले जाते.हे फळ दिसायला एकदम रसरशीत असते. या फळाची मूळ जात ही कैक्टेसिया ही आहे. यांची फुले खूप  सुगंधित असतात. सहसा ही फुले रात्री फुलतात. सकाळ होईपर्यत ही फुले गळून पडतात. आता ही फळे पटाया, क्वींसलैंड, पश्चिमी ऑस्ट्रेलिया आणि  न्यू साउथ वेल्स येथे देखील उगवली जातात. या फळाचा उपयोग सॅलड ,मुरब्बा ,जेली, शेक यापासून बनवतात. 

ड्रॅगन फ्रूटचे फायदे – ड्रॅगन फ्रुट हे परदेशी  फळ असून देखील भारतात देखील मोठ्या प्रमाणत लागवड केली जाते ,कारण ड्रॅगन फ्रुट हे खूप  औषधी आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. केस ,त्वचा ,आणि आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. ड्रॅगन फ्रुट दिसायला लालसर गुलाबी तसेच पिवळसर रंगाचे दिसते. या फळाची साल टणक असेल तेव्हाच हे फळ परिपक्व झाले असे समजावे. याची साल काढणे अगदी सोपे असते. आतील गर पांढरा किंवा लालसर रंगाचा असतो. यात “किवी” फळासारख्याच काळसर बिया असतात. या फळाची चवदेखील अतिशय मधुर असते. आजकाल सॅलड, आईस्क्रीम, जेली बनवण्यासाठी या फळांचा वापर होताना दिसत आहे.

ब्लड शुगर/डायबिटीज- ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सयडेंट असतात. बेटासानिन, फ्लेवोनोइड, फेनोलिक एसिड, एस्कॉर्बिक एसिड आणि  फाइबर मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवते. 

हृदयाची काळजी घेते – ड्रगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सयडेंट असतात. जे आपल्या धमन्यांना स्ट्रॉंग बनवितात. ज्यामुळे हार्ट अटॅकचा  धोका कमी  होतो. या फळांमध्ये डायट्री फायबर मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित होते . त्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता देखील कमी होते. 
  

रोगप्रतिकार शक्ती वाढते –   ह्या फळांमधील अंँटीऑक्सिडंट आणि विकरे केसांचे सौन्दर्य खुलविते. ह्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. ह्यातील लोह रक्ताचे हेमोग्लोबिन वाढवते आणि एनिमेया होऊ देत नाही.खरे पाहता हे आंबट फळ आहे तरी ह्यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. तसेच ह्याच्यामुळे दात व हाडे मजबूत होतात. डेंग्यू झाल्यावर आपले हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. पण ह्या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तयच बरोबर हाडे पण मजबूत होतात. तेव्हा डेंग्यू ची भीती हि कमी होईल.
   

कॅन्ससाठी देखील फायदेशीर –  एका अभ्यासातून असे दिसून आले होते,ड्रॅगन फ्रुटमध्ये एंटीट्यूमर, एंटीऑक्सीडेंट आणि  एंटी इन्फ्लामेट्री गुण असतात. या बरोबरच ड्रॅगन फ्रुटमध्ये असे काही विशेष गुण असतात ,ज्यामुळे महिलानांच्या ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. या बरोबरच ज्यांना आधीच ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे ,अशा महिलांना ड्रॅगन फ्रुटचा खूप फायदा होतो. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर – अनेकांना वाढत्या वजनाची समस्या असते ,त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे अशासाठी ड्रॅगन फ्रुट खूप उपयुक्त आहे. कारण यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ड्रॅगन फ्रुट खूप उपयुक्त आहे. पोट  साफ करते – ह्याच्यामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. साहिजकच एकदा पोट साफ असले की 90% व्याधी नाहीशा होतात. म्हणजेच रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात.

संधिवाताची उपयुक्त – हे आंबट फळ आहे तरी ह्यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. तसेच ह्याच्यामुळे दात व हाडे मजबूत होतात. डें ग्यू झाल्यावर आपले हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. अशा वेळेस प्लेटलेट्स वाढविण्यासाठी डॉक्टर ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला देतात. 

डें ग्यूवर प्रभावी – जेव्हा एखाद्या व्यक्तीला डें गू होतो तेव्हा त्यांची प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होते. अशा वेळेस ड्रॅगन खूप उपयुक्त आहे. कारण विटामिन सी चे भरपूर कोठार. विटामीन सी असले की रोग प्रतीकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही. त्वचेसाठी फायदेशीर – ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य ही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाण्याने तुम्ही  तरुण रसरसलेले दिसतात.
  

ड्रॅगन फ्रूटचे तोटे – ड्रॅगन फ्रुट खाण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. असे म्हटले जाते की कोणताही पदार्थ किंवा कोणतीही गोष्टींचा अतिरेक करू नये. कारण जसे त्याचे फायदे होतात तसे त्यांचे तोटे देखील होतात. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट जास्त प्रमाणात खाऊ नये. ज्या प्रमाणे ड्रॅगन फ्रुट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे ,अगदी त्या प्रमाणेच त्यांचा एक म्हत्वचा तोटा देखील आहे ,तो असा की जर तुम्ही ड्रॅगन फ्रुट खूप जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमचे वजन वाढू देखील शकते. कारण यामध्ये फ्रुकटोज देखील मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे वजन वाढू  देखील शकते किंवा तुमचे वजन स्थिर होऊन जाते. 

ड्रॅगन फ्रुट खाताना एक काळजी जरूर घ्यावी  ती म्हणजे की ड्रॅगन फ्रुटवरील साल पाहू नये ,कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात किडे असतात. व अनेक कीटकनाशके देखील फवारलेली असतात.