Food Food & Drink Health

भारतीय लोक चायनीज पदार्थ आवडीने खातात , पण त्यात आहे हा घातक पदार्थ..

तीय लोक चायनीज पदार्थ आवडीने का खातात ? चायनीज  आणि तरुणपिढी एक वेगळेच समीकरण आहे. ज्यांची चव गोड,आंबट ,तिखट आणि थोडीशी कडवट त्यामुळे चायनीज प्रत्येकाला खावसं वाटत. आज आपण पाहणार आहोत भारतीयांना हॉटेल्समधील चायनीज जास्त का आवडते. भारतीय चिनी खाद्यपदार्थ लुधियानवी किंवा इंडो-चायनीज म्हणून ओळखले जातात.

मूळात मचूळ असलेल्या चायनीजमध्ये भारतीय मसाल्यांचा आधार घेऊन त्यांना भारतीय बनविले जाते. त्यात अजीनोमोटो या मिठाची मात्रा मात्र मोठय़ा प्रमाणात चववृद्धीसाठी असतेच असते.  लोक हे अन्नपदार्थ स्वीकारतात म्हणण्यापेक्षा त्यांची रसना त्यांना स्वीकारत असते कारण जिभेला लागलेली चवच एखादा पदार्थ पुन्हापुन्हा खाण्यास प्रवृत्त करीत असते. चीनने त्यांचे नूडल्स पासून सूपपर्यंत सर्व पदार्थ लोकप्रिय करण्यासाठी अजिनोमोटो या पदार्थाचा वापर केला. खरेतर अजिनोमोटो हे मीठ आहे.

पण अजिनोमोटो हे या मीठाचे नाव नसून ते तयार करणाऱ्या अजिनोमोटो या जपानी कंपनीचेच नाव आहे. आता तर जगातील अनेक  हे अजिनोमोटो त्यांच्या पाककौशल्यात वापरतात व पदार्थाची लज्जत वाढवतात आजमितीस शंभर देशात त्याचा वापर केला जातो. भारतात सांबार, रस्सम, पुलाव, नूडल्स यात त्याचा वापर सर्रास केला जातो. विकतच्या उत्पादनांमध्ये तर ते हमखास असते. त्यामुळेच ते पदार्थ खाण्याची आपल्याला चटक लागते ; अजिनोमोटो  हे असं एक अस रसायन आहे कि, जिभेला याचा स्पर्श झालातर, जीभ भ्रमित होते. आणि मेंदूला चुकीचे संदेश पोहचवते.आपल्याला वाटेल आपण जे काही खात आहे,ते खूपच चांगले आणि टेस्टी आहे. या रसायन च्या प्रयोगाने शरीराच्या अंग-उपांगों आणि मस्तिष्क यांच्या मधील न्यूरोंस नैटवर्क बाधित होते.ज्यामुळे आपल्यावर दूरगामी दुष्परिणाम होतात.

चिकित्सक म्हणतात , अजीनोमोटो च्या वापराने एलर्जी होऊ शकते. हे खाल्यावर डोकेदुखी,छातीत जळजळ, बॉडी टिश्यूजमध्ये सूजन, माइग्रेन इत्यादी त्रास जाणवतील.अजीनोमोटोमुळे होणारे, रोग इतके, व्यापक झाले आहेत कि,त्यांना आता ‘‘चाइनीज रेस्टोरेंट सिंड्रोम’’या नावाने ओळखतात. दीर्घकाळ वापराने, मस्तिष्काघात (स्ट्रोक) हि होण्याची शक्यता असते. ज्यामुळे ‘ब्रेन हंमरेज’ किंवा ‘लकवा’होऊ शकतो.
अमेरिका मध्ये अजीनोमोटो वर प्रतिबंध आहे.आजपर्यंत इतके दुष्यपरिणाम असलेल्या या पदार्थांना ‘‘फूड सेफ्टी एण्ड स्टैन्डर्ड अथाॅरिटी आॅफ इंडिया’’ ने  अजीनोमोटो प्रतिबंधित का नाही केल नाही.

चायनामध्ये अजिनोमोटो का वापरू लागले ? .७० च्या शतकात चायनामध्ये खाण्यासाठी खूप काही खाण्यासाठी पदार्थ नव्हते.  भाज्यादेखील काही प्रमाणताच उपलब्ध होत्या. कोबी , फ्लॉवर , ढोबळी मिरची इत्यादी. मसाल्यामध्ये देखील जास्त काही उपलब्ध नव्हते. परंतु त्या नंतर  एसजी बाजरात आले. आणि त्याने जेवणाची सर्व टेस्टच बदलून टाकली. मचलट असलेले चायनिज  पदार्थ चविष्ट लागू लागले.  त्या नंतर चायनामध्ये  मोठ्या प्रमाणात खाद्य क्रांती झाली. बाहेरील देशांतून अनेक मसाले आयात होऊ लागले. त्यामुळे  चायना म्हणजेच चीनमध्ये अजिनोमोटोचा वापर कमी झाला. चायनामध्ये असे मानले जाते ,त्या महिला आळशी आहेत ,किंवा ज्यांना विशेष काही बनवता येत नाही ते लोक अजिनोमोटोचा वापर करतात. 
अजीनोमोटो च्या वापराने एलर्जी होऊ शकते. हे खाल्यावर डोकेदुखी,छातीत जळजळ, बॉडी टिश्यूजमध्ये सूजन, माइग्रेन इत्यादी त्रास जाणवतील.अजीनोमोटोमुळे होणारे, रोग इतके, व्यापक झाले आहेत कि,त्यांना आता ‘‘चाइनीज रेस्टोरेंट सिंड्रोम’’या नावाने ओळखतात. दीर्घकाळ वापराने, मस्तिष्काघात (स्ट्रोक) हि होण्याची शक्यता असते. ज्यामुळे ‘ब्रेन हंमरेज’ किंवा ‘लकवा’होऊ शकतो.
अमेरिका मध्ये अजीनोमोटो वर प्रतिबंध आहे.

चायनिज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यांसारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. भात, बांबूचे मूळ, मशरुम्स, नूडल्स हे चिनी लोकांचे ‘स्टेपल फूड’ आहे, तसे ते आपले नाही. नूडल्स, चिकन किंवा मांस अर्धकच्चे शिजवले गेले तर पचायला हानीकारक आहेत. शिवाय मैदा आतडय़ात जाऊन चिकटत असल्यामुळे त्याचा अतिरेकी वापर घातक आहे. ‘रोडसाइड चायनिज फूड’मध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश्ड किंवा रिफाइंड असल्याने पचनसंस्थेसाठी हितकर नसतो.’

मोनोसोडियम ग्लुटामेटचा सर्रास वापर शरीराचे सगळ्यात जास्त नुकसान करणारा आहे. ते अधिक प्रमाणात वापरले गेल्यास जादा सोडियमवर प्रक्रिया करायला आतडय़ांना वेळ लागतो आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांमार्फतच बाहेर टाकले जात असल्यामुळे मूत्रपिंडांच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो. यामुळेच ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अजिनोमोटोचा वापर झालेले पदार्थ खाऊ घालणे अतिशय धोकादायक आहे. कारण त्यांची पचनसंस्था आणि आतडी नाजूक असतात, 
  

आपण नेहमी म्हणतो की मला  चायनीज फक्त हॉटेलमधलंच आवडत परंतु आपल्यला हे माहित  नसतं की  आपल्याला माहित नसतं की त्यामध्ये अजिनोमोटो सारखे धोकादायक पदार्थ असतात. त्यामुळे बाहेर खात असताना थोडासा विचार जरूर करावा.