Food Food & Drink

वजन वाढविणे असो किंवा कमी करणे हा सुकामेवा आहेअतिशय गुणकारी

काजू एक चविष्ट सुकामेव्यातील प्रकार आहे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यत सर्वाना काजू फार आवडतात. काजूचे अनेक प्रकार देखील येतात ,जसे की मसाला काजू ,साधे काजू,मीठ लावले काजू. काजू खाण्याबरोबरच अनेक पंजाबी भाज्यांमध्ये काजूचा वापर केला जातो. पंजाबी भाज्यांमध्ये काजू मुख्यत्वे ग्रेव्ही घट्ट बनविण्यासाठी केला जातो. काजूची चव देखील अप्रतिम लागते. या बरोबरच काजू खूप गुणकारी आहे . कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही काजू खाऊ शकता. काजू  हा असा सुकामेवा आहे ,जो नुसते काजू खाल्ले तरी चवदार लागतात व ते कशासोबतही मिक्स करून खा चांगले लागतात. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर काजू खूपच गुणकारी आहे. वात असलेल्या रोग्यांसाठी काजू खूप गुणकारी आहे. काजू थोडेसे गरम असतात. जर वात असलेल्या व्यक्तीने काजू खाल्ले  तर वात दूर होऊ शकतो. 

काजू पाण्यात भिजवून बारीक करून याचा उपयोग मसाज करण्यासाठी केल्यास त्वचा उजळते. काजू तेलकट, शुष्क इत्यादी प्रत्येक प्रकरच्या त्वचेसाठी लाभदायक आहे.काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने केस आणि त्वचा निरोगी, सुंदर होते. काजू खूप महाग असले तरी वेगवेगळी औषधे घेण्यापेक्षा काजूचे सेवन करावे.काजूमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.काजू यामध्ये Proteins, Vitamin B6, Vitamin C, Vitamin K, Iron, Copper, Magnesium, Potassium आणि Zinc चं प्रमाण खूपच चांगलं आहे. त्यामुळे काजू खाल्ल्याने आपली Energy तर वाढतेच पण त्याचबरोबर अनेक आजारांपासून आपलं रक्षण देखील होतं.तसंच नैराश्य किंवा Depression वर देखील काजू खुपचं उपयुक्त ठरतात. यात Tryptophan आणि vitamin B6 चं प्रमाण खुपचं चांगलं आहे.

तसंच यात Magnesium, Iron, Omega 3 Fatty Acids चं प्रमाणही चांगलं आहे. त्यामुळे नैराश्य किंवा Depression वर ते खुपचं उपयुक्त ठरतात. यामुळे मेंदूतील सेरोटोनिनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे ताण आणि Depression कमी होतो, मानसिक स्थिती सुधारते आणि मन देखील प्रसन्न राहतं. जर उदास वाटत असेल तर चार-पाच काजू खाल्ल्याने नक्कीच फरक जाणवेल.हे झाले काजूचे काही नियमीत उपयोग  परंतु काजू खाण्याचे दोन मुख्य फायदे होऊ शकतात,ते असे एकतर काजू वजन वाढविण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. या बरोबरच वजन कमी करण्यासाठी देखीलखूप फायदेशीर आहेत. 

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही फक्त काजू खाऊ शकता ,किंवा काजू व मध एकत्र करून खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन बऱ्यापैकी कमी होईल. जर एखाद्या व्यक्तीला वजन वाढवायचे असेल तर त्या व्यक्तीने काजू तळून किंवा एखाद्या मिठाईसोबत खावेत ,त्याचे अनेक फायदे होतात.