fbpx
Ganpati visarjan

…म्हणून केले जाते गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन

[facebook_ads]

पृथ्वी तलवार अनेक देवदेवता आहेत. मात्र संपूर्ण देवतांमध्ये गणपतीला अग्रपुज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता देखील मानले जाते. प्रत्येक मंगल कार्यात त्याला प्रथम स्थान असते. गणेश उत्सवाची सर्वांनाच आस असून लवकरच गणपती उत्सव सुरु होणार आहे. यामुळे सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन का केले जाते हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तर चला जाणून घेऊयात का केले जाते गणपतीचे विसर्जन….

[facebook_ads]

म्हणून केले जाते विसर्जन
धार्मिक ग्रंथानुसार महर्षी वेदव्यासजींनी गणेश चतुर्थीपासून लागोपाठ दहा दिवसांपर्यंत महाभारताची कथा गणपतीला ऐकवली होती. ही कथा सांगत असताना त्यांनी आपले डोळे बंद ठेवले होते. त्यामुळे याचा गणपतीवर काय परिणाम होत आहे हे त्यांना कळले नाही.

[facebook_ads]

जेव्हा महर्षीने कथा पूर्ण करून डोळे उघडले तेव्हा त्यांनी बघितले की 10 दिवसांपासून कथा ऐकल्याने गणपतीचे तापमान फार वाढले होते. गणपतीला ताप आला होता. महर्षी वेदव्याकसजींनी गणपतीला जवळच्या कुंडांत डुबकी मारायला सांगितली. यामुळे गणपतीच्या शरीरातील तापमान थोडया प्रमाणात कमी झाले. असे मानले जाते की गणपेति गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगुण साकार रूपात या मूर्तीत स्थापित राहतात. जी मूर्ती गणेश उत्सवादरम्यान स्थापित केली जाते.

[facebook_ads]

असे म्हटले जाते की गणपती उत्सवादरम्यान लोक आपल्या सर्व इच्छा गणपतीच्या कानात सांगतात. गणेश स्थापनेनंतर 10 दिवसांपर्यंत गणपती लोकांची इच्छा ऐकता ऐकता एवढे गरम होऊन जातात की चतुर्दर्शीला वाहत्या पाण्यात विसर्जित करून त्यांना थंड करण्यात येते. गणपती जल तत्त्वाचा अधिपती आहे. यामुळेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या प्रतिमेचे पूजा-अर्चना करून विसर्जन केले जाते.