जेवण केल्यानंतर लगेच या गोष्टी करणे टाळा. जाणून घ्या जेवल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात?

जेवण केल्यानंतर लगेच या गोष्टी करणे टाळा. जाणून घ्या जेवल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात?

उत्तम आहारविहार आणि विचार हे चांगल्या आरोग्याचं रहस्य मानलं जातं. मात्र अनेकदा याविषयी जास्त माहिती नसल्यामुळे दैनंदित आयुष्यात आपल्याकडून आहाराच्या बाबतीत अनेक चुका घडतात. या चुकांचा परिणाम नकळतपणे शरीरावर होतो आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडते. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण जेवण केल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नयेत विषयी माहिती घेणार आहोत.

सर्वांत महत्वाचं म्हणजे जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच पोटभर पाणी पिऊ नये. फक्त ठसका लागल्यास किंवा इतर कारणांमुळे जेवताना एक एक घोट पाणी आवश्यकता असल्यास प्यावे. अन्यथा जेवण झाल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाने पाणी प्यावे. असे केल्यास अन्नाचे पचन चांगले होते.

रात्रीच्या जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटं बाहेर मोकळ्या हवेत पायी फिरावे. यामुळे अन्नपचन प्रक्रिया सुलभ होते. जेवणानंतर काही कालावधीने झोपताना डाव्या कुशीवर झोपल्यास चांगल्या प्रकारे अन्नपचन होते. त्याचप्रमाणे जेवणानंतर वज्रासनात बसल्यानंतरही अन्नपचन प्रक्रिया सुलभ होते.  

जेवल्यानंतर लगेच फळांचे सेवन करू नये. दोन जेवणांच्या दरम्यान, दुपारच्या वेळेत फळांचे सेवन केल्यास त्याचा जास्त लाभ होतो. जेवणानंतर लगेच झोपू नये त्याचप्रमाणे जिम किंवा योगदेखील करू नये. जेवण झाल्यांनतर गोळ्या किंवा औषधांचे सेवन लगेच न करता अर्ध्या ते पाऊण तासाने करावे. 

जेवण केल्यानंतर लगेच थोड्या वेळात पुन्हा जेवू नका. दोन जेवणांच्या वेळांमध्ये किमान तीन ते चार तासांचे अंतर असायला हवे. यामुळे आधी केलेल्या जेवणाचे पचन व्हायला पुरेसा वेळ मिळतो. त्याचप्रमाणे जेवण झाल्यावर लगेच प्रणयक्रीडा करू नये. ती  जेवणानंतर 1 ते 2 तासानंतर करावी.