डोकेदुखी पासून होणार आता तुमची सुटका

डोकेदुखी हा आजार नसून आजारामागील कारण आहे. डोकेदुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपच, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी. अशात जास्त पेन किलरचे सेवन केल्याने रिऍक्शनची भिती सदैव राहते. डोकेदुखी सुरु झाली की कोणत्याही कामात लक्ष लागत नाहीत. अशावेळी डोकेदुखी कशी थांबेल हाच विचार आपण करतो. डोकेदुखी थांबवण्यासाठी या टीप्स तुम्हाला मदत करतील

१) आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत
होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहातं.

२)शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं
का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा
डोकेदुखीवर मात करता येते.

३)न्यू यॉर्कच्या सिनई मेडिकल सेंटरच्या डॉ मार्क ग्रीन यांच्या सांगण्यानुसार, शांतपणे गरम पाण्याने अंघोळ केल्यास डोकेदुखीची समस्या कमी होते.
डॉ. ग्रीन पुढे म्हणाले की, गरम पाण्याखाली उभं राहिल्याने स्नायूंवर आलेला ताण कमी होतो. परिणामी डोकेदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.

४)जर तुम्ही वारंवार होणार्‍या डोकेदुखीमुळे परेशान असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. आराम मिळेल.

५)लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावे. या पावडरला एका बरणीत भरून ठेवावे, जेव्हा कधी डोकं दुखायला लागेल तर या
पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करून ती पेस्ट डोक्यावर लावावी. लगेचच डोके दुखीत आराम मिळतो.

६) सर्दीमुळे होणार्‍या डोकेदुखीत धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.

७) गर्मीमुळे डोकं दुखत असेल तर चंदन पाउडरचे पेस्ट तयार करून कपाळावर लावल्याने डोकेदुखी दूर होईल.

८) अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास
फायद्याचे ठरते. एकंदरीत कोणता ऋतू आहे आणि वातावरणाचा अंदाज घेऊन शेक घ्यायचा की नाही, हे ठरवावे.

९) डोकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून
होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. त्यामुळे टरबुज किंवा अन्य पाणीदार फळांचा आपल्या आहारात नियमित समावेश असल्यास ते आरोग्यासाठी
फायद्याचे असते.

१०)ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते.