Health

निरोगी राहण्यासाठी आल्याचं पाणी हा घरगुती उत्तम उपाय

आरोग्याशी काही तक्रारी आल्यास सर्व प्रथम डॉक्टर आपल्याला भरपूर पाणी पिण्यास सांगतात. आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आल्याच्या पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे. रोजच्या डाएटमध्ये आल्याचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते. सतत सर्दी, खोकला किंवा सूज येण्याची समस्या असेल तर आल्याचे पाणी प्यायल्याने फायद्याचे ठरू शकते. उपाशी पोटी आल्याचे पाणी प्यायल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते.आल्यातील कॉपर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे व्हिटामिन एस, सी आणि ई मिळते. तसेच आल्याच्या पाण्याचे आरोग्यास होणारे बरेच फायदे आहेत.

१) कर्करोगापासून बचाव आल्यामध्ये अँटी कँसर प्रॉपर्टीज असतात. याचे पाणी पिल्याने फुफ्फुस, प्रोस्टेट, ओवेरियन, कोलोन, ब्रेस्ट, त्वचा आणि पेन्क्रिएटिक कँसरपासून बचाव होतो.

२) छातीतील जळजळ थांबते जेवणाच्या २० मिनिटानंतर एक कप आल्याचे पाणी प्यावे. हे शरारीमध्ये अॅसिडचे प्रमाण नियंत्रित करते. यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होते.

३) आल्याचं पाणी तुम्हाला वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरु शकतं. इतकंच नाही तर याने तुमची ब्लड शुगरही नियंत्रित राहते, याने डायबिटीजचा धोकाही कमी होतो. आल्याचं पाणी प्यायल्याने भूक कमी लागते त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

४) आल्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅटीऑक्सिडेंट तत्व असतात. त्यामुळे याचं सेवन केल्याने शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी मिळतात. याने केसाची आणि त्वचेची सुंदरता अधिक वाढण्यास मदत होते.

५) मधुमेह नियंत्रणात राहतो नियमित आल्याचे पाणी पिल्याने शसीराची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणाता राहते. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी असते.
६) स्नायूदुखी दूर होते आल्याचे पाणी पिल्याने शरीराचा रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे स्नायू सैल होतात आणि स्नायूमधील वेदनाही दूर होतात.

७) डोकेदुखी दूर होते आल्याचे पाणी पिल्याने मेंदूच्या पेशी सैल होतात होतात. यामुळे डोकेदुखीची समस्या बऱ्याच अंशी कमी होते.
८) त्वचा निरोगी राहते नियमित आल्याचे पाणी पिल्याने शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर निघतात. यामुळे रक्त शुद्ध होते आणि पिंपल्स, स्किन इन्फेक्शनचा धोका टळतो.

९) प्रतिकार क्षमता वाढते आल्याचे पाणी पिल्याने शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढते. यामुळे सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका टळतो.
१०) कफ दूर होतो आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात. त्याचे पाणी पिल्याने घशात अजिबात कफ तयार होत नाही आणि खोकला येत नाही.