Health

निरोगी राहायचे असेल तर प्या कोमट पाणी

दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. या तक्रारी अशा असतात की त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याचीही आवश्यकता नसते तरीही त्या त्रासदायक असतात. अशावेळी काही सोपे उपाय केल्यास या त्रासांपासून आपली सुटका होऊ शकते. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिणे चांगले असते. पाणी पिण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील. परंतु तुम्हाला कोमट पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत का… जर माहित नसतील तर आम्ही सांगतो. कोमट पाणी हे एका औषधी प्रमाणे आहे. नियमित कोमट पाण्याचे सेवन हे फक्त तुम्हाला निरोगी ठेवत नाही तर आरोग्यासंबंधीत अनेक समस्या दूर करते.

१) रोज सकाळी ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते. वजन घटवण्यास मदत होते.

२) रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास ही लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेत असणारे एंझाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात.

३ आजकालचं वाढतं प्रदूषण आणि धावती जीवनशैली यामुळे अनेकजण वयाच्या आधीच वयस्कर दिसू लागतात. महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जर तुम्हाला चिरतरूण दिसायचं असेल तर सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि तरूण दिसेल.

४) अनेकांना किडनी स्टोन अथवा मुतखड्याची समस्या असते. मुतखडा निघून जाण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाणी प्या. शिवाय जे लोक नियमित कोमट पाणी पितात त्यांना मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.

५)मासिक पाळीत बहुतांश महिलांना त्रास होतो. कोमट पाण्यामुळे या दुखण्यापासून मुक्तता मिळवणं शक्य आहे. यादरम्यान कोमट पाण्यानं पोट शेकल्यास मोठा दिलासा मिळतो.

६) संधीवात असणा-या लोकांनी गरम पाणी पिणे एखाद्या औषधी प्रमाणे आहे. नियमित कोमट पाण्याचे सेवन करणे हे जॉइंटमध्ये लवचिकता आणते, ज्यामुळे संधीवाताची समस्या कमी होते.

७) बऱ्याचदा वातावरणातील बदल अथवा इनफेक्शनमुळे वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवतो. तुम्हालाही असा त्रास असेल तर नियमित कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळे घसा आणि नाकातील कफ बाहेर पडण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.

८) कोणत्याही आजाराशी ऋतूशी, अन्न-पाण्याशी सामना करण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. कोमट पाण्यामुळे
प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

९) एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू मिळवून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमीन सी मिळते. गरम पाणी लिंबूचे कॉम्बिनेशन शरीराच्या इम्यूनिटीला मजबूत करते.

१०) नियमित कोमट पाणी पिण्याने केस गळणे, केस कोरडे आणि निस्तेज दिसणे, केसात कोंडा होणे अशा समस्या दूर होतात.

११) कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील सर्व प्रकारची अशुद्धता बाहेर पडते. कोमट पाण्यामुळे शरीराचं तापमान वाढून घाम येतो. त्या माध्यमातून शरीरातील सर्व अशुद्धता दूर होते

१२)रात्री झोपण्याआधी कोमट पाणी प्यायल्याने शरिरात पाण्याचं प्रणाण संतुलित राहतं आणि शरिराचं तापमानसुद्धा नियंत्रित राहतं. ज्यामुळे कायम ताजंतवानं असल्याचं तुम्हाला जाणवतं.