Home » काकडीच्या सेवनामुळे शरीराला होतात ‘हे’ १० फायदे, ९ वा फायदा आहे सर्वांसाठी महत्व्यापूर्ण!
Health

काकडीच्या सेवनामुळे शरीराला होतात ‘हे’ १० फायदे, ९ वा फायदा आहे सर्वांसाठी महत्व्यापूर्ण!

आधुनिक आधुनिक काळामध्ये फिट राहण्यासाठी सॅलड व हेल्दी गोष्टी खाण्यावर भर दिला जात आहे.षकस आहाराचे असे अनेक विविध प्रकार आपल्याला सर्वत्र आढळून येतात.या सॅलड मध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा घटक म्हणजे काकडी होय. काकडी चे फायदे हे आपल्या पूर्वजांनी व आयुर्वेदाने खूप पूर्वीच ओळखले होते.काकडी मध्ये केवळ औषधी व आरोग्यपूर्ण गुणधर्म नसून यामध्ये उत्तम अशी चव सुद्धा असते.

म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण काकडी खूप आवडीने खातात. काकडी मध्ये साधारणपणे 96 टक्के इतके पाणी असते. यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढून शरीराला डिटॉक्स करणे आणि शरीराला हायड्रेट ठेवणे ही कामे पार पाडली जातात. काकडी मध्ये अनेक पोषक द्रव्ये अगदी भरभरून असतात. काकडीमध्ये मॅग्नेशियम , पोटॅशियम व अन्य जीवनसत्व के हे मोठ्या प्रमाणात असते. काकडीची सेवन दररोज केले असता आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे आपण जाणून घेऊया.

१) काकडी मध्ये जवळपास 96 टक्के पाणी असते. यामुळे शरीराची दैनंदिन तत्त्वावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी काकडीचे सेवन करणे खूप आवश्यक ठरते. शरीराची पाण्याची गरज भागविण्याचे कार्य काकडी दारे पार पाडले जात असल्यामुळे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवले जाते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला वारंवार तहान लागते व शरीरामध्ये डीहायड्रेशन सारख्या समस्या निर्माण होतात तेव्हा काकडीचे सेवन करणे उपयुक्त ठरते. काकडी हे नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा देणारे पदार्थ आहे.यामुळे उन्हाळ्यात जेव्हा शरीराचा दाह होतो किंवा जळजळ होते तेव्हा काकडीचे सेवन केल्यास आराम मिळतो. काकडी आणि पुदिन्याचा वापर करून बनवलेले ड्रिंक हे सुद्धा शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून शरीराला फायदे ठेवण्याचे कार्य करते. काकडी आणि पुदिन्याच्या डिटॉक्स वाटर चे शरीराला अनेक फायदे आहेत.

२) काकडीमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते. या घटकांमुळे शरीरातील रक्तदाब कमी होण्यास मदत होते. शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहिल्यामुळे हृदयविकाराच्या समस्यांपासून ही बचाव होतो.  काकडी मध्ये असलेल्या या गुणधर्मामुळे काही संशोधनांमध्ये असे सिद्ध झाले आहे की ज्या व्यक्तींमध्ये हायपरटेन्शन सारख्या समस्या असतात त्यांना रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काकडीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

३) काकडी मध्ये थंडावा देण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे पोटातील दाह काकडीच्या सेवनामुळे कमी होतो. तसेच काकडी मध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या सुद्धा दूर होतात.काकडीच्या सेवनामुळे पचन सुद्धा सुलभ पद्धतीने घडून येते.

४) काकडीच्या सेवनामुळे शरीरातील रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य राहते. यामुळे मधुमेह यासारख्या समस्या असलेल्या व्यक्तींनी काकडीचे सेवन अवश्य करावे.

५) काकडीमध्ये साधारणपणे 96 टक्के इतके पाणी असते व कॅलरीज नाममात्र प्रमाणात दिसतात .साधारण 100 ग्रॅम काकडीमध्ये 15 ग्रॅम इतक्या कॅलरीज असतात. कमी कॅलरी व भरपूर पाणी यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते व वजन घटवण्यास साहाय्य होते.

६) काकडी आपले सौंदर्य खुलवणाऱ्या घटकांपैकी एक मानले जाते. काकडीचा रस चेहऱ्यावर लावून काही काळ तसाच ठेवून नंतर पाण्याने धुतला असता चेहऱ्यावर एक प्रकारची चमक निर्माण होते व एक्नेसारखे समस्या सुद्धा दूर होतात. काकडीच्या सेवनामुळे ही शरीर हायड्रेट होऊन शरीरावर अकाली पडणाऱ्या सुरकुत्या दूर होतात व त्वचेला एकप्रकारचा उजळपणा प्राप्त होतो.

७) कामाचा ताण व लॅपटॉप ,कॉम्प्युटर किंवा टीव्हीसमोर अतिरिक्त वेळ यामुळे डोळ्यांना थकवा निर्माण होतो. काकडीचे काप डोळ्यांवर दहा मिनिटे ठेवले असता डोळ्यांना थंडावा प्राप्त होतो. डोळ्यांवरील ताण कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो.

८) काकडीमध्ये सिलिका हा घटक असतो. सिलिका नखांचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक असते. काकडीमध्ये असलेल्या सिलीका मुळे केस गळण्या च्या समस्येपासून सुटका मिळते व नखे सुद्धा तुटण्याची समस्या उद्भवत नाही.

९) काकडी चे सेवन केल्यामुळे आपल्या श्वासाला दुर्गंधी येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरिया यांचा नाश होतो. काकडीचे सेवन करण्याचे ज्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी काही फायदे आहेत त्याचप्रमाणे काही तोटे सुद्धा आहेत. काही विशिष्ट प्रकृतीच्या लोकांनी याचे सेवन प्रमाणातच करावे असे सांगितले जाते.ज्या व्यक्तींना काकडीच्या सेवनामुळे पोट फुगण्याच्या किंवा गॅसेस होण्याच्या समस्या उद्भवत असतील त्यांनी काकडीचे सेवन शक्‍यतो रात्रीच्या वेळी करणे टाळावे.

१०) किडनी स्टोनची समस्या असलेल्या व्यक्तीने काकडी प्रमाणातच खावी कारण काकडी मध्ये पाण्याचा अंश खूप असतो व यामुळे पोटॅशियमची निर्मिती अधिक प्रमाणात होऊन किडनी स्टोन ची समस्या अधिक वाढू शकते. ज्या व्यक्तींना रक्त वाहणे  किंवा जखमा भरून न येण्याची समस्या असेल त्यांनी सुद्धा काकडीचे सेवन कमी करावे. कारण काकडी मध्ये असलेल्या के जीवनसत्वामुळे रक्त प्रवाह थांबत नाही.