Home » फुफ्फुसाच्या कर्करोगावर अत्यंत गुणकारी आहेत स्वयंपाक घरातील‌ ‘हे’ पदार्थ…!
Health

फुफ्फुसाच्या कर्करोगावर अत्यंत गुणकारी आहेत स्वयंपाक घरातील‌ ‘हे’ पदार्थ…!

आधुनिक बदलती जीवनशैली खाण्याच्या बदलणाऱ्या सवयी व अनुवंशिक बदलांमुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते.कर्करोग हा विभिन्न प्रकारांचा असतो.शरीरातील विविध अंगांना या आजाराने ग्रासले जाते.कर्करोग हा योग्य त्या औषधोपचारांनी बरा होतो. मात्र यासाठी आपल्या आहारविहारांमध्ये सुद्धा बदल करणे खूप आवश्‍यक असते.

अनेकदा आहाराविषयक काही सवयी सांगितल्या जातात ज्यामुळे आपण कॅन्सर होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो जसे की फुफ्फुसाचा कर्करोग होय.मात्र जर अगोदरच तुम्हाला फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले असेल तर असे काही पदार्थ सांगितले जातात की ज्यांच्या आहारात समावेश केल्यामुळे कर्करोगा पासून वाचण्याची शक्यता निर्माण होते किंवा कर्करोगाच्या उपचारांसाठी सहाय्य होते.याबाबत शास्त्रज्ञ व आरोग्य तज्ञांमध्ये अनेक मतप्रवाह दिसून येतात.

फुप्फुसाच्या कर्करोगामुळे निर्माण होणा-या वेदनांपासून काही  पदार्थ कसे मदत करू शकतात.तर काही पदार्थ असे आहेत जे शरीरातील पेशींच्या बांधणीस मदत करू शकतात.किंवा कर्करोग हा अगदी टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असतो यामधील काही टप्प्यांना अडथळा ठरण्याची काम हे विशिष्ट पदार्थ करू शकतात.या अर्थाने अशा विशिष्ट पदार्थांचा समावेश फुप्फुसाचा कर्करोग असलेल्या रुग्णांनी करणे हे फायद्याचे ठरू शकते. 

१) पेरू किंवा सफरचंद या फळांमध्ये विशिष्ट घटक असते. या घटकामुळे  कॅन्सरमध्ये वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशी यांचा प्रतिबंध केला जातो. तसेच कॅन्सरच्या पेशी वाढ विरोधी कार्य केले जाते.या घटकांमुळे पेर किंवा सफरचंदाचे सेवन फुफुसाचा कॅन्सर असणाऱ्या व्यक्तीने करावे.

२) ग्रीन टी – ग्रीन टी हे ज्या व्यक्तींना अगोदरच फुप्फुसांचा कॅन्सर झाला आहे अशा व्यक्तींसाठी तर उपयुक्त आहेच पण कॅन्सर होण्यापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे ग्रीन टी वापरले जाते.ग्रीन टी मध्ये असलेल्या एंटिऑक्सिडंटमुळे कॅन्सर व केमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम आणि वेदनेपासून बचाव होतो.ग्रीन टी हा उपयुक्त असला तरी ज्या व्यक्तींना कॅफेनची ऍलर्जी आहे अशा व्यक्तींनी बाजारामध्ये बाटलीतून मिळणाऱ्या ग्रीन टी पेक्षा नैसर्गिक स्वरूपातील ग्रीन टीचे सेवन करावे तसेच यामध्ये साखरेचा वापर करू नये तर लिंबाचा वापर करावा जेणेकरून यामधील उपयुक्त गुणधर्म अधिक परिणामकारकरीत्या शरीरात शोषले जाते.

३) सलमन माशांमध्ये असलेले विटामिन डी,फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींना अटकाव करतात असे दिसून आले आहे. जीवनसत्व डॉ  आहारातील खूप कमी पदार्थ द्वारे मिळते कारण याचा मुख्य स्त्रोत हा सूर्याच्या कोवळ्या उन्हाची किरणे असतात ‌मात्र केमोथेरपीमुळे कधीकधी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे सुद्धा अपायकारक ठरू शकते. आहारामध्ये ड जीवनसत्व ही मुख्यत्वे माशां मधूनच मिळते.

४) आले – आले हे अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त पदार्थ आहे.आल्यामुळे कॅन्सर ग्रस्त रुग्णांना येणारा शिसारी सारखा त्रास तर दूर होतोच पण याव्यतिरिक्त कॅन्सरच्या पेशी ना पसरण्यापासून आळा घातला जातो.आल्याचे सेवन हे नुसता आल्याचा तुकडा चघळून केले जाऊ शकते किंवा आहारामध्ये डाळ,भाज्या चहा इत्यादींमध्ये याचा वापर करूनही केले जाऊ शकते.

५) आमटी – भारतीय पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जाणारा पदार्थ म्हणजे आमटी होय. आमटीमध्ये मुख्यत्वे हळदीचा वापर केला जातो.हळदीमध्ये कर्क्युमिन हा एक औषधी गुणधर्म असते.कर्क्युमिन हे फुफ्फुसांचा कर्करोग यामध्ये वाढणाऱ्या पेशींना रोखण्याच्या उपचारांना प्रतिसाद देण्यासाठी सहाय्य करते असे काही संशोधनामध्ये आढळून आले आहे. कर्क्युमिन घटक मिळण्यासाठी हळदीच्या तुकडयापेक्षाही आमटीमध्ये किंवा भाजी मध्ये घालून केलेले असता अधिक प्रभावी ठरते.

६) दालचिनी – दालचिनी हा भारतीय मसाल्यांमधील अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.दालचिनी मध्ये एंटीबॅक्टेरियल  आणि एंटीमायक्रोबिअल गुणधर्म असतात.हा थंड प्रकृतीचा व अतिशय पौष्टिक असा मसाल्याचा पदार्थ असतो. मधुमेह व कॅन्सर ग्रस्त व्यक्तींना त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनी सहाय्य करते.नुकत्याच केलेल्या काही संशोधनांमधून असेही समोर आले आहे की दालचिनी हा पदार्थ कर्करोग असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा लाभदायक आहे.

७) लसूण – लसूण हा केवळ जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठीच वापरला जातो असे नव्हे तर लसूनचे  अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत.लसुण हा हृदयाशी निगडित काही विकार,कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे यासाठी खूप गुणकारी ठरतो.लसूण च्या सेवनामुळे फुप्फुसांचा कॅन्सर मध्ये सुद्धा काही लाभ होतात.यामध्ये एंटीआक्सिडेंट असते व याचा लाभ फुफ्फुसाच्या कॅन्सर असलेल्या व्यक्तींना मिळतो.लसूण चे सेवन हे भाजी किंवा अन्य पदार्थांमध्ये शिजवून मग करावे.