Articles Food & Drink Health

सीताफळ खाण्याचे ‘हे’ आहेत १४ फायदे, १० फायदा आहे सर्वांसाठी उपयुक्त

चांगल्या आरोग्यासाठी फलाहार करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. भिन्न हंगाम, तापमान, प्रदेश व विभिन्न प्रकारच्या जमिनीनुसार विविध प्रकारची फळे संपूर्ण जगभरातील पिकवली जातात. या सर्व फळांचे सेवन आरोग्यासाठी हितकारक असते .भारतामध्ये प्रामुख्याने सफरचंद, डाळिंब ,संत्री ,मोसंबी इत्यादींचे सेवन केले जाते पण या बरोबरीनेच अजून एका फळाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी सध्याच्या काळात निर्माण झाली आहे ते फळ म्हणजे सीताफळ होय. सिताफळाच्या रोजच्या आहारातील सेवना सोबतच फुड प्रोसेसिंग व्यवसायामध्ये ही सीताफळाचा पल्प व अन्य पदार्थ तयार करण्यासाठी या फळाचा वापर केला जातो. व्यावसायिक उपयोगा सोबतच आपल्या शरीराला सिताफळाच्या नियमित सेवनामुळे अनेक फायदे होतात. आज आपण सीताफळाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला होणारे काही महत्त्वाचे फायदे पाहणार आहोत.

१) सिताफळा मध्ये अँटिऑक्सिडंट ,फायबर, व्हिटॅमिन सी, ओमेगा 3, फॅटी अ‍ॅ सि ड आणि व्हिटॅमिन बी आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. सीताफळाच्या सेवनाने शरीराला ते सर्व पोषक घटक मिळतात व परिणामी निरनिराळ्या प्रकारच्या आजारांवर उपचार होण्यास साहाय्य मिळते.

२) निरोगी आणि घनदाट केस मिळवण्यासाठी सिताफळाचे नियमित सेवन करावे. सिताफळाचे सेवन करण्यासोबतच सिताफळाच्या बियांची पावडर सुद्धा खूप लाभदायी असते मात्र या पावडरचा संपर्क हा डोळ्यांसोबत प्रत्यक्षपणे येऊ न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक असते अन्यथा डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. डोळ्यांची जळजळ होणे, खाज सुटणे इत्यादी समस्याही उद्भवू शकतात. केस गळणे ,केस दुभंगणे, केसांमध्ये कोंडा होणे , यांसारख्या समस्यांसाठी सीताफळाच्या बियांची पावडर करून ती केसांना लावून केस स्वच्छ धुण्याचा सल्ला फार पूर्वीपासून दिला जातो मात्र ही पावडर केसांना लावल्यानंतर केस जाड कपड्याने बांधावेत.

३) सीताफळ मध्ये असलेल्या काँ प र आणि त्याच्याशी निगडीत फायबर मुळे पचन संस्थेशी निगडित विकार दूर होण्यास साहाय्य मिळते.बद्धकोष्टता दूर होण्यास सीताफळाच्या सेवनामुळे मदत होते .डायरिया मध्ये सिताफळाचे चूर्ण पाण्यामधून घेतल्यास आराम मिळतो.

४) धू म्र पा न किंवा कॅफेन युक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे दातावरची चमक नाहीशी होऊन पिवळेपणा निर्माण झाला असेल तर सिताफळ हा अतिशय उत्तम पर्याय ठरतो. सीताफळ खाल्ल्यामुळे दातांवर चमक पुन्हा येऊन दातांचा पिवळेपणा सुद्धा कमी होतो.
५) सिताफळा मध्ये नायट्रिक ऍसिड हा घटक भरपूर प्रमाणात असतो. नायट्रिक ऍसिड शरीरामध्ये जाणे हे रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे यासाठी कोणत्याही प्रकारे सीताफळाचे सेवन केले तरी फायदेशीर असते.

६) सीताफळामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते यामुळे ऍनिमिया झालेल्या व्यक्तींनी सिताफळाचे सेवन अवश्य करावे. सीताफळामुळे शरीरात निर्माण झालेला अशक्तपणा कमी होतो.यासाठी सीताफळाचा मिल्कशेक हासुद्धा एक चांगला पर्याय ठरतो.
७) सिताफळा मध्ये मोठ्या प्रमाणात अ जीवनसत्व असते व अ जीवनसत्वाच्या सेवनामुळे सिताफळाचे केल्यास तुमच्या त्वचेवर चमक निर्माण होते आणि डोळ्यांची दृष्टी सुद्धा चांगली राहते.  तोंड आल्यावर सीताफळ चुर्ण खाणे किंवा अल्सरच्या जागी लावण्यामुळे नक्कीच फायदेशीर ठरते। सिताफळा मध्ये अँटीएजिंग तत्त्व मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे सुरकुत्या पासून बचाव होतो.

८) ज्यांना आपले वजन वाढवायचे आहे अशा व्यक्तींनी सीताफळ पल्प थोड्याशा तुपासोबत सेवन केले असता वजन वाढण्यास मदत होते.
९) सिताफळा मध्ये मँग्नेशिअम असते.मँग्नेशिअम हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते यामुळे सिताफळाच्या सेवनामुळे मुबलक प्रमाणात मँग्नेशिअम मिळून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवले जाऊ शकते.

१०) सिताफळा मध्ये मोठ्या प्रमाणात लोह  तसेच अन्य फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हाडांचे एकंदरीतच आरोग्य उत्तम राखण्यास साहाय्य होते. सांधेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तीने सिताफळाचे कोणत्याही स्वरूपात नियमित सेवन केले तर निश्चितच सांधे दुखी पासून आराम मिळतो व हाडांना ही बळकटी येते.

११) मधुमेहावर सीताफळ चे सेवन हा अतिशय उत्तम उपचार आहे. सिताफळाच्या सेवनामुळे रक्तातील साखर शोषून घेण्याचे प्रमाण कमी होते व रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते.
१२) चयापचयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी सिताफळाचे सेवन करावे.
१३) सिताफळा मध्ये असलेल्या क जीवनसत्वामुळे त्वचेमधील कोलाजन यांच्या निर्मितीमध्ये वाढ होते आणि रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.
१४) शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल वाढू न देण्यासाठी सिताफळाचे नियमित सेवन करावे.