Articles Health

भांग पिण्याचे ५ तोटे: चौथा तोटा आहे महिलांसाठी हानिकारक

मागील भागात आपण भांगेचे सेवन केल्यानंतर होणारे फायदे बघितले होते. आज आपण यामुळे होणाऱ्या तोट्यांवर लक्ष केंद्रित करणार असून आम्ही तुम्हाला याच्या तोट्यांविषयी माहिती देणार आहोत.

भांग पिल्याने किंवा त्याचे सेवन केल्याने होणारे फायदे अनेक आहेत मात्र त्याचे मोठ्या प्रमाणावर आणि अनियंत्रित सेवन केल्याने होणारे तोटेदेखील मोठे आहेत. त्यामुळे भांगेचे नियंत्रित सेवन केल्याने नक्कीच भांग आरोग्यासाठी उत्तम आहे.

अतिप्रमाणात सेवन केल्याने होणारे भांगेचे तोटे

१) भांगेचे अतिप्रमाणात सेवन केल्याने याचा मेंदूवर परिणाम होतो. काम करणे देखील काही वेळा बंद पडू शकते.

२) अति प्रमाणात सेवन केल्याने व्यक्ती काहीही बडबडू शकतो. विचित्र वस्तू देखील व्यक्तीला दिसू लागतात.

३) हृदयविकाराची देखील शक्यता वाढते. डोळे लाल होण्यास सुरुवात होते. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

४) महिलांना गर्भधारणेमध्ये याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे महिलांनी याचे सेवन कमी प्रमाणात करावे.

५) शाळेत अथवा कॉलेजमध्ये तुम्ही याचे सेवन केल्यास याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. मेंदूवर याचा वाईट दुष्परिणाम झाल्यामुळे तुम्ही विचित्र वागू शकता.